आपल्याला वडिलधारे सतत सांगत असतात. "काय बघता? काय विचार करता? काय वाचता? ते चांगलंच असू द्या." पण आपण ऐकत नाही.(Stop Watching Dark Content Before Sleeping) आजकाल डार्क सिरिज फार चालतात. या सिरिज मध्ये प्रचंड मारामारी, रक्त, आणि अश्लीलता असते. एवढंच नाही तर बऱ्याच सिरिज चुकीच्या गोष्टींना दुजोरा देतात. एखादा गुन्हेगार कसा योग्य आहे. खुनखराबा करण्यात काही चूक नाही. असे संदेश या वेबसिरिज देत असतात. लोकांना ते बघायला आवडतं. अशा सिरिजमध्ये काथानक, पात्र फार छान रंगवलेली असतात. ती लोकांच्या मनात घर करून बसतात.(Stop Watching Dark Content Before Sleeping) याविषयी एक छान तत्त्वज्ञान आहे. जे प्रत्येकाला माहिती असावं. टेट्रिस इफेक्ट असं याच नाव आहे. मुळात कम्पुटर गेम्ससाठी ही संकल्पना तयार करण्यात आली होती. रात्रीचा अति वेळ असे गेम्स खेळण्यात घालवला तर, त्यातील गोष्टी प्रत्यक्षात दिसल्याचे भास होतात. नंतर हे तत्त्व बाकी गोष्टींना देखील लागू झाले. (Stop Watching Dark Content Before Sleeping)
या इफेक्टमध्ये झोपायच्या आधी तुम्ही रोज जर काही भयानक बघत असाल,तर त्यातील गोष्टी प्रत्यक्षात दिसायला लागतात. रात्री शेवटी जो विचार डोक्यात असतो, तोच पुढचा अख्खा दिवस डोक्यात राहतो. झोपल्यानंतर अवचेतन मन(subconscious mind) कार्यक्षम होते. झोपे आधी डोक्यात असलेला विचार मन चघळत राहते. आणि त्याचा परिणाम इतका होऊ शकतो की, विचारातील गोष्टी प्रत्यक्षात दिसायला लागतात. ज्या दृष्टिकोनातून गोष्ट बघितली असते, त्यतच दुसऱ्या दुवशी सगळं दिसतं. माणसांचं वागण आपण त्या पात्रांवरून ठरवायला लागतो. जर अति डार्क काही बघितलं असेल तर, भीती वाटत राहते.(Stop Watching Dark Content Before Sleeping) अंगावर शहारे येतात.
या मध्ये स्टेजेस असतात. जर तुम्हाला असं काही दिसायला लागलं तर, त्याचा मेंटल हेल्थवर परिणाम होतो. त्यामुळे झोपताना रिल्स बघणं किंवा एखादा वाईट कंटेंट बघणं सोडून द्या. सकारात्मक विचारांबरोबरच झोपायला जा. जर डार्क सिरीज बघायच्याच आहेत , तर सकाळी बघा. झोपताना हृदयाला किंवा मनाला जड जाईल असं काही बघू नका.