आपण सगळेच कधी ना कधी आपलं घर, घराचा एकेक कोपरा, कपाट, दिवाणाचा बॉक्स, स्वयंपाक घरातली कपाटं असं सगळंच आवरायला काढतो. आवरताना त्यात आपल्याला बऱ्याच जुन्या, सध्या वापरात नसलेल्या खराब, टाकाऊ वस्तू दिसतात. काही लोक अशा निरुपयोगी वस्तू भराभर टाकून देतात. तर काही लोक मात्र त्या वस्तू पुन्हा जशास तशा कपाटात ठेवून देतात. या लोकांचा त्या वस्तूंमध्ये खूप जास्त जीव गुंतलेला असतो हे खरंच आहे. पण त्यापेक्षाही एक वेगळं कारण त्यामागे असू शकतं, असं याविषयीचे काही अभ्यास सांगतात. (storing lots of waste things with you just because not willing to discard old items?)
कोणतीही जुनी, खराब झालेली वस्तू फेकून देण्याऐवजी ती सांभाळून ठेवण्याची सवय अनेकांना असते. कधी ना कधी ती वस्तू कामाला येईल म्हणून अनेक जण आणि विशेषत: महिला जुने कपडे, भांडे, बेडशीट, चादरी, टॉवेल किंवा घरातल्या कोणत्याही वस्तू जपून ठेवतात.
ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल
किंवा काही लोकांना अशीही सवय असते की एखादी वस्तू आवडली म्हणून ती घेऊन टाकतात. ती वस्तू आपल्या खरच उपयोगाची आहे का, ती आपण वापरणार आहोत का, असा विचार खरेदी करताना त्यांच्या डोक्यात येत नाही. अशा दोन्ही सवयी ज्या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतात त्यांना होर्डिंग डिसऑर्डर नावाचा आजार असू शकतो, असं mayoclinic.org यांनी म्हटलं आहे.
आज तक यांनी दिलेल्या वृत्तानुसार याविषयी केलेल्या काही अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की दर २० लोकांमागे एका व्यक्तीला हा आजार असतो. तसेच तिशीच्या पुढे गेलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार जास्त दिसतो.
आषाढी एकादशीला करा उपवासाची मऊ, लुसलुशीत इडली- बघा झटपट होणारी सोपी रेसिपी
तरुणांपेक्षा वयस्कर मंडळींना हा आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. हा आजार तसा खूप काही गंभीर नाही. पण त्यामुळे त्या व्यक्तींकडे गरजेपेक्षा जास्त वस्तू साचल्याने त्याचा त्यांनाच आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या इतर व्यक्तींना त्रास होतो. त्यातून त्यांना बऱ्याचदा सामान व्यवस्थित ठेवणे, घरातला पसारा कमी करणे, वस्तू जागेवर आणि वेळेवर न सापडणे अशा अडचणी येऊ शकतात.