पूनम घाडीगावकर (मानसशास्त्रज्ञ)
मला खूप स्ट्रेस आला आहे ! मनावर खूप ताण येत आहे हे वाक्य सहज ऐकत असतो पण आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. खरे पाहता तणाव (स्ट्रेस) ही शरीरात होणारी सामान्य प्रतिक्रिया असते. मानसिक ताण ही एक मानवी प्रतिक्रिया आहे, जी प्रत्येकाला होते. जेव्हा आपल्याला तणाव जाणवतो तेव्हा तो आपल्या शरीर, भावना आणि बौद्धिक वर परिणाम करताना दिसतो. तणाव येणे ही गोष्ट नेहमीच वाईट नसते. पण आपल्याला नेहमी वाटतं स्ट्रेस येणं म्हणजे भयंकर काहीतरी आहे. लोकही सांगतात स्ट्रेस कमी करा.
स्ट्रेस असतो कसा? येतो कुठून?१. सामान्यतः तणाव हा दोन प्रकारात आपल्याला आढळून येतो एक आहे युस्ट्रेस म्हणजेच सकारात्मक ताण आणि डीस्ट्रेस म्हणजे नकारात्मक तणाव. आता आपण जाणून घेऊ युस्ट्रेस - हा एक सकारात्मक ताण आहे जो आपल्याला लक्ष किंवा ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी, योजना आखण्यासाठी मदत करतो. तणाव हा अनेकदा सकारात्मक असू शकतो. तो आपल्याला सतर्क ठेवतो, आपल्याला प्रवृत्त करतो, आणि धोका टाळण्यासाठी तयार ठेवतो.२. परंतु डीस्ट्रेस हा नकारात्मक स्ट्रेस आहे जो आपल्यासाठी एक समस्या बनतो. त्यामुळे आपल्याला सतत तणाव जाणवतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात विविध बदल किंवा आव्हाने अनुभवत असतो तेव्हा आपले शरीर शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया निर्माण करतात.
(Image : google)
तणाव कसा निर्माण होतो?१. काही व्यक्ती अवास्तव आणि परिपूर्णता वादी अपेक्षा ठेवतात. मनाला अस्वस्थ करणारी विचारसरणी (चिंता), नोकरीची असुरक्षितता, आरोग्य आणि वैद्यकीय चिंता, कौटुंबिक कलह, पर्यावरण प्रदूषण आणि सामाजिक आव्हाने, परीक्षेची अनिश्चितता, आर्थिक धोरणात बदल, नोकरी करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, भविष्यातील घटनांबद्दल काळजी वाटणं, एखादं व्यसन अशा अनेक बाबींमुळे तणाव जाणवतो .२. खूप स्ट्रेस मुळे शरीराचा एखादा अवयव दुखत असतो. हे त्यांच्या खूप उशिरा लक्षात येते तो पर्यंत अनेक पेनकिलर औषधे घेतलेली असतात. तणावामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतात जसं की सतत अंग दुखणे, डोके दुखणे, छातीत दुखणे, श्वसनाला त्रास होणे, झोपे मध्ये अडथळा निर्माण होणे, रक्तदाब (ब्लडप्रेशर) हाय किंवा कमी होणे. ३. अशक्तपणा, तणावामुळे सतत चिंता वाटते, चिडचिड निर्माण होते, अस्वस्थता जाणवते, सतत भीती वाटते, मन दुखी राहतं, चिडचिड स्वभावामुळे आक्रमकता वाढते, रागीट स्वभाव होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे कुठेतरी आपल्या दैनंदिन कामावर/जीवनावर परिणाम होतो असतो. मुलांचा अभ्यासावर, वागण्यावर, नोकरी करणाऱ्यांच्या कामावर परिणाम दिसतो. नकारात्मक तणावामुळे काही लोक काही गोष्टींच्या आहारी जाताना दिसतात, मद्यपान - धूम्रपान करताना दिसतात. ४. शरीरभर मरगळ बसलेली जाणवते कशातच उत्साह दिसत नाही.
(Image : google)
नकारात्मक तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल?सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नियंत्रणात काय आहे आणि माझ्या नियंत्रणा बाहेर काय आहे याचा आपण नक्कीच विचार करायला हवा. बऱ्याचदा आपण अशा गोष्टींची चिंता करतो ज्यात आपण फार बदल करूच शकत नाही. आपल्या नियंत्रणात काय आहे, तुमच्या भावना, तुमची कृती, तुमचे वागणे, तुमचे विचार , तुमच्या कल्पना, तुमच्या प्रतिक्रिया ह्यात तुम्ही सकारात्मक बदल करू शकता जे तुमच्या हातात आहे..१. जेव्हा तुम्हाला तणाव जाणवायला लागतो तेव्हा बाहेर चालायला जा, व्यायाम करा, मेडिटेशन करा.२. कामाचे व्यवस्थापन करा. आजचे काम आज करा उद्यावर टाळू नका.३. दीर्घ कालीन ध्येय जरी असले तरी लहान लहान ध्येय बनवा. ते पूर्ण झाले की आनंद व्यक्त करा४. आपल्या भावना, विचार आणि कृती याची योग्य सांगड घाला५. नेहमीच स्वतःशी सकारात्मक बोला कारण मेंदू, शरीर आणि आत्मा याची गट्टी असते. त्यामुळे मेंदूला योग्य सूचना द्या .