Join us

मनावरच्या ताणाचं करायचं काय? सततच्या स्ट्रेसने जीव मेटाकुटीला आला तरी ऑल इज वेल म्हणताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 15:27 IST

stress causes depression : मानसिक थकवा येतो, त्यासाठी औषधोपचार घ्यायला हवेत हा विचार म्हणजे वेडेपणा नव्हे, ती गरज आहे.

आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो.(stress causes depression) व्यवस्थित आहार घेण्याचा प्रयत्न करतो, व्यायाम करतो, सतत कार्यक्षम राहतो, विविध उत्पादने वापरून त्वचेची, चेहऱ्याची काळजी घेत असतो. पण तरी कधीतरी जीवन सुरळीत चालत नसल्यासारखे वाटते.(stress causes depression) बाह्य शरीर मजबूत असले तरी मन, डोकं, मेंदू यांच्यावर येणाऱ्या ताणाचे काय? त्याची काळजी कोण घेणार?

भारतात अजूनही मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण मानलं जातं.(stress causes depression) मानसोपचारतज्ज्ञांकडे फक्त मानसिकदृष्ट्या विकलांग असलेले लोक जातात. असा चुकीचा समज आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकडे कोणी लक्ष देत नाही. असे करणे अत्यंत चुकीचे आहे.(stress causes depression) काही वेळा अतिकामामुळे किंवा तणावामुळे, नात्यांच्या गुंत्यामुळे माणूस मानसिकरित्या थकून जातो. हा थकवा दिसून येत नाही, आतल्या आत त्रास होत राहतो. असे होत असताना दुर्लक्ष केल्याने नंतर नैराश्य(depression) वाढत जाते. याला 'डिप्रेसिव्ह डिसऑर्डर' असे म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर कोणत्या कारणाने खचत जात असाल तर वेळीच सावरा. 

काय करायला हवे?

१.  विश्वासातल्या माणसाशी बोलातुमचे दुःख तुमच्या जवळच्या व विश्वासातील व्यक्तीला सांगा. तुमचा खास मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी किंवा इतर कोणतरी जे समजून घेतील अशा व्यक्तीला तुमची व्यथा सांगा. मन मोकळे करा. योग्य संवादाने अनेक समस्या व चिंता दूर होतात. तुमच्या जीवलगांनी दिलेला सल्ला ऐका.

२. शरीर मजबूत ठेवा शरीराची काळजी घ्या. शरीर जर खूप थकले असेल तरी मन थकते. जर आळस वाढला तर, काहीही करण्याची इच्छा मरून जाते, चिडचिड वाढते. त्यामुळे शरीर सुदृढ ठेवणे गरजेचे आहे.

३. आवडीच्या गोष्टी कराप्रत्येकात काही ना काही कला असते. कला नसेल तर छंद असतो. नृत्य, गायन, चित्रकला, क्रीडा, भटकंती आदि. अनेक गोष्टी आहेत. आवडीची गोष्ट करायला मिळाली की मन प्रफुल्लित राहते. व्यवसायिक जीवनसुद्धा आवडीचेच निवडा. मन रमवायला शिका. 

४. व्यसनांपासून दूर राहा.व्यसन करणे शरीरासाठी हानिकारक आहे. ते फक्त लिव्हरवर नाही तर डोक्यावरही परिणाम करते. दु:ख विसरण्यासाठी व्यसन करणारे बरेच असतात. तात्पुरत्या गुंगीने त्रास तात्पुरता विसरण्यासाठी शरीराची वाट लावण्यात अजिबात अर्थ नाही. 

५. आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण कराडोकं शांत ठेवून आजूबाजूला बघा. आपण एकटेच कष्टात जगत नाही. इतरही आहेत. बरेचदा दुसऱ्याची व्यथा पाहून आपण आपली व्यथा विसरतो. बाकीचे कसे सामोरे जातात त्याचे निरीक्षण करा. स्वत:साठी वेळ काढा.  

६. तज्ज्ञांची मदत घ्या.जर तुम्ही खूपच निराश होत आहात आणि स्वत:हून त्यातून बाहेर येता येत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.   

टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स