'स्ट्रेस' किंवा 'तणाव' हा शब्द जितका लहान आहे तितकीच समस्या फार मोठी आहे. सध्या फास्ट आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा किंवा कामाचा स्ट्रेस येणं सहाजिकच आहे. स्त्री असो किंवा पुरुष स्ट्रेस कुणालाही, कधीही येऊ शकतो. आपल्यापैकी बरेचजण काहीवेळा छोट्या-छोट्या गोष्टींचा अतिविचार करू लागतात, ज्यामुळे तणाव वाढतो(Survey Reveals Women Experience Higher Stress Than Men, Tips To Reduce Stress In Women).
आजच्या काळात तणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु पुरुषांपेक्षा महिलांना जास्त ताण सहन करावा लागत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकेतील तणावाशी संबंधित हे सर्वेक्षण अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने (एपीए) केले होते. इतकेच नाही तर अनेक अहवालांमध्ये असा दावाही करण्यात (Study reveals Indian women significantly more stressed than men) आला आहे की, पुरुषांपेक्षा महिलांची स्ट्रेस घेण्याची संख्या ही दुप्पटीने आहे. स्ट्रेस घेण्यात पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे आहेत. यासाठीच, रोजच्या डेली रुटीनमध्ये महिलांना स्ट्रेस येऊ नये किंवा कमी करण्यास नेमकं काय करावा ते पाहूयात.
ताण कमी करण्यासाठी करावेत असे सोपे उपाय...
१. मेडिटेशन :- जर तुम्ही दररोज तणावातून जात असाल तर तुमचे मन आणि शरीर शांत करण्यासाठी मेडिटेशन करा. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन हा एक उत्तम मार्ग मानला जातो. यामुळे एकाग्रता देखील वाढते.
२. एक्सरसाइज :- योगा आणि व्यायामाला रोजच्या दिनचर्येचा भाग बनवले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स सोडले जाते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.
उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट 'नीर चटणी' करा घरच्याघरीच, डोसे - वडे खा मनसोक्त...
३. स्वत: ला ब्रेक द्या :- काहीवेळा कामाच्या दबावामुळे किंवा सतत टॉक्सिक वातावरणात राहिल्याने मन उदास आणि तणावग्रस्त होते, अशा परिस्थितीत स्वत:ला नक्कीच एखादा छोटासा ब्रेक द्या. कामातून विश्रांती घ्या आणि परिवार किंवा मित्रमैत्रिणींसोबत सहलीची योजना करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोलो ट्रिपलाही जाऊ शकता. यामुळे मनाला शांती आणि आराम मिळतो.
४. पुरेशी झोप :- तुमचा तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. कारण झोपेचे चक्र बिघडल्याने याचा मूडवरही परिणाम होतो, ज्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. यासाठीच पुरेशी झोप घ्या.
५. आहाराकडे दुर्लक्ष करू नका :- तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घ्या. निरोगी आणि संतुलित आहार हे तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी फारच आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही तुमचा मूड देखील चांगला करु शकता, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.
६. गाणी ऐका :- झोपण्यापूर्वी तुम्ही गाणी किंवा संगीत ऐकू शकता ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स होण्यास मदत होईल. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा दुःखी गाणी ऐकू नका.
पार्लरच्या वाऱ्या करुन चेहऱ्यावर ग्लो येईलच असं नाही, ब्रायडल ग्लोसाठी वापरा ‘हा’ फेसमास्क...
७. निसर्गासोबत वेळ घालवा :- निसर्गासोबत वेळ घालवल्याने मानसिक ताणही दूर होतो आणि मूड सुधारतो.याचबरोबर यामुळे आपल्या शरीरात हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. अशा परिस्थितीत तुमच्या घराजवळील अशा ठिकाणी जा, जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद लुटू शकता.
८. सकारात्मक विचार करत रहा :- जीवनात सकारात्मक विचार करणे खूप महत्वाचे आहे, कारण याच्या मदतीने तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करु शकता. तुमच्या मनात नकारात्मक विचार आणल्याने स्ट्रेस वाढतो, त्यामुळे नकारात्मक विचारांचा तुमच्यावर दबाव पडू देऊ नका.