Lokmat Sakhi >Mental Health > महिला आत्महत्या का करतात? एकटेपणा आणि मानसिक ताणासह कुटुंबातला कलह त्यांच्या जीवावर उठतो, जबाबदार कोण?

महिला आत्महत्या का करतात? एकटेपणा आणि मानसिक ताणासह कुटुंबातला कलह त्यांच्या जीवावर उठतो, जबाबदार कोण?

suicide prevention day 2023 : आत्महत्या करणाऱ्या महिलांचे वाढते प्रमाण आणि त्यात गृहिणींची संख्या मोठी, हे निराशाजनक चित्र नक्की काय सांगते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 07:00 AM2023-09-10T07:00:00+5:302023-09-10T07:00:02+5:30

suicide prevention day 2023 : आत्महत्या करणाऱ्या महिलांचे वाढते प्रमाण आणि त्यात गृहिणींची संख्या मोठी, हे निराशाजनक चित्र नक्की काय सांगते?

suicide prevention day 2023 : Why do women commit suicide? Creating Hope Through Action.. | महिला आत्महत्या का करतात? एकटेपणा आणि मानसिक ताणासह कुटुंबातला कलह त्यांच्या जीवावर उठतो, जबाबदार कोण?

महिला आत्महत्या का करतात? एकटेपणा आणि मानसिक ताणासह कुटुंबातला कलह त्यांच्या जीवावर उठतो, जबाबदार कोण?

Highlightsआत्महत्या करणाऱ्या महिलांची आकडेवारी पाहिली तर देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आत्महत्या केली कुणी की एकच सूर सर्वत्र दिसतो बोलायला हवं होतं, तिनं/त्यानं. अनेकजण फेसबूकवर संदेशही लिहितात की रात्री दोन वाजता फोन कर मी आहे. पण असं कुणी कुणाला फोन करत नाही. स्ट्रेस सांगत नाही. आजकाल सोशल मीडियाच्या जगात तर आपलं कसं भारी चाललं आहे हे आपल्या जवळच्या माणसांनाही सांगणं अवघड अशी स्थिती आहे. सगळ्यांना वाटतं की आपलं उत्तमच चाललं आहे हेच जगाला कळावं. अर्थात आत्महत्येची अनेक कारणं असतात. मात्र पुरुष आणि महिला आत्महत्यांचा विचार केला तर महिलांच्या आत्महत्यांचा काही वेगळा पॅटर्न दिसतो का? राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची नोंद सांगते की २०२१ मध्ये ४५०२६ महिलांनी आत्महत्या केली. त्यापैकी २३००० महिला गृहिणी होत्या. गृहिणींना कसला स्ट्रेस असतो, त्या काय छळाला सामोऱ्या जातात याची काही नोंद घेतली जाते का?

(Image : google)

१० सप्टेंबर (suicide prevention day 2023) अर्थात आत्महत्या प्रतिबंधक दिन. यंदा या दिवसाची थिम आहे क्रिएटिंग होप थ्रू ॲक्शन. (Creating Hope Through Action) हजार शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. आणि या वर्षीची थिम हेच सांगते की संवाद आणि कृती यावर भर द्यायला हवा.
महिलांच्या आत्महत्या आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात ही गोष्ट तर अत्यंत आवश्यक आहे.
गृहिणी असलेल्या महिलांनी आत्महत्या केली त्याची कारणं काय दिसतात?
सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरातली भांडणं. आजारपण. लग्नातलं अपयश किंवा वैवाहिक छळ आणि आर्थिक परिस्थिती.
महिलांच्या संदर्भात आर्थिक परिस्थिती हे कारण शेवटी दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे गृहकलह.
घरातल्या कटकटी. वैवाहिक नात्यात होणारी फसवणूक किंवा जाच.
एकतर महिलांना येणारे डिप्रेशन, त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि एकटेपण यासाऱ्याकडे आपल्या समाजात अत्यंत दुर्लक्ष होते. महिलांच्या शारीरिक आजारपणाकडेच जिथे फार लक्ष दिले जात नाही तिथे मनाचे आजार कोण बोलणार?
आणि त्याचा परिणाम असा होतो की बायकांची मानसिक स्थिती ढासळते आणि त्याकडे कुणाचं लक्षही जात नाही.
आत्महत्या प्रतिबंधन दिनाची चर्चा करताना ही आकडेवारी डोळ्यासमोर हवी. आत्महत्या करणाऱ्या महिलांची आकडेवारी पाहिली तर देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संवाद आणि सहानूभूती यासह हा प्रश्न गंभीरपणेच घेण्याची गरज आहे.

Web Title: suicide prevention day 2023 : Why do women commit suicide? Creating Hope Through Action..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.