Join us

नोकरी करणाऱ्या महिलांना पोखरतोय सूपर वुमन सिंड्रोम, रिसर्चचा दावा - बायकांच्या आयुष्यात कलकलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 17:15 IST

Super Women Syndrome is More in Working Women’s according to Survey : सार्वजनिक-सामाजिक जीवनात सक्रियपण गुंतलेल्या महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण जास्त असते.

सूपर वुमन असण्याचा अट्टाहास वाढत गेला की त्याचे अडचणीत रुपांतर होते. मग ही समस्या एखाद्या सिंड्रोमप्रमाणे गंभीर बनत जाते. नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण जास्त घातक असते. ३० ते ५० या वयोगटातील ७२० महिलांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. सुपर वूमन सिंड्रोममुळे उच्च पातळीचा ताण आणि वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष होते. थकवा, चिंता, नैराश्य, निद्रानाश आणि डोकेदुखी ही काही त्रासदायक लक्षणे आहेत जी सामान्यतः या सिंड्रोमने पीडित व्यक्तींमध्ये आढळतात. स्त्रिया बहुतांशवेळा त्यांच्या मल्टीटास्किंग क्षमतेसाठी ओळखल्या जातात, अनेकदा त्यांना स्वत:लाही त्याचा अभिमान वाटतो. मात्र अशाप्रकारे मल्टीटास्किंग करणे त्यांना शारीरिक आणि मानसिकरित्या थकवणारे असते (Super Women Syndrome is More in Working Women’s according to Survey). 

(Image : Google)

आधुनिक जग महिलांवर प्रचंड ताण आणते कारण त्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. उद्दिष्टे साध्य करण्याची आणि नोकरीवरच्या गोष्टी पूर्ण करण्याची मोहीम, तसेच कुटुंबांप्रती असणारी वचनबद्धता यामुळे महिलांना दडपल्यासारखे वाटते आणि काही वेळा त्यांच्याही नकळत त्यांच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त काम केले जाते. साधारणपणे कोणत्याही वयोगटातील महिला या समस्येला बळी पडू शकते. पण नोकरी करणारी किंवा सार्वजनिक-सामाजिक जीवनात सक्रियपण गुंतलेल्या महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण जास्त असते. 

(Image : Google)

याबाबत सर्वेक्षण करणारे प्राध्यापक डिंपल रमाणी म्हणाले, सर्वेक्षण केलेल्या ६० ते ९० टक्के महिलांमध्ये सुपर वूमन सिंड्रोम असल्याचे दिसते. सौराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.  त्यातील नोकरी करणाऱ्या ७२ टक्के महिलांमध्ये हा त्रास असल्याचे दिसून आले. एका टप्प्यावर महिलांच्या स्वत:कडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या त्यांच्याही नकळत अनेकदा त्यांच्यावर लादल्याही जातात. सगळ्याच बाबतीत आपण परफेक्ट असावे अशी महिलांमध्ये असणारी किंवा निर्माण केली जाणारी भावना याला कारणीभूत असते.  

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्सआरोग्य