Lokmat Sakhi >Mental Health > सगळं ‘मी’च करणार, मला नाही चालत दुसऱ्याच्या हातचं ! - असं म्हणता तुम्ही?

सगळं ‘मी’च करणार, मला नाही चालत दुसऱ्याच्या हातचं ! - असं म्हणता तुम्ही?

आपण सूपरवूमन आहोत, आपण सगळं करू असं वाटतं का तुम्हाला, खरंखरं सांगा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:43 PM2021-03-13T17:43:53+5:302021-03-15T16:45:00+5:30

आपण सूपरवूमन आहोत, आपण सगळं करू असं वाटतं का तुम्हाला, खरंखरं सांगा.. 

superwoman, multitasking is it become stressful for you? | सगळं ‘मी’च करणार, मला नाही चालत दुसऱ्याच्या हातचं ! - असं म्हणता तुम्ही?

सगळं ‘मी’च करणार, मला नाही चालत दुसऱ्याच्या हातचं ! - असं म्हणता तुम्ही?

Highlightsस्वत:ची काळजी घ्या. या सगळ्या पसाऱ्यामध्ये स्त्री स्वत:ला हरवून बसते!

समिंदरा हर्डिकर-सावंत

आपली आजकी नारी  मल्टीटास्किंगमध्ये फारच चपळ! नोकरी व घर, ही तारे वरची कसरत ती प्रचंड लवचीकतेने आणि सहजतेने निभावून नेते. इतके की घरातील इतरांना ती किती गोष्टी आणि कशा मॅनेज  करते, याचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही! परंतु, हे करता करता तिची अनेक वेळा त्रेधातिरपिट उडते हे ही तितकेच खरे. केव्हातरी हा स्ट्रेस अति होतो, आणि विलक्षण कोंडल्यासारखे वाटू लागते.
प्रत्येक  स्त्री आपल्यापरीने या गोष्टी हाताळते. परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण सर्वच आत्मसात करून आपल्या दैनंदिन रुटीन माध्ये घालून त्याचा फायदा घेऊ शकतो. तर काय करता येईल.. 
१. आठवड्या भरचे एक वेळा पत्रक बनवा. रुटीनने बऱ्याच  गोष्टी सहज होऊन जातात. रुटीन मुळे आपल्याला तसेच घरच्यांना देखील एक साचा मिळतो,  एक आराखडा मिळतो व कधी काय अपेक्षित आहे हे स्पष्ट होऊन जाते.
२. थोडेसे प्लानिंग करा. आठवड्याचा मेनू, ऑफिसचे कपडे, मुलांचा अभ्यास हे सर्व आधी पासून विचारपूर्वक आपल्या योजून ठेवल्यास तुम्हाला अगदी सहज तुमची कामे मार्गी लावता येतील.

३. सूपरवूमन बनण्याचा ध्यास सोडा! उत्तम प्रकारे काम करण्याचा ध्यास असावा, पण त्याचा ताण होता कामा नये. जेव्हा तुम्ही एका वेळेला इतकी कामे करता, केव्हातरी, कुठेतरी चुका होणार. यासाठी मनाची तयारी करा. केव्हातरी घरच्यांना कॉम्प्रमाइज करावं लागणार, तर केव्हातरी कामाला! प्रत्येक वेळी आपण मात्र आपल्या परीने सर्व प्रयत्न करावे, एवढी काळजी आपण घ्यावी.
४. सगळी कामे मीच आणि मला हवी तशीच केली पाहिजेत असे काही नाही! शक्य तिथे कामे वाटा. यात घरातील इतर सदस्यांचा, हो अगदी मुलांचासुद्धा समावेश आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कुटुंबासाठी काहीतरी सहभागी होण्याची संधी द्या. समजूतदार जोडीदार तुम्हाला मिळाला तर उत्तमच, पण नाही मिळाला तर त्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करा. बोलून पहा शांतपणे.
५. स्वत:ची काळजी घ्या. या सगळ्या पसाऱ्यामध्ये स्त्री स्वत:ला हरवून बसते! असे होऊ देऊ नका. आपल्या शरीराची, प्रकृतीची, मानसिकतेची काळजी घेणे ही आपलीच जवाबदारी आहे. असे न केल्यास एवढे सर्व पार पाडणे तुम्हाले फारच कठीण जाऊ शकते.


(लेखिका कौन्सिलर आणि दिशा कौन्सिलिंग सेण्टरच्या संचालक आहेत.)
www.dishaforu.com
Samindara@dishaforu.com

Web Title: superwoman, multitasking is it become stressful for you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.