Lokmat Sakhi >Mental Health > शरीर डिटॉक्स होतं, मेंदूचं काय? सतत ताण आल्याने मेंदू होईल मंद, काम बंद..

शरीर डिटॉक्स होतं, मेंदूचं काय? सतत ताण आल्याने मेंदू होईल मंद, काम बंद..

The body is detoxed, what about the brain? : डोक्त साचलेले विचार ठरतात त्रासदायक. वेळीच सावरा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 19:01 IST2025-01-08T18:04:11+5:302025-01-08T19:01:55+5:30

The body is detoxed, what about the brain? : डोक्त साचलेले विचार ठरतात त्रासदायक. वेळीच सावरा.

The body is detoxed, what about the brain? | शरीर डिटॉक्स होतं, मेंदूचं काय? सतत ताण आल्याने मेंदू होईल मंद, काम बंद..

शरीर डिटॉक्स होतं, मेंदूचं काय? सतत ताण आल्याने मेंदू होईल मंद, काम बंद..

आजकाल डिटॉक्सिफिकेशन ही संकल्पना फार चर्चेत असते. त्यासाठी लोक वेगवेगळ्या डॉक्टर, जीमट्रेनर, डायटीशन यांनी सांगितलेले उपाय करत असतात.(The body is detoxed, what about the brain?) काही कंपन्या डिटॉक्स कीट वगैरे बनवतात. त्यांचासुद्धा वापर केला जातो. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे सोप्या शब्दात शरीराची स्वच्छता. बाह्य स्वच्छता नाही तर, पोट आतडी, रक्त प्रवाह या आतील प्रक्रिया सुरळीत चालाव्या म्हणून काही पदार्थांच्या मदतीने शरीरातील घाण बाहेर टाकायची पद्धत.(The body is detoxed, what about the brain?) शरीराचे डिटॉक्सिफिकेशन तर करता पण बुद्धीच, डोक्याच काय? त्यांनाही डिटॉक्सिफिकेशनची गरज असते. साठलेले विचार, तणाव यांना देखील बाहेर काढणे गरजेचे असते. यासाठी फार काही करावं लागत नाही. काही सोपे उपाय आहेत.(The body is detoxed, what about the brain?)

१. सकाळच्या कोवळ्या ऊन्हात फेरफटका मारा. शरीरासाठी हे ऊन महत्त्वाचे असते. शरीरातील सेरोटोनिन वाढवते.
२. गवतावर अनवाणी चाला. मऊ गवतावर चालल्याने पायावरील बिंदूंना आराम मिळतो. ज्याचा परिणाम बुद्धीवर होतो.
३. रोज थोडावेळ ध्यानस्थ बसा. ध्यान केल्याने डोकं शांत होतं. नको असलेल्या गोष्टी काढून टाकता येतात.  
४.528HZ या आवाजातील संगीत ऐका. त्यामुळे मेंदूच्या प्रक्रिया सक्रिय होतात. साउंड थेरीपीचे वर्ग आजकाल होतात. त्या वर्गांना जा. अगदीच काही नाही तर गाणी ऐकायला तर सगळ्यांना आवडतात. आवडीची गाणी ऐका. 
 ५.चांगला आहार घ्या फक्त शरीरालाच नाही तर मेंदुला देखील योग्य आहार लागतो. फळे खा. तुप खा. 

डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात. आजकालच्या लोकांकडे बघून आणखी एक उपाय गरजेचा ठरतो. तो म्हणजे थोडावेळ डिजिटल जगातून बाहेर पडणे. सोशल मिडिया विविध अत्याधुनिक साधने बाजूला सारून थोडावेळ गप्पा मारा. निसर्गात जा. हे फार गरजेचे आहे. मेंदूला आराम घ्या. जसे शरीराला झोपेची गरज असते. तशीच मेंदूला ही असते. सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांनी सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करा. त्याने बुद्धीला  चालना मिळते.

Web Title: The body is detoxed, what about the brain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.