'बॉडी डिटॉक्स' हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल. 'डिजिटल डिटॉक्स' हा देखील असाच एक प्रकार आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत चोवीस तास आपल्या हातात मोबाईल, लॅपटॉप यांसारखी अनेक गॅजेट्स असतात. हे गॅजेट्स वापरण्याच्या आपण इतके आहारी गेलेलो असतो की, आपण त्यांच्याशिवाय मिनिटभरही राहू शकत नाही. परंतु या सवयीचे एकूणच आपले आरोग्य आणि शरीरावर वाईट परिणाम झालेले दिसून येतात. आपले शरीर डिटॉक्स केल्याने त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या गोष्टींमुळे आपले शरीर डिटॉक्स ठेवण्यास अधिक मदत होते. अगदी त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'डिजिटल डिटॉक्स' करणे आवश्यक असते(4 Steps for How to Do a Digital Detox).
आजकाल सोशल मिडिया आणि मोबाईलचा (How to do a digital detox) वापर मोठ्या प्रमाणांत वाढला आहे. स्क्रिनवर सतत काम केल्याने किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्याने याचा फक्त डोळ्यांनाच त्रास होत नाही तर मानसिक आरोग्यावरही अधिक जास्त परिणाम होतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी डिजिटल गोष्टींपासून थोडे दूर राहणे गरजेचे असते. यासाठी डिजिटल डिटॉक्स कसे करावेत ते पाहूयात(Tips To Overcome Digital Burnout).
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ?
आपला फोन अगदी काही वेळ न मिळाल्यास आपल्याला अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागतो, फोन कुठे असेल याचं टेन्शन येऊ लागतं. वारंवार काही मिनिटांनंतर फोन चेक करण्याची आपल्याला सवय लागते. फोन चेक न केल्याने ट्रेंडबाहेर किंवा मागे पडण्याची भीती वाटते, असे प्रकार अनेकदा आपल्या सोबत घडतात, अशावेळी आपल्याला 'डिजिटल डिटॉक्स' करण्याची गरज आहे. सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर विनाकारण आपला वेळ वाया घालवत असतो. काही काम नसलं की फोन घेऊन पडून राहतो आणि सतत सोशल मीडिया चाळत बसतो. रोजरोज हेच काम केलं, की याची सवय लागते. ही सवय मोडण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉप यांसारख्या स्क्रिनपासूनकाही काळासाठी लांब राहणं आणि सोशल मीडिया अॅप्सचा वापर कमी करणं, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतो अगदी त्याचप्रमाणे सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा कोणत्याही स्क्रिन गॅजेट्सच्या आहारी जाणे हे देखील आपल्यासाठी घातक आहे.
नेहा भसीनला जगणं मुश्किल करणारा PMDD आजार नेमका आहे काय? मासिक पाळीचं भयंकर दुखणं...
१. स्क्रिन पासून काही काळ राहा दूर :- सतत मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या स्क्रिनचा वापर कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे 'डिजिटल डिटॉक्स' करणे. काही ठराविक वेळासाठी मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या स्क्रिनचा वापर कमी करणे किंवा त्यांच्यापासून दूर राहिल्याने मानसिक आरोग्य चांगले राखले जाते. आणि तुम्हाला पुन्हा चार्ज झाल्यासारखे वाटते. अशा मोकळ्या वेळात तुमचा आवडता छंद जोपासा किंवा कोणतीही अॅक्टिव्हिटी करा जी पूर्णपणे स्क्रीनमुक्त असेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फिरायला जाऊ शकता किंवा काही स्वयंपाक करू शकता किंवा झोपू शकता. २०१९ मध्ये सायकॅट्रिक रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, स्क्रीनपासून थोड्या काळासाठीही डिस्कनेक्ट राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारते.
२. रियल लाइफशी व्हा कनेक्ट :- प्रत्येकवेळी फोन कॉल, मेसेजेस, व्हिडीओ कॉल यांचा माध्यमातून कनेक्ट होण्यापेक्षा रियल लाइफशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. मित्र - मैत्रिणी, नातेवाईकांशी मोबाईल फोन द्वारे कनेक्ट होण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन भेटा. एकमेकांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करा. जर्नल ऑफ सोशल अँड क्लिनिकल सायकोलॉजी मधील 2018 मधील संशोधन सूचित करते की सोशल मीडियाचा कमी वापर केल्याने मूड आणि आरोग्य सुधारते.
सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...
३. २०-२०-२० नियम पाळा :- दिवसभर स्क्रीनकडे सतत पाहून आपले डोळे थकतात. यासाठी २०-२०-२० नियम पाळणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट कोणत्याही गॅजेट्स आणि स्क्रीनपासून दूर पहा. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो. या नियमाचे पालन करण्यासाठी आपण टायमर देखील सेट करू शकता.
४. चांगली झोप घ्या :- डिजिटल बर्नआउट टाळण्यासाठी झोप एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. स्क्रीनवरील निळा प्रकाश तुमची झोप खराब करतो. स्क्रीनमधून सतत येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपेला प्रेरित करणारे हार्मोन म्हणजेच मेलाटोनिनची पातळी कमी करते. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग यांच्या म्हणण्यानुसार, कमी झोपेमुळे स्ट्रेस वाढतो. त्यामुळे चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन पाहत असल्यास, निळा प्रकाश-अवरोधित चष्मा वापरा. तसेच, तुमच्या बेडरूमला स्क्रीन-फ्री झोन बनवा. झोपण्यापूर्वी फोनवर स्क्रोल करण्याऐवजी, ध्यान करा.