Lokmat Sakhi >Mental Health > दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी; रात्रीपर्यंत राहाल फ्रेश

दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी; रात्रीपर्यंत राहाल फ्रेश

3 Simple tips to be Energetic throughout the day : मनाची भिंगरी झोपताना का थांबत नाही? कारण दिवसभरात आपण मनाच्या भिंगरी कडे लक्षच देत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 10:50 AM2022-08-15T10:50:19+5:302022-08-15T10:55:01+5:30

3 Simple tips to be Energetic throughout the day : मनाची भिंगरी झोपताना का थांबत नाही? कारण दिवसभरात आपण मनाच्या भिंगरी कडे लक्षच देत नाही.

To stay energetic throughout the day, just do 3 things; Stay fresh till night | दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी; रात्रीपर्यंत राहाल फ्रेश

दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर करा फक्त ३ गोष्टी; रात्रीपर्यंत राहाल फ्रेश

Highlightsआपले मन शांत व्हायला नक्की मदत होईल. मन शांत झाले तर पटकन गाढ झोप येईल. दुपारचा थोडासा काळ उत्साह टिकवण्यासाठी ही ऊर्जा कामी येईल. याला आपण टॉप अप रिचार्ज म्हणू शकतो.  

सुचेता कडेठाणकर 

सकाळी उठलो की पायाला भिंगरी लावावी त्याप्रमाणे एका पाठोपाठ एक अशी कामं करत दिवस कसा जातो ते कळत नाही. पण मग दिवसाच्या शेवटी म्हणजे अगदी झोपताना, काय होतं? तर दिवसभर पायाला आणि हाताला लागलेली भिंगरी, अंथरुणात पडल्यावर जरी थांबली, तरी मनाची भिंगरी काही थांबत नाही. विचार येत राहतात आणि अंथरुणावर पडलो तरी झोप काही येत नाही. किंवा याच्या अगदी उलट होतं. दिवसाच्या शेवटी शरीर इतकं थकून गेलेलं असतं की झोप लगेच लागते पण मग कितीही झोपले तरी झोप पूर्ण झाली असं वाटत नाही आणि सकाळी उठताना आपण ताजेतवाने नसतो (3 Simple tips to be Energetic throughout the day). 

हे टाळण्यासाठी काय करता येईल? 

हातापायाची भिंगरी थांबली तरी मनाची भिंगरी झोपताना का थांबत नाही? कारण दिवसभरात आपण मनाच्या भिंगरी कडे लक्षच देत नाही. हातापायाची भिंगरी दिसते, कळते, तिची जाणीव असते. पण मनाच्या भिंगरीची मात्र जाणीव नसते. कोणतेही काम करताना, मनात विचारांचे वेगवेगळे कमीतकमी १००० ट्रॅक्स सुरूच असतात. आपल्याला ज्या गतीची जाणीव असते, ती गती आपण कमी करू शकतो किंवा थांबवू शकतो. जी गती समजतच नाही ती कशी थांबवणार? म्हणून शरीराची गती आपण कमी करू शकतो, थांबवू शकतो, मनाची नाही. 

मनाची गती कमी करायची तर काय करायचं? 

१. झोपेतून उठल्यावर

सकाळी जाग आली की तडक अंथरुणातून उठायला नको. उशीर झालाय असं वाटतं असेल तरीही डोळे उघडल्यावर अंथरुणात काही काळ घालवू. थोडं स्ट्रेचिंग करु. घोटे, पायाची बोटं, मनगट, हाताची बोटं मस्त ताणून मग उठून बसू. बसल्यावर पूर्ण हात वर ताणून थोडीशी कंबर स्ट्रेच करू. अगदी १०-२० सेकंद मस्त डोळे मिटून बसू. आपल्या दिवसभराचा पट झर्रकन डोळ्यासमोर आणू. दिवसभराच्या विविध गोष्टींसाठी  सकाळी ऊर्जा जमा करणे महत्वाचं आहे. 

२. दुपारी हे अवश्य करा

दिवसाचा मध्य म्हणजे साधारण १२ ते ३ ची वेळ. यामध्ये एक गोष्ट नक्की करता येते. करून बघितली तरच त्याचा परिणाम आणि महत्त्व कळेल. दुपारच्या जेवणाच्या आधी फक्त पाच मिनिटे पुन्हा एकदा डोळे मिटून बसू. डोळे मिटून काय करायचं? तर श्र्वासाचा आवाज ऐकायचा आणि प्रत्येक श्वास मोजायचा. कदाचित सलग पाच मिनिटे श्वास मोजता नाही येणार. मध्येच मनाची भिंगरी फिरायला लागेल आणि दुसरीकडे लक्ष जाईल. पण दुसरीकडे लक्ष गेलेलं समजलं की पुन्हा श्वासावर आणायचं. पुन्हा पहिल्यापासून श्वास मोजायचे. अतिशय सोपी असलेली ही क्रिया करुन पाहिल्याशिवाय त्यातली गंमत कळणार नाही. दुपारचे जेवण नीट पचवणे, त्यानंतर दुपारचा थोडासा काळ उत्साह टिकवण्यासाठी ही ऊर्जा कामी येईल. याला आपण टॉप अप रिचार्ज म्हणू शकतो.  

(Image : Google)
(Image : Google)

३. झोपताना काय कराल?

दिवसाचा शेवट म्हणजे, झोपायच्या आधीची वेळ. पुन्हा एकदा पाच मिनिटे डोळे मिटून स्वस्थ बसून  गेलेल्या दिवसाचा पट झर्रकन डोळ्यासमोर आणू. आपल्या मनाच्या लॅपटॉपवर काही अॅप्लिकेशन्स किंवा विंडोज ओपन असतील. तर त्या आजच्या रात्रीसाठी बंद करू. हे करताना डोळे जरुर मिटायचे. उद्या सकाळी उठून पुन्हा एकदा डोळे मिटून बंद केलेल्या विंडो ओपन करु, तोवर मात्र बंद म्हणजे बंद. यामुळे आपले मन शांत व्हायला नक्की मदत होईल. मन शांत झाले तर पटकन गाढ झोप येईल. 

(लेखिका योग आणि फिटनेसतज्ज्ञ आहेत)
sucheta@kohamfit.com

 

Web Title: To stay energetic throughout the day, just do 3 things; Stay fresh till night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.