लहान मुलांचे नखरे, त्यांचे एक्सप्रेशन्स सगळ्यांनाच खूप आवडतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलीनं पहिल्यांदाच कोका-कोला टेस्ट केला आहे. तिची प्रतिक्रिया पाहून नेटिझन्सना वेड लागलं आहे. Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही चिमुरडी तिच्या पालकांसोबत मॅकडोनाल्ड आऊटलेटमध्ये होती. जिथे तिला कोका-कोलाचा पहिला ग्लास देण्यात आला.
तिने स्ट्रॉ च्या साहाय्याने एक घोट घेतला आणि मग ती थक्क झाली. ड्रिंकच्या थंडगार गोड चवीनं ती चकीत झाली आणि तिने चव कशी आहे ते पाहण्यासाठी छोडा वेळ घेतला आणि ती हसली. तिची गमतीदार रिएक्शन पाहून तिला हे पेय खूप आवडलंय असं दिसून येतं.
इंटरनेटच्या एका वर्गाला हा व्हिडिओ अतिशय गोंडस वाटला, तर इतरांनी निदर्शनास आणून दिलं की कोका कोला लहान मुलांना देऊ नये. आतापर्यंत ४२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
भोकाड पसरून रडणारं बाळ डोक्यावर चीज स्लाइस ठेवताच हसलं
रडणाऱ्या बाळाचा एक क्यूट व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. चीज स्लाईस डोक्यावर ठेवल्यामुळे बाळ रडायचे थांबले असे आपल्याला कोणी सांगितले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण खरंच असं घडलं. जोरजोरात रडणाऱ्या बाळाच्या टकलूवर त्याच्या आईने चीज स्लाईस टाकला आणि भोकाड पसरुन रडणारे बाळ एकाएकी रडायचे थांबले.
फोटोत एक बाळ आपल्या बाबांच्या मांडीत बसल्याचे दिसत आहे. ते रडत असल्यामुळे बाबा त्याला हसवत आहेत. पण काही केल्या ते थांबायचे नाव घेत नाही. तितक्यात तिकडून एक व्यक्ती एक चीज स्लाईस बाळाच्या दिशेने फेकते आणि हा स्लाईस बाळाच्या डोक्यावर पडतो. या घटनेनंतर बाळ अचानक रडायचे थांबते आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दिसायला लागतात. रेडडिट यावर हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला असून क्रिस किर्बी ८६ या अकाऊंटवरुन तो पोस्ट करण्यात आला आहे.