जीवनात यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी, प्रॉडक्टिव रूटीन असणे गरजेचं आहे. पण, यशस्वी म्हणजे काय? तर, आपण ठरवलेलं ध्येय साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. अनेकदा ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या घडत नाही. अशावेळी व्यक्ती खचतो. पण तरीही न हार मानता उठून पुन्हा लढतो तो खरा यशस्वी होतो. यशासाठी शिस्त, चांगल्या सवयी आणि दृढनिश्चय असणे आवश्यक आहे.
यशस्वी थोर व्यक्तींचे दिनचर्य ठरलेले असते. जे ते न चुकता पाळतात. आपण देखील आपल्या दिनचर्यात या तीन गोष्टींचा समावेश करू शकता. ज्यामुळे आपण आपल्या जीवनात आनंदित तर राहाल यासह यश प्राप्त करण्यास मार्गही सापडेल. हॉवर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, ''प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी यासह यश साध्य करण्यासाठी, आपले एक रुटीन फिक्स केले पाहिजे. यासह आपली तणाव पातळी देखील कमी केली पाहिजे. जेणेकरून आपले लक्ष विचलित होणार नाही''(Top 3 Motivational Mantras For Success).
ब्रेन डाउनलोडिंग
ब्रेन डाउनलोडिंग पहिल्या टप्प्यात येते, जिथे आपल्या मनात सुरू असलेल्या गोष्टी डाउनलोड कराव्या लागतात. उदारणार्थ, कल्पना, नियोजन, प्रकल्प आणि लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, याची एक लिस्ट तयार करायला हवी.
वाढलेली शुगरच नाही तर स्ट्रेसदेखील ठरतो सर्वात मोठा शत्रू, डायबिटिस असेल तर सावधान..
प्राधान्य देणे
या रुटीनमधील दुसरा स्टेप म्हणजे प्राधान्य देणे. जेव्हा आपण ब्रेन डाउनलोडिंग करता तेव्हा, इतर गोष्टींचा आढावा घेण्याबरोबरच कोणती गोष्ट किती महत्वाची आहे, याची माहिती काढा. यानंतर सर्वात महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. एकाच वेळी अनेक कामं करू नका. यामुळे आपले दिवसभरातील सगळी कामं न चुकता पूर्ण होतील.
कांदा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते का? संशोधन सांगते..
नियोजन
वेळेनुसार प्रत्येक टप्पा विभागून घ्या. जेणेकरून प्रत्येक कामाला पुरेसा ठराविक वेळ मिळेल. मात्र, कामासोबतच व्यायाम, जेवण आणि विश्रांतीसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, ही सवय आपल्याला केवळ प्रॉडक्टिव बनवणार नाही तर, आनंदी देखील बनवेल. या सवयीमुळे दिवसभरातील आव्हानांसाठी मानसिकदृष्ट्या आपण तयार व्हाल.