बॉलीवूडचा एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री वाणी कपूर. अभिनयाची किंवा चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी तिला नाही. पण व्हायचं तर अभिनेत्रीच व्हायचं हे तिचं पक्कं ठरलं होतं. तिने बॉलीवूडच्या चंदेरी झगमगत्या दुनियेत यावं, हे तिच्या पालकांना अजिबात पटलेलं नव्हतं. तरी त्यांचा विरोध पचवून ती इथे आली आणि भक्कमपणे पाय रोवून उभी राहिली. स्वत:ची ओळख बनवली. पण तिचा हा प्रवास अजिबात सोपा नाही. तिला यश मिळालं तसं तिने इथलं अपयशही पचवलं. अपयशी झाल्यावर, मनासारख्या गोष्टी घडून न आल्यावर तिने स्वत:ला कसं सांभाळलं याविषयी तिनेच सांगितलेल्या या काही गोष्टी नक्की वाचा... (Vaani Kapoor Reveals How She Deal With Failure)
कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कामात आपण अपयशी होणारच, प्रत्येकवेळी मनासारख्या गाेष्टी घडतील, असं मुळीच नाही. मग ते तुमचं करिअर असो किंवा मग नातेसंबंध असो.
असं काही झालं की निराश होणं, वाईट वाटणं साहजिक आहे. पण तेच मनात घट्ट धरून कुढत बसणं चुकीचं आहे. म्हणूनच हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वाणी कपूर सांगते की अपयश कसं पचवायचं हे मी आताच शिकले आहे, अजून शिकते आहे. अपयश आलं तर त्याच्याशी स्वत:ला खूप जोडून घेऊ नका, त्यापासून जे काय शिकण्यासारखं आहे ती शिका आणि त्याचा विचार मनातून काढून टाका.
तुम्ही त्यामध्ये मानसिकदृष्ट्या अडकून राहिलात तर त्याचा त्रास होणारच.
गळ्यात सोन्याची चेन- मंगळसूत्र घालता पण हूक निसटून ते कुठं पडलं तर? १ भन्नाट ट्रिक
वाणी म्हणते अपयशाचा विचार करण्यापेक्षा मी नेहमीच करिअरमध्ये आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातही आहे त्यापेक्षा आणखी उत्तम कशी होऊ शकते, याचा विचार करत असते. माझ्या मते शिकत राहाणे हा एक मोठा प्रवास असून मी तो नेहमीच करत असते. वाणी जे काय सांगते आहे, ते प्रत्येकालाच स्वत:च्या आयुष्यात कधी ना कधी खूप उपयुक्त ठरणारे आहे.