Lokmat Sakhi >Mental Health > नको जीव झालाय, माझंच नशिब फुटकं! ‘असं’ म्हणत तुम्ही स्वत:वर चिडलात, खरंच लोक तुम्हाला छळतात..

नको जीव झालाय, माझंच नशिब फुटकं! ‘असं’ म्हणत तुम्ही स्वत:वर चिडलात, खरंच लोक तुम्हाला छळतात..

आपण मनात कुढत राहिलो तर आपल्या न होणाऱ्या प्रगतीला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 05:51 PM2024-11-08T17:51:51+5:302024-11-08T18:06:06+5:30

आपण मनात कुढत राहिलो तर आपल्या न होणाऱ्या प्रगतीला जबाबदार कोण?

victimhood and to blame others, what's the solution for the good life | नको जीव झालाय, माझंच नशिब फुटकं! ‘असं’ म्हणत तुम्ही स्वत:वर चिडलात, खरंच लोक तुम्हाला छळतात..

नको जीव झालाय, माझंच नशिब फुटकं! ‘असं’ म्हणत तुम्ही स्वत:वर चिडलात, खरंच लोक तुम्हाला छळतात..

Highlightsइतरांना दोष न देता जे स्वत:च्या आवाक्यात आहे ते तरी करुच. त्यातून आपल्याला आपला मार्ग सापडेल.

विचार करकरुन डोकं फुटलं पण टेंशनच फार येतं असं अनेकजणी सांगतात. म्हणजे प्रवासाला जाण्यापूर्वीच सिग्नल किती लागणार आणि वाटेत गाडी पंक्चरच झाली तर काय करणार? थोडक्यात काय तर लहान गोष्टींचा घरबसल्या मोठा बाऊ करायचा. प्रत्येक गोष्टीत सगळी कचकच, त्यात खूप अडकून जायचं. कारणं सांगायची. कामं टाळायची किंवा मग मी बाई बिचारीचं कार्ड खेळायचं. आणि मग मनातल्या मनात घुसमटत रहायचं, कुढायचं. बसल्या जागी चिंताच चिंता. 

एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर जायच्या आधीच तिथे आपल्याला रिजेक्टच करतील, आपली फजितीच होईल अशा कल्पना करायच्या. अमुक कोणी व्यक्ती आली मुलाखत घ्यायला, तर तिला आपण मुळातच आवडत नाही. ते आपल्याला कधीच निवडणार नाहीत. आपण नीट दिसतच नाही. आपल्याला नीट बोलताच येणार नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला मनातच खात असतात. एखादा विषय अवघडच आहे. तो आपल्याला कधीच जमणार नाही. घरातून निघतांना अमुक झालं, तर तमुकच होईल. एखादी व्यक्ती समोर आली तर ती आपल्याला अनलकीच आहे. आता दिवस असा सुरू झाला, तर हा दिवसच वाईट आहे. असे एक ना अनेक प्रकार.

(Photo : google)

काय करता येईल?

१. आपल्याच शरीर-मनावर ह्या अति काळजीचा वाईट परिणाम होतो.  नुसत्याच कल्पना, निगेटिव्ह विचार आणि मनात नुसताच काहूर. यांना ब्रेक द्यायला हवा. 
आपल्या मनात नेमकी कशाची भीती बसली आहे, याचा विचार करू या का?
२. आपलं नशीबच चांगलं नाही, या रडगाण्यापलिकडे जाऊन स्वतःचा विचार करू. 
३. आपल्याला कशाकशाची भीती वाटते, कशाची अति काळजी वाटते, ते स्वतःलाच विचारू. 
४. आपल्याला ज्या गोष्टीची, विषयांची, माणसांची आणि चांगल्या कृतीची भीती बसली आहे, त्यांची एक यादी तयार करू. 
५. म्हणू की नेहमीच थोडी आपल्या मनासारखं होतं? कधी असं, कधी तसं.
६. आपण कृती करु. इतरांना दोष न देता जे स्वत:च्या आवाक्यात आहे ते तरी करुच. त्यातून आपल्याला आपला मार्ग सापडेल.
 

Web Title: victimhood and to blame others, what's the solution for the good life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.