Lokmat Sakhi >Mental Health > सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला

सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला

Vikas Divyakirti Shared Quality Of True Friend : आजकालच्या मतलबी दुनिया जास्तीत जास्त नाती स्वार्थासाठी जोडली जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:28 PM2024-08-11T18:28:38+5:302024-08-12T12:51:28+5:30

Vikas Divyakirti Shared Quality Of True Friend : आजकालच्या मतलबी दुनिया जास्तीत जास्त नाती स्वार्थासाठी जोडली जातात.

Vikas Divyakirti Shared Quality Of True Friend Identify Notice These Habits Before Making Friendship | सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला

सच्चे मित्र कोणते आणि कामापुरता मामा कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात सोपा फॉर्म्युला

व्यक्तीचा खरा मित्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आधार असतो ज्यामुळे चूक बरोबर यातील फरक कळतो आणि पावलोपावली तुम्हाला त्याची साथ  मिळते. या स्वार्थी जगात चांगले मित्र आणि धोकेबाज मित्र यांची ओळख पटायला हवी. अन्यथा आयुष्य चांगले असूनही खराब  झाल्यासारखे  आहे. असं अजिबात गरजेंच नाही की मैत्री फक्त घराच्या बाहेर असते. अनेकदा बहिण, भाऊ, आई-वडील यांच्यातही सुंदर नात्याची झलक पाहायला मिळते. पण तुम्हाला ही मैत्री कळायला हवी तरंच यातला फरक कळेल. (Vikas Divyakirti Shared Quality Of True Friend Identify Notice These Habits Before Making Friendship)

घरातसुद्धा मैत्रीचं नातं बनवू शकता

खऱ्या मित्रांची ओळख करण्यासाठी तुम्हाला एकाच व्यक्तीमध्ये ही क्वालिटी पाहायला हवी की  ते तुमच्याशी कोणतीही गोष्ट शेअर करायला  घाबरत नाहीत.  जेव्हा तुम्ही  त्या व्यक्तीशी काही शेअर करतात तेव्हा तुम्हाला जज न करता समजून घ्यायला हवं. एकमेकांच्या यशाचा आनंद घेता यायला हवा. जळण्याची प्रवृत्ती असू नये. आजकालच्या मतलबी दुनिया जास्तीत जास्त नाती स्वार्थासाठी जोडली जातात. मैत्रीच्या नात्यात व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून कोणतीच लालसा नसते. फक्त एकमेकांचा कठीण काळात साथ देतात. 

एका चांगल्या मित्रावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. तुमची मैत्री चांगली असेल  तर व्यक्ती पूर्ण जगाशी लढू शकते. तुमच्या नात्यात किती ताकद आहे ते संकटकाळी कळून येते. असं म्हटलं जातं की कौतुक तेच असतं जे मागे केलं जातं. एक चांगला मित्र फक्त तोंडावर तुमचे कौतुक करत नाही तर मागेसुद्धा कौतुक करतो. ज्या  नात्यांमध्ये खरेपणा नसतो तेथे मित्राच्या मागे त्याबद्दल चुकीचे बोलेले जाते.

तुळस वाळली-पानं कमी काड्यांचीच गर्दी? किचनमधली १ वस्तू कुंडीत घाला, भराभर वाढेल तुळस

मैत्री करताना कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये नेहमी सावध राहायला हवं. तुम्हाला जे लोक तुमचे चांगले मित्र आहेत असं वाटतं  ते खरोखरच चांगले आहेत का तुमच्याशी खरं बोलतात का, तुमच्याबद्दल मागे काही बोलतात का ते समजून घ्यायला हवं.

Web Title: Vikas Divyakirti Shared Quality Of True Friend Identify Notice These Habits Before Making Friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.