Lokmat Sakhi >Mental Health > नव्या वर्षात स्ट्रेस फ्री रहायचंय? ४ मंत्र, निदान येत्या वर्षात तरी राहा आनंदी, जगा मनासारखं..

नव्या वर्षात स्ट्रेस फ्री रहायचंय? ४ मंत्र, निदान येत्या वर्षात तरी राहा आनंदी, जगा मनासारखं..

Be Stress-free from Day to Day Life रोजचं जगणं अत्यंत रटाळ, निरस झालं म्हणून आपण जगणं विसरुन केवळ चिंता करुन कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 03:48 PM2022-12-23T15:48:19+5:302022-12-23T15:49:42+5:30

Be Stress-free from Day to Day Life रोजचं जगणं अत्यंत रटाळ, निरस झालं म्हणून आपण जगणं विसरुन केवळ चिंता करुन कसं चालेल?

Want to be stress free in the new year? 4 mantras, at least in the coming year, be happy, live as you like.. | नव्या वर्षात स्ट्रेस फ्री रहायचंय? ४ मंत्र, निदान येत्या वर्षात तरी राहा आनंदी, जगा मनासारखं..

नव्या वर्षात स्ट्रेस फ्री रहायचंय? ४ मंत्र, निदान येत्या वर्षात तरी राहा आनंदी, जगा मनासारखं..

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्ट्रेस आहेच. कोणाला कामाचं तर कोणाला घरचं. २०२२ या वर्षात स्ट्रेस या कारणामुळे कित्येकांचा जीव गेला आहे. कोरोना या वैश्विक महामारीत अनेकांना स्ट्रेस या आजाराला सामोरे जावे लागत होते. प्रत्येकाला आता आपल्या जीवाची किंमत कळली आहे. त्यामुळे जो तो आपल्या जीवाची योग्य ती काळजी घेत आहे. जर आपल्याला आध्यात्मिक समाधान आणि शांती मिळवायची असेल तर आपण ध्यान आणि आध्यात्मिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. योग आणि इतर क्रिया आपले मन मजबूत करतात. यासोबतच आपले मनही शांत राहते. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा आपण कोणताही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो. अक्षर योग संस्थेचे संस्थापक हिमालयन सिद्ध अक्षर म्हणतात की योग केल्याने आपले मन मजबूत आणि शांत होते.

मेडिटेट करा

लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यान हा एक अतिशय शक्तिशाली पर्याय मानला जातो. सरावामुळे आपण स्वतःमध्ये जागरूकता विकसित करू शकता. जेव्हा आपले मन शांत आणि स्थिर असेल, तेव्हा ध्यान देखील अधिक होईल. ध्यान केल्याने आपल्याला आपला उद्देश शोधण्यासाठी किंवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळेल.

प्राणायामला करा दिनचर्यात सामील

रोज प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. प्राणायामचा मुख्य उद्देश शरीरातील उर्जेचे मुख्य स्त्रोत शुद्ध करणे हा आहे. शांती देण्यासोबतच मनाची एकाग्रता वाढवण्यासही हे उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त, प्राणायाम केल्याने शरीरातील चैतन्य वाढते यासह तणाव - चिंतेची पातळी कमी होते.

स्वतःला शिस्त लावा

मन शांत राहिल्यावर आपण न थांबता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. यासाठी तुम्ही स्वतःला शिस्त लावणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन कामांची यादी तयार करा आणि ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक राहा

सकारात्मक राहून आपण आपले जीवन बदलू शकता. यासाठी आपण आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्या मनावर नकारात्मकता हावी होऊ देऊ नका. यासोबतच आपण आपल्या सवयी कालानुरूप बदलत राहायला हव्यात.

Web Title: Want to be stress free in the new year? 4 mantras, at least in the coming year, be happy, live as you like..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.