Lokmat Sakhi >Mental Health > आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र

आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र

Tips for building self-confidence समाजात मान-सन्मान मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण यासाठी तुम्हाला स्वतःवरही काम करावे लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 01:25 PM2023-02-02T13:25:18+5:302023-02-02T13:32:28+5:30

Tips for building self-confidence समाजात मान-सन्मान मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण यासाठी तुम्हाला स्वतःवरही काम करावे लागेल.

Want to gain confidence? Learn 7 things to earn the respect of others | आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र

आत्मविश्वास कमवायचा आहे? ७ गोष्टी शिकून घ्या, ठराल इतरांच्या आदरास पात्र

एखाद्या व्यक्तीला आदर प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. पण ते गमवायला एक क्षण किंवा एक चूक देखील भारी पडू शकते. आदर आणि सन्मान हा उगाच कोणाला आपण देत नाही. त्याचे कर्तृत्व आणि व्यक्तीचा स्वभाव हा महत्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला घरात, ऑफिस, अथवा मित्रांमध्ये योग्य सन्मान मिळावा. त्याच्या कामाचे कौतुक व्हावे. मात्र, तो यथोचित सन्मान प्राप्त करण्यासाठी बराच कालावधी हा जातोच. यासाठी स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे महत्वाचे आहे. यासह दुसऱ्याला सन्मान देणे देखील आवश्यक आहे. स्वतःवरील  आत्मविश्वास आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी काही टिप्स आपल्याला मदत करतील.

सन्मान प्राप्त करण्यासाठी या ७ टिप्स करतील मदत

- एखाद्या व्यक्तीकडून आदर मिळवायचा असेल तर आधी स्वतःचा आदर करायला शिका. स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. मात्र, तो स्वाभिमान अहंकार बनता कामा नये. अहंकार माणसाचा क्षत्रू आहे. अहंकार आपल्या कर्तृत्व आणि आपण केलेल्या कामाला खाली पाडू शकते. त्यामुळे सेल्फ - रिस्पेक्ट महत्वाचा आहे. 

- माणसाने रागाला नियंत्रित ठेवायला शिकायला हवे. राग हा माणसाचा वैरी आहे. रागामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. यासह रागात बोलेले शब्द माणसाच्या मनावर घाव घालतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. रागावर कंट्रोल ठेऊन आपला मुद्दा मांडा. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका.

- जर समोरचा व्यक्ती बोलत असेल तर, त्याचे नीट बोलणे ऐकून घ्यावे. त्यांच्या बोलण्याला मध्येच टाळू नये. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व द्यावे. याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या प्रती आदर निर्माण होते. संवादा दरम्यान कॉन्फिडेंसने बोला. याने आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो.

- व्यक्तिमत्व विकासात कौशल्याला खूप महत्त्व आहे. तुमच्या व्यस्त शेड्युलमधून स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि तुमचे कौशल्य वाढेल असे काहीतरी आवडती गोष्ट करा. यामध्ये बुद्धिबळ खेळणे, गाणे, नृत्य आणि चित्र काढणे इ. आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, यासह तुमचा स्वाभिमानही वाढतो.

- आपल्या अपयशाबद्दल सारखे विचार करू नये. तसेच ज्या चुकीसाठी तुमचा खूप अपमान झाला आहे त्याबद्दल जास्त विचार करू नका. फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ते काम स्वत: चांगले करा. यामुळे तुम्हाला तुमचा हरवलेला आदर आणि आत्मविश्वास मिळेल.

- प्रत्येकाला कोणती न कोणती वाईट सवय असते. मात्र, ती वाईट सवय आपल्या यशावर हावी नाही होणार याची काळजी घ्या. व ती वाईट सवयी लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला एक चांगले आणि आदरणीय व्यक्ती बनण्यास मदत करेल.

- जीवनात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत करा. तुम्हाला ते काम पूर्ण करायचे आहे असा विचार करत बसू नका. त्यावरही काम करा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. अशा विचारसरणीमुळे लोकं प्रभावित होतात.

Web Title: Want to gain confidence? Learn 7 things to earn the respect of others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.