Lokmat Sakhi >Mental Health > सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो..

सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो..

Childhood Trauma: चाइल्डहुड ट्रॉमा मुलांमध्ये डिप्रेशनचं कारण ठरतो. त्यामुळे अशी मुलं त्यांच्याच वेगळ्या विश्वात राहणं पसंत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:13 IST2025-03-03T15:47:00+5:302025-03-04T16:13:06+5:30

Childhood Trauma: चाइल्डहुड ट्रॉमा मुलांमध्ये डिप्रेशनचं कारण ठरतो. त्यामुळे अशी मुलं त्यांच्याच वेगळ्या विश्वात राहणं पसंत करतात.

What is Childhood Trauma and How to Overcome from it | सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो..

सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो..

How to Overcome Childhood Trauma: बालपणी अनेक मुला-मुलींना वेगवेगळे वाईट अनुभव येत असतात किंवा त्यांच्यासोबत अशा काही घटना घडलेल्या असतात की, त्यांच्या मनावर खोलवर आघात होतो. जेव्हा बालपणी आलेल्या एखाद्या वाईट अनुभवाचा प्रभाव मोठे झाल्यावर पडतो तेव्हा त्याला चाइल्डहूड ट्रॉमा (Childhood Trauma) म्हटलं जातं. ही समस्या बालपणी झालेल्या फिजिकल, सेक्शुअल किंवा मानसिक शोषणामुळे होऊ शकते. मुलांना मारहाण करणं किंवा लैंगिक शोषण केल्यास त्यांच्या मनावर आणि मेंदुवर खोलवर प्रभाव पडतो. ज्याचा नकात्मक प्रभाव त्यांना आयुष्यभर सहन करावा लागतो. त्यामुळे मोठे झाल्यावरही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चाइल्डहूड ट्रॉमा मुलांमध्ये डिप्रेशनचं कारण ठरतो. त्यामुळे अशी मुलं त्यांच्याच वेगळ्या विश्वात राहणं पसंत करतात.

चाइल्डहूड ट्रॉमाची लक्षण (Symptoms of Childhood Trauma in Adulthood)

कोणतीही व्यक्ती चाइल्डहूड ट्रॉमामध्ये आहे की नाही हे काही लक्षणांवरून दिसून येतं. या स्थितीत व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तींसोबत इमोशनल पद्धतीनं जुळण्याशी समस्या येते. अशी व्यक्ती नेहमीच आपल्या विश्वात हरवून असते. ते कुणामध्येही सहज मिसळत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडपणा, लगेच नाराज होणं, घाबरणं, लोकांमध्ये मिक्स न होणं किंवा डिप्रेशन अशी लक्षणं दिसू शकतात.

चाइल्डहूड ट्रॉमावर उपाय

योगा व मेडिटेशन

चाइल्डहुड ट्रॉमासारखी समस्या दूर करण्यासाठी व्यक्तीला योगा आणि मेडिटेशनची खूप मदत मिळते. याच्या मदतीनं शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. दिवसभरातून कमीत कमी ५ मिनिटं योगा व मेडिटेशन केल्यास व्यक्तीला आराम मिळू शकतो. 

पालकांनी दूर करू नये

बालपणी एक अशीही वेळ येत असते, जेव्हा आपल्याला पालकांना राहणं आवडत नाही. आपण त्यांच्यापासून दूर जाऊ लागतो, ज्यामुळे चाइल्डहूड ट्रॉमासारखी स्थिती वाढते. अशात पालकांपासून दूर जाऊ नका. त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करा. असं केल्यास तुम्हाला चांगलं वाटेल आणि मनही शांत होईल. तसेच ते तुमची अधिक चांगली मदत करू शकतील.

मन मोकळं करा

आपल्या समस्या दुसऱ्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं ठरतं. अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्यानं मनाचं ओझं वाढतं, ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि डिप्रेशनचा धोकाही वाढतो. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबियांसोबत बोला आणि मन मोकळं करा.

काउन्सेलिंग

जर तुम्हाला डिप्रेशन किंवा इतर कोणतीही मानसिक समस्या असेल तर तुम्ही काउन्सेलिंग घेतलं पाहिजे. मानसिक समस्या दूर करण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही पद्धत वापरली जाते. 

Web Title: What is Childhood Trauma and How to Overcome from it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.