Lokmat Sakhi >Mental Health > डोक्यात विचारांचा कलकलाट, सतत धावणाऱ्या मनाला ब्रेक कसा लावायचा? अस्वस्थता कमी करायची तर...

डोक्यात विचारांचा कलकलाट, सतत धावणाऱ्या मनाला ब्रेक कसा लावायचा? अस्वस्थता कमी करायची तर...

What is Mindfulness How to apply it in Daily Life : माईंडफुलनेस म्हणजे नेमके काय आणि त्याचा आपल्याला मन:शांतीसाठी कसा उपयोग होतो याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 03:32 PM2023-04-05T15:32:10+5:302023-04-05T15:41:01+5:30

What is Mindfulness How to apply it in Daily Life : माईंडफुलनेस म्हणजे नेमके काय आणि त्याचा आपल्याला मन:शांतीसाठी कसा उपयोग होतो याविषयी...

What is Mindfulness How to apply it in Daily Life : How to break the mind that is constantly running, the chaos of thoughts in the head? To reduce discomfort... | डोक्यात विचारांचा कलकलाट, सतत धावणाऱ्या मनाला ब्रेक कसा लावायचा? अस्वस्थता कमी करायची तर...

डोक्यात विचारांचा कलकलाट, सतत धावणाऱ्या मनाला ब्रेक कसा लावायचा? अस्वस्थता कमी करायची तर...

सुचेता कडेठाणकर

अलीकडे mindfulness हा शब्द फार ऐकू येऊ लागला आहे. काय आहे mindfulness? Mind+Full म्हणजे मन भरून टाकायचे? पण का आणि कशाने? आपण सतत कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावत असतो. अशाप्रकारे धावताना आपण आपल्या शरीराचा, मनाचा, भावनांचा कितपत विचार करतो. आपल्याला शांती मिळण्यासाठी आपण दिवसभरात नेमके काय काय करतो. असे कोणी विचारले तर आपल्याकडे या प्रश्नाचे उत्तर बहुतांश वेळा नसतेच. आता माईंडफुलनेस म्हणजे नेमके काय आणि त्याचा आपल्याला मन:शांतीसाठी कसा उपयोग होतो ते पाहूया (What is Mindfullness How to apply it in Daily Life)...

Mindfulness म्हणजे काय?

Mindfulness याचा अर्थ सजगता किंवा सजगतेची जाणीव. दिवसभरात आपण अनेक गोष्टी ऑटो मोडवर म्हणजे यांत्रिक पणे करतो. सकाळी उठून दात घासण्यापासून, तयार होऊन ऑफीस गाठणे, वाहन चालवणे, घरातली अनेक कामं. दिवसभरातल्या निम्म्याहून अधिक गोष्टी अशाच होतात.  म्हणजेच, आपण करतो एक आणि विचार दुसऱ्या गोष्टीचा होत असतो. Mindfulness याचा अर्थ, आपण जी गोष्ट करतोय, त्याच आणि केवळ त्याच गोष्टीने मन भरून टाकणे. आपण जगाचा अनुभव आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचा मदतीने घेतो. Mindfulness मध्ये सुद्धा आपण त्याचाच मुद्दाम सराव करतो. 

(Image : Google)
(Image : Google)

नेमके काय करायचे?

उदाहरणार्थ - जेवण

जेवण आपण गप्पा मारत, टीव्ही बघत करतो किंवा अनेक विचार करत भरभर खातो. या ऐवजी, जेवणाच्या मेनू मधला एखादा पदार्थ निवडून त्या पदार्थाचा आस्वाद चव, स्पर्श, गंध, रूप अशा सर्वांगाने घ्यायचा. जेवण संपेपर्यंत किंवा निदान तो पदार्थ संपेपर्यंत तरी मनात दुसरा कोणताही विचार येऊ द्यायचा नाही. सतत धावणाऱ्या मनाला ब्रेक लावण्याचा हा फार सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

(Image : Google)
(Image : Google)

असेच आपण व्यायाम, घरातील काम, ऑफीसचे काम, वाचन, झोप, गाडी चालवणे, फोनवर गप्पा मारणे अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीत करायला हवे. म्हणजेच एखादी गोष्ट करताना डोक्यात फक्त त्याच गोष्टीबद्दल विचार असायला हवेत. असे होत नसेल तर आवर्जून आपल्या मनाला तशी सवय लावायला हवी. सुरुवातीला असे करणे काहीसे अवघड जाऊ शकते. पण सवय झाली की आपल्याला हे अगदी सहज जमू लागेल. 


(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

वेबसाईट -  www.kohamfit.com

संपर्क - 744 781 5781 (फक्त व्हॉट्सअॅप)

 

Web Title: What is Mindfulness How to apply it in Daily Life : How to break the mind that is constantly running, the chaos of thoughts in the head? To reduce discomfort...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.