Join us  

मला 'कसं तरी'च होतंय असं बायका म्हणतात तेव्हा त्यांना नक्की काय होत असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 3:31 PM

What it is Exactly When women are Not Feeling Well : Not Feeling well ची भावना जास्त काळ कुरवाळत राहणं आपल्या आणि आपल्या आजुबाजूच्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नक्कीच चांगलं नसतं.

सुचेता कडेठाणकर

माझ्याकडे योग शिकायला येणाऱ्या काही जणींकडून सुरुवातीला हमखास ऐकायला मिळणारं, एक वाक्य आहे. आज मी क्लासला येणार नाही कारण, I am not feeling well.हे एक फार सोयीस्कर वाक्य आहे, असं मला वाटतं. ठीक वाटत नाही म्हणजेच not well याचा नेमका अर्थ कोणालाच सांगता येत नाही. पण हे वाक्य येण्यामागे तीन-चार कारणं असू शकतात (What it is Exactly When women are Not Feeling Well).

१. खरंच बरं वाटत नसावं

२. खरं म्हणजे फक्त कंटाळा किंवा आळस असावा. मनाला ही आळसाची भावना फार प्रिय असते आणि तिला झाकण्यासाठी मन अनेक युक्त्या शोधून काढू शकतं. not well ही त्यातलीच एक युक्ती.

(Image : Google)

३. नवीन गोष्टीची सुरुवात करताना प्रत्येकालाच भीती वाटत असते, काहीशी धाकधूक असते. त्याचा परिणाम म्हणून सुद्धा शरीरामध्ये ही ठीक वाटत नसल्याची भावना निर्माण होऊ शकते. 

४. रात्री झोपताना काही कारणांमुळे मूड गेलेला असेल आणि तीच गोष्ट मनात ठेवून झोप लागली तर जाग सुद्धा त्याच भावनेने येते. मग ही भावना not feeling well या प्रतिक्रियेमधून बाहेर पडते.

वर सांगितलेल्या कारणांपैकी पहिलं कारण असेल, तर काही काळातच ही not feeling well ची भावना नेमकी काय आहे, आपल्याला नेमके काय होतंय, हे कळू शकतं. त्यावर योग्य ते वैद्यकीय उपाय करून बरं वाटल्यावर आपण व्यायामाला पुन्हा जाऊ शकतो. पण उपाय करुन बरं वाटल्यावर व्यायामाला जाताना पुन्हा एकदा तीच भावना आली तर मात्र २, ३, ४ या कारणांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. 

(Image : Google)

२,३,४ यांपैकी कोणतेही कारण असेल, तर मनाला एकच गोष्ट सांगता येईल. I am not feeling well,ही गोष्ट आत्ता खरीच आहे. पण त्याहीपैक्षा जास्त खरी गोष्ट काय आहे? तर, I want to feel well. आपल्यासाठी I want to feel well हे जास्त महत्वाचं आहे की I am not feeling well ला कुरवाळत बसणं जास्त महत्वाचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारला तर गोष्टी सोप्या व्हायला नक्कीच मदत होईल. कारण Not Feeling well ची भावना जास्त काळ कुरवाळत राहणं आपल्या आणि आपल्या आजुबाजूच्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नक्कीच चांगलं नसतं. तेव्हा वेळीच या स्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्याच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. 

(लेखिका योगतज्ज्ञ आहेत.)

वेबसाईट -  www.kohamfit.com

संपर्क - 744 781 5781 (फक्त व्हॉट्सअॅप)

 

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्सआरोग्य