Lokmat Sakhi >Mental Health > आनंद महागड्या वस्तूंनी मिळत नाही तर.. संशोधनातून सिध्द झाले आनंदी राहाण्यचे ५ उपाय

आनंद महागड्या वस्तूंनी मिळत नाही तर.. संशोधनातून सिध्द झाले आनंदी राहाण्यचे ५ उपाय

व्यक्तीच्या आनंदाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास (scientifically study of happiness) केल्यानंतर सर्वांना लागू होईल असे निष्कर्ष आढळून आले आहेत. हे निष्कर्ष माणसाला आनंद कशातून (ways of happiness) मिळतो हे दाखवणारे आहेत. आनंदाच्या कारणांचे वैज्ञानिक निष्कर्ष समजून घेतल्यास (how to be happy according to science) आपल्याला आपल्या आनंदाचे मार्ग शोधण्यास मदत होईल हे नक्की!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 09:00 AM2022-08-31T09:00:16+5:302022-08-31T09:05:05+5:30

व्यक्तीच्या आनंदाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास (scientifically study of happiness) केल्यानंतर सर्वांना लागू होईल असे निष्कर्ष आढळून आले आहेत. हे निष्कर्ष माणसाला आनंद कशातून (ways of happiness) मिळतो हे दाखवणारे आहेत. आनंदाच्या कारणांचे वैज्ञानिक निष्कर्ष समजून घेतल्यास (how to be happy according to science) आपल्याला आपल्या आनंदाचे मार्ग शोधण्यास मदत होईल हे नक्की!

What science tells about real happiness? 5 ways to be happy according to science | आनंद महागड्या वस्तूंनी मिळत नाही तर.. संशोधनातून सिध्द झाले आनंदी राहाण्यचे ५ उपाय

आनंद महागड्या वस्तूंनी मिळत नाही तर.. संशोधनातून सिध्द झाले आनंदी राहाण्यचे ५ उपाय

Highlightsआपण जर आपल्या शारीरिक सुदृढतेवर भर दिला, आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं तर आपल्याला खरा आनंद मिळतो.आनंद मिळवण्यासाठी जगण्याचा समरसून अनुभव घ्यायला हवा.आनंदी राहायचं असेल तर सर्वात आधी रागावर नियंत्रण ठेवता यायला हवं.

आपल्याला आनंद कशातून मिळतो? असा प्रश्न विचारला की बऱ्याचदा वस्तूंची, भौतिक घटकांची नावं सांगितली जातात. पण आपला आनंद (happiness)  खरंच असा वस्तूंवर अवलंबून असतो का? आनंद ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असली, आनंदाचा संबंध जास्त भावनेशी असला तरी आनंदाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातूनही बघता येतं. व्यक्तीच्या आनंदाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास (scientifically study of happiness)  केल्यानंतर सर्वांना लागू होतील असे निष्कर्ष आढळून आले आहेत. हे निष्कर्ष माणसाला आनंद कशातून मिळतो  (ways of happiness according to science) हे दाखवणारे आहेत. आनंदाच्या कारणांचे वैज्ञानिक निष्कर्ष समजून घेतल्यास आपल्याला आपल्या आनंदाचे मार्ग शोधण्यास मदत होईल हे नक्की!

 Image: Google

माणसाला आनंद कशातून मिळतो?

1. हाॅर्वर्ड युनिर्व्हसिटीचा अभ्यास सांगतो की आपण जर आपल्या शारीरिक सुदृढतेवर भर दिला, आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं तर आपल्याला खरा आनंद मिळतो. नियमित व्यायाम केल्यानं एंडोर्फिन नावाचं हार्मोन शरीरात स्त्रवतं. हे हार्मोन शरीराला आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त असतं. हे हार्मोन जितकं जास्त स्त्रवेल तितकं आपलं मनही आनंदी राहातं. मेंदूवरचा ताण कमी होतो. शारीरिक सुदृढता हा आनंदी राहाण्याचा एक मार्ग असल्याचं अभ्यासक सांगतात. 

2. 'जर्नल ऑफा पर्सनॅलिटी ॲण्ड सोशल सायकाॅलाॅजी' चा एक अभ्यास सांगतो की आपण आपल्या अनुभवांवर लक्ष केंद्रित केलं की आपल्याला खरा आनंद होतो. आपलं फिरणं, आपल्याला भेटलेली लोकं, आपलं खेळणं, मित्र नातेवाईकांसोबतचे आपले संबंध, त्यांच्याशी होणारा आपला संवाद या गोष्टी समरसून अनुभवल्या, त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आनंद मिळतो. खरा आनंद हा टीव्ही पाहून, वस्तू  घेऊन, नवीन कपडे खरेदी करुन मिळत नाही तर तो आपल्या अनुभवांवर अवलंबून असतो. त्यामुळे अभ्यासक जीवनाचा समरसून अनुभव घेण्याचा सल्ला देतात. 

3. ज्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे आपल्याला आनंद होतो त्यांच्याप्रती  लिहून आभार व्यक्त करणं हा आनंदी होण्याचा मार्ग आहे. हा एक प्रकारचा सराव आहे. यामुळे आपल्याला खरंच कशानं आनंद होतो हे समजतं, तसेच आपलं लक्ष सकारात्म्क गोष्टींवर केंद्रित होतं. नकारात्म्क गोष्टींवरील लक्ष कमी होतं यामुळेही आपल्याल आपला आनंद सापडतो. 

Image: Google

4. आनंदी राहायचं असेल तर आभासी जगात नाही तर प्रत्यक्षात जगा.  त्यासाठी सोशल माध्यमांचा कमीत कमी वापर करा. त्यांना थोडा काळ आपल्यापासून लांब ठेवा. सोशल मीडिया हाताळताना आपलं लक्ष आपल्यावरुन हटूब दुसऱ्यांवर केंद्रित होतं. इतरांशी आपण स्वत:ची नकळत तुलना करतो आणि त्यातून राग, द्वेष, मत्सर, इर्षा, दु:ख अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. हे होवू नये म्हणून समाज माध्यमांचा कमीत कमी वापर आणि किंवा त्यांच्यापासून थोडा काळ ब्रेक घेतल्यास खरा आनंद अनुभवता येतो. 

5. आनंदी राहायचं असेल तर सर्वात आधी रागावर नियंत्रण ठेवता यायला हवं. कारण आपल्याला जर राग आला तर संपूर्ण शरीरावर ताण येतो. राग आल्यानंतर आपण सतत ज्यामुळे आपल्याला राग आला त्या व्यक्ती, परिस्थिती किंवा घटनेचा विचार करत राहातो. त्यामुळे आपण आनंदी होवू शकत नाही. आनंदी होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवता यायला हवं, रागामुळे मनावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे प्रयत्न मनापासून केल्यास राग कमी होतो, मनावरचा, शरीरावरचा ताण निघून जातो आणि आनंदाची अनुभूती घेता येते. 
 

Web Title: What science tells about real happiness? 5 ways to be happy according to science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.