Lokmat Sakhi >Mental Health > तुमचा मास्क तुमच्या पर्सनॅलिटी बाबत काय सांगतो?

तुमचा मास्क तुमच्या पर्सनॅलिटी बाबत काय सांगतो?

Masks says about you : मास्क घालणं अनिवार्य आहे, म्हणून काहीजण  जो मिळेल तसा वापरतात. त्यांना फॅशन आणि लूक्सबाबत काही देणं-घेणं नसतं. साधारणपणे त्यांचे कपडेही तसेच असतात.

By manali.bagul | Published: June 3, 2021 06:46 PM2021-06-03T18:46:10+5:302021-06-03T19:04:11+5:30

Masks says about you : मास्क घालणं अनिवार्य आहे, म्हणून काहीजण  जो मिळेल तसा वापरतात. त्यांना फॅशन आणि लूक्सबाबत काही देणं-घेणं नसतं. साधारणपणे त्यांचे कपडेही तसेच असतात.

what your choice in face masks says about you. mask say about your personality? | तुमचा मास्क तुमच्या पर्सनॅलिटी बाबत काय सांगतो?

तुमचा मास्क तुमच्या पर्सनॅलिटी बाबत काय सांगतो?

Highlightsकाही जणांचे मास्क फार रंगेबिरंगी असतात. त्यांना आयुष्यात तोचतोचपणा आवडत नाही. नेहमीच नवीन काहीतरी प्रोव्होकेटिव्ह आवडत असतं.

मनाली बागुल

'या मास्कमुळे ना खूप गरम होतं., तिचा मास्क किती स्टायलिश आहे ना, मला असे मास्क कुठेच मिळत नाहीत, ऑनलाईन ऑर्डर करू?' की मार्केटला जाऊन पाहायचा?'  असे अनेक विचार मास्क पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच डोक्यात येतात. जोपर्यंत कोरोनाचा कायमचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मास्क काय पाठ सोडायचा नाही. कपड्यांप्रमाणेच आपण जेव्हा एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा मास्क पाहतो. तेव्हा मनात विचार सुरू असतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही कसा, कोणता मास्क वापरत आहात यावरून तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे सुद्धा ठरत असतं. मग जाणून घेऊया कसं ते.

प्रसिद्ध स्टाईलिस्ट, फॅशनिस्ट प्राची खाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, मास्क लावताना ''टू द पॉईंट असणारे लोक म्हणजेच मास्कचा खरा उद्देश कोरोनापासून बचाव करणं, असा विचार करणारे लोक एन ९५ मास्क लावणं पसंत करतात. तर काही जणांचे मास्क फार रंगेबिरंगी असतात. त्यांना आयुष्यात तोचतोचपणा आवडत नाही. नेहमीच नवीन काहीतरी प्रोव्होकेटिव्ह आवडत असतं. असा स्वभाव त्यांच्या मास्कवरून दिसून येतो. तिसरा प्रकार म्हणजे  (attention to detail) अटेंशन टू डिटेल या मनोवृत्तीच्या लोकांना आपले कपडे, ज्वेलरी यावर मास्क हा मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट हवा असतो. कपड्यांप्रमाणेच मास्कच्या वापराबाबतही ते तितकेच जागरूक असतात.''

पुढे प्राची म्हणतात की, ''मास्क घालणं अनिवार्य आहे, म्हणून काहीजण  जो मिळेल तो वापरतात. त्यांना फॅशन आणि लूक्सबाबत काही देणं-घेणं नसतं. साधारणपणे त्यांचे कपडेही तसेच असतात. ड्रेसिंगही फारशी आकर्षक वाटत नाही. कोरोनामुळे फॅशन ट्रेंड्सही बरेच बदलले आहेत. उदा. आधी आपण जसं टी-शर्ट्सवर प्रिंट करून घ्यायचो तो फंडा आता मास्कबाबत दिसून येतोय. अनेकजण आपल्याला हवं तसं प्रिंट करून मास्क वापरत आहेत. ''

साधा सर्जिकल मास्क

एन  ९५ असो किंवा साधा सर्जिकल मास्क वापरणारे लोक स्वतःला जास्त सुरक्षित ठेवू इच्छितात. थोडक्यात काय तर त्यांना लूक्सपेक्षा जास्त स्वतःची सुरक्षितता जास्त महत्वाची वाटते.  एकाचवेळी जास्तीत जास्त मास्क खरेदी ठेवून ठेवलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार तश्याच टाईपचे मास्क ती व्यक्ती वापरते.  तुम्हाला कल्पना असेलच अशा प्रकारचे डिस्पोजेबल मास्क पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. कदाचित असा मास्क वापरणारी व्यक्ती पर्यावरणाप्रती संवेदनशील नसू शकते.

कापडाचा मास्क

जे लोक कापडाचा मास्क निवडतात ते सुरक्षित राहणं पसंत करतात. कापडाचा मास्क वापरताना ते कदाचित ते स्थानिक व्यवसायाला पाठिंबा देत असतील किंवा त्यांच्या ओळखीतील काही लोक असे मास्क तयार करत असतील. याशिवाय अनेकांना या मास्कमुळे जास्त उष्णता जाणवत नाही, मोकळं वाटतं, सोयीस्कररित्या धुता येतो, सारखा सारखा मास्कसाठी खर्च करावा लागत नाही म्हणून ते कापडचा मास्क वापरत असावेत. उद्देश काहीही असो, अशा व्यक्तींचा  स्वतःवर खूप आत्मविश्वास असतो.

साधा घरी तयार केलेला मास्क

साधा घरगुती मुखवटा फॅब्रिक्सच्या आयताकार कापडानं तयार केला जातो. सुरक्षित राहण्यासाठी त्याला मागून इलास्टिक जोडले जाते. असा मास्क वापरणारे लोक असे असतात ज्यांच्याकडे मास्क शिवण्यासाठी लागणार वेळ, अनुभव दोन्ही नसतात. पण तरीही टिकाऊ वस्तू वापरायची असते. त्यावेळी ते अशा बनावटीच्या मास्कचा वापर करतात.

घरी बनवलेला प्रिटेंड, डिजायजिंग मास्क

असे मास्क आपल्या डिजाईन्स, रंगामुळे नेहमीच उठून दिसतात. कापडाचे असल्यामुळे सुरक्षितही असतात. अशा प्रकारचे मास्क वापरत असलेल्यांना नेहमीच स्पेशल, व्यवस्थित, डिसेंट दिसायचं असतं. असे मास्क वापरत असलेल्या लोकांना घरच्याघरी मास्क तयार करण्यासाठी खूप वेळ मिळतो किंवा तर ते कोणाकडून आपल्याला हवा तसा मास्क बनवून घेतात.

स्कार्फ किंवा रुमाल वापरणं

जर आपण आपले नाक आणि तोंड झाकण्यासाठी फक्त रूमाल किंवा स्कार्फ बांधला असेल तर, आपण काहीसे निराश आणि पर्यावरणाप्रती जागरूक असू शकता. कदाचित अशा व्यक्तींना दुकानात जाऊन नवीन मास्क विकत घ्यायला फारच कंटाळा येत असेल. त्यापेक्षा पर्यावरणसाठी अनुकुल ठरणारा स्कार्फचा ऑप्शन जास्त आवडत असावा. एका स्कार्फपासून तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलनं फेस कव्हर करू शकता.

सेलिब्रिटींसाठी मास्क तयार करताना काय लक्षात घेतलं जातं?

यावर प्राची म्हणतात की, ''कम्फर्ट, सुरक्षितता सगळ्यात आधी पाहिली जाते. मास्क लावल्यानं श्वास घ्यायला कोणतीच अडचण होऊ नये. याशिवाय घाम आल्यानंतर अन्ककम्फर्टेबल वाटायला नको याची काळजी घेतली जाते. ड्रेसला मॅचिंग मास्क न देता काहीतरी नवीन कॉम्प्लिमेंटरी होईल हे पाहिलं जातं. याशिवाय सिंपल मास्क आकर्षक, डिसेंट बनवण्यासाठी लटकन, पॅचेस किंवा ड्रेसिंगला सूट करेल असे ज्वेलरीप्रमाणेही डिजाईन्सही अनेकदा तयार केले जातात.''

Web Title: what your choice in face masks says about you. mask say about your personality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.