अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांची जोडी बॉलीवूडमधील सर्वात क्युट जोडींपैकी एक होती (Couple). मात्र, ऋषी कपूरने अकाली एक्झिट घेतल्यानंतर नीतू यांना जबरदस्त धक्का बसला. या धक्क्यापासून ते अजूनही सावरले नाहीत. बऱ्याच मुलाखतींमध्ये नीतू या ऋषी कपूर यांच्या निगडीत आठवणींना उजाळा देत असतात.
ऋषी कपूर यांचा २०२० साली ल्युकेमियामुळे मृत्यू झाला. त्यानंतर नीतू कपूर नैराश्याशी लढा देत होत्या. त्यांनी एका मुलाखतीत ऋषी यांच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेले असल्याचं सांगितलं. परंतु, विविध कामांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवल्याने त्यांना डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत मिळाली(When Rishi Kapoor left, I..! Neetu Kapoor talks about her depression and loneliness after her husband's death.).
स्वतःला व्यस्त ठेवलं आणि डिप्रेशनमधून..
नीतू कपूर यांनी एका मुलाखतीत डिप्रेशनबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. 'आजकाल मेंटल हेल्थबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पतीच्या निधनानंतर मी मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले. माझा आत्मविश्वास कमी झाला होता. पण जुग्जुग जिओच्या शूटिंगमुळे माझा आत्मविश्वास वाढला.'
कुटुंबाची मिळाली साथ
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यांना रीधिमा आणि रणबीर यांची साथ लाभली. त्यांनी तिला विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांनी काम करण्यास नका दिला.
एका कार्यक्रमात नीतू आणि रीधिमा यांनी हजेरी लावली होती. तेव्हा नीतू म्हणाल्या 'पतीच्या निधनानंतर कमबॅक करणं सोप्पं नव्हतं. लोक काय म्हणतील, टिका करतील. याचा विचार मी जास्त करत होती. पण मुलांनी साथ दिली. त्यानंतर एक शो केला, जाहिरात केली, चित्रपटात काम केलं.
नीतू पुढे म्हणतात, 'माझ्यासाठी पुन्हा काम करणं सोप्पं नव्हतं. कॅमेऱ्यासमोर उभ राहताचं माझा थरकाप उडायचा, पण आता अशी परिस्थिती नाही. आता मला असं वाटतं की मी घरात बसले तर वेड लागेल.'
वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे..
डिप्रेशन म्हणजे काय?
फोर्टिस हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ समीर पारीख सांगतात, 'डिप्रेशन हा मानसिक आजार आहे. जगात २८ कोटी लोक डिप्रेशनचे बळी आहेत. अशा लोकांना आपले जीवन अपूर्ण आणि दिशाहीन झाल्यासारखं वाटते. यावर वेळीच उपचार न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.'
डिप्रेशनची लक्षणे
डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे अगदी सामान्य असतात. त्यामुळे बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. कामात रस नसणे, सर्वकाही संपल्यासारखे वाटते. आवडीच्या गोष्टी करण्यास त्रास होणे. ही काही डिप्रेशनची लक्षणं आहेत.
आदित्व रॉय कपूर म्हणतो, मला ‘अशी’ जोडीदार हवी, चिडकी रडकी अजिबात नको कारण..
यासह सतत थकवा जाणवणे, एकाग्रतेचा अभाव, नकारात्मक विचार, आत्मविश्वासाचा अभाव, असहाय्य वाटणे, ही देखील काही डिप्रेशनची लक्षणे आहेत. जर ही लक्षणे आठवडाभरापेक्षा अधिक काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.