Join us  

कधी- कुठे आणि काय बोलावं? पाहा सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेलं- सुखी आयुष्याचं सोपं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 12:48 PM

Sadguru Vamanrao Pai Says Simple Secret for a happy life :

खूप बोलण्याची सवय त्रासदायक. तर कधी जिथे बोलायचंय तिथे बोललं नाही तर शांत बसण्याचा फायदा घेतला जातो. (Mental Health Tips)  त्यामुळे कुठे बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं ते माहीत असायला हवं. मानसिक शांततेसाठी हे फार महत्वाचे असते. शेअरिंग, गॉसिप्स, कमेंट्स करणं तर अनेकांना फार आवडतात. महिलांना जास्त असं मानलं जातं. पण अनेकदा अती बोलणं  किंवा चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टी शेअर करणं  मानसिक शांतता भंग करू शकते. (Sadguru Vamanrao Pai Says Simple Secret for a happy life)

कुटूंबात असो किंवा ऑफिसात  तुम्ही कोणाशी कसं बोलता, काय बोलता हे फार महत्वाचे असते. तुम्ही काय बोलता, तुमची शैली, विचार करण्याची पद्धत यावरून तुम्ही कसे आहात ते समोरची व्यक्ती ठरवते. सद्गुरू वामनराव पै यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये सद्गुरू वामनराव पै सांगतात की, तोंड बंद ठेवायला सहनशक्ती लागते.  तोंड बंद ठेवणं सोपं नसतं . असं म्हटलं जातं की पुरूष एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. बायका दोन्ही कानांनी ऐकतात आणि तोंडाने सोडतात. तोंड बंद ठेवायला सहनशक्ती लागते.

मौन म्हणजे असं नाही की कधीच बोलायचे नाही. जेव्हा बोलायला हवं तेव्हा बोललं पाहिले आणि जेव्हा बोलायचं नाही तेव्हा मौन धारण करायला हवं. हे ज्याला समजलं तोच खरा शहाणा. कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं हे ज्याला जमलं त्याच्याकडे शहाणपण आलं हे लक्षात ठेवायचं.

सुखी जीवनासाठी काय लागते?

एका प्रवचनात त्यांनी सांगितले होते की सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी पैसा लागत नाही, सत्ता लागत नाही, यासाठी इतर काहीही लागत नाही. सुखी जीवन मिळण्यासाठी जे लागतं ते विचार. म्हणून सगळ्यात आधी विचारांनी समृद्ध व्हायला हवं. मग जीवनात  समृद्धी साकार होईल.  द वर्ल्ड यू लिव्ह इन, इज लार्जली डिटर्माइन बाय वॉट गोज ऑन इन युअर माईंड, असं डॉ. मर्फी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :मानसिक आरोग्य