Lokmat Sakhi >Mental Health > सोशल ड्रिंक्स फॅशनेबल आहे असं वाटतं? सोशल ड्रिंक्सनं व्यसन लागणारच नाही,अशी खात्री आहे तुम्हाला?

सोशल ड्रिंक्स फॅशनेबल आहे असं वाटतं? सोशल ड्रिंक्सनं व्यसन लागणारच नाही,अशी खात्री आहे तुम्हाला?

महिलांनाही समान हक्क असायलाच हवेत. पण ही समानता शिक्षण, नोकरीची संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य यासह जगण्याच्या बाबतीत हवी की व्यसनाधिनतेत? व्यसनापायी आपलं करिअर उध्वस्त होणं, व्यसनामुळे लिव्हर सिरॉयसिस, हदयविकार, कर्करोग या आजारांनी अकाली मृत्यू येणं, व्यसनाधिन होऊन मुलांचं शोषण करणं हे सारे गंभीर प्रश्न आहेत. स्वत:ला आणि आपल्या कुटुंबांला नरकात लोटणाऱ्या व्यसनात कशाला हवी बरोबरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 03:28 PM2021-04-30T15:28:15+5:302021-05-03T14:55:00+5:30

महिलांनाही समान हक्क असायलाच हवेत. पण ही समानता शिक्षण, नोकरीची संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य यासह जगण्याच्या बाबतीत हवी की व्यसनाधिनतेत? व्यसनापायी आपलं करिअर उध्वस्त होणं, व्यसनामुळे लिव्हर सिरॉयसिस, हदयविकार, कर्करोग या आजारांनी अकाली मृत्यू येणं, व्यसनाधिन होऊन मुलांचं शोषण करणं हे सारे गंभीर प्रश्न आहेत. स्वत:ला आणि आपल्या कुटुंबांला नरकात लोटणाऱ्या व्यसनात कशाला हवी बरोबरी?

Who is responsible for the addiction in women? | सोशल ड्रिंक्स फॅशनेबल आहे असं वाटतं? सोशल ड्रिंक्सनं व्यसन लागणारच नाही,अशी खात्री आहे तुम्हाला?

सोशल ड्रिंक्स फॅशनेबल आहे असं वाटतं? सोशल ड्रिंक्सनं व्यसन लागणारच नाही,अशी खात्री आहे तुम्हाला?

Highlightsआपल्या देशात अनेक महिला व्यसनांच्या वाटेवर आहेत. त्यांनी स्वत:च्या आनंदासाठी हा जो मार्ग निवडला आहे तो तपासून बघायला हवा. त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.व्यसनासंदर्भात एक सामान्य समज असा आहे की मद्यपान हे काहींसाठीच हानिकारक आहे. केवळ या एका समजेमुळे अनेक सुशिक्षित लोकं मद्यपान करतात.महिलांनी मद्यपान करणं योग्य नाही या सांस्कृतिक विचाराच्या प्रभावामुळे महिला मद्यपानापासून दूर होत्या पण हा प्रभाव आता वेगानं ओसरु लागला आहे. त्यामुळे शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे.

डॉ. धारव शहा

मी मेडिकल कॉलेजमधे अल्कोहोलवर बोलत होतो. एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘सर तुम्ही असं बोलत आहात जसं फक्त पुरुषच मद्यपान करतात. पण समाजात काय चालू आहे हे तुम्हाला माहित आहे का? ’आता महिलांनाही वाटत आहे की आपणही मजा करावी, तो आपलाही हक्क आहे.

महिलांनाही समान हक्क असायलाच हवेत याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण ही समानता शिक्षण, नोकरीची संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य यासह जगण्याच्या बाबतीत हवी की व्यसनाधिनतेत? व्यसनापायी आपलं करिअर उध्वस्त होणं, व्यसनामुळे लिव्हर सिरॉयसिस, हदयविकार, कर्करोग या आजारांनी अकाली मृत्यू येणं, व्यसनाधिन होऊन मुलांचं शोषण करणं हे सारे गंभीर प्रश्न आहेत. स्वत:ला आणि आपल्या कुटुंबांला नरकात लोटणाऱ्या व्यसनात कशाला हवी बरोबरी?

अमेरिकेतील सरकारी आरोग्य सुरक्षा एजन्सीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार १० टक्के गर्भवती स्त्रिया मद्यपान करत असल्याचं आढळलं तर ४ टक्के स्त्रिया मागील महिन्यात अनियंत्रित मद्यपान करताना आढळल्या. गर्भावर वाईट परिणाम होत असतांनाही या महिला स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे. आपल्याकडेही अनेक महिला व्यसनांच्या वाटेवर आहेत. त्यांनी स्वत:च्या आनंदासाठी हा जो मार्ग निवडला आहे तो तपासून बघायला हवा. त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

कोणी असंही म्हणेल की, माझं माझ्या पिण्यावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. मला काही व्यसन लागलेलं नाही. तर मला हे प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं की पुरुष असू देत किंवा स्त्री कोणीही स्वत:हून व्यसनात आपलं आयुष्य उध्वस्त करत नाहीत. ते उद्धवस्त होतं. जे लोक अल्कोहोल घेतात त्यांच्यापैकी 10-15% लोकांना त्याची सवय लागते.  पण वास्तव तर हे आहे की व्यसन तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून नाही. आपल्या इच्छाशक्तीवर यशस्वी झालेली अशी खूप माणसं आहेत जे मौजमजेसाठी मद्यपान करायला गेले आणि आपलं आयुष्य उद्धवस्त करुन बसले. व्यसनाधीनता हे दारु, तंबाखू, गांजा, यासारख्या गोष्टींचा गुणधर्म आहे. जो कोणी या पदार्थांना स्पर्श  करतो, तो त्यांच्या विळख्यात सापडतो.  

व्यसनासंदर्भात एक सामान्य समज असा आहे की मद्यपान हे काहींसाठीच हानिकारक आहे. केवळ या एका समजेमुळे अनेक सुशिक्षित लोकं मद्यपान करतात. पण असा समज असणाऱ्यांची मदत जागतिक आरोग्य संघटनेची याबाबतची एक आकडेवारी नक्कीच करेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार समाजात १८ टक्के खून आणि १८ टक्के आत्महात्या या मद्यपानामुळे घडतात. यकृत दाहासोबतच मद्यपानामूळे हदयविकाराच्या झटक्याने, ब्रेन स्ट्रोक्स, अपघात , कर्करोग आणि टीबीसारख्या संसर्गजन्य आजारांनी लोकं मरण पावतात. सर्वात वाईट म्हणजे अल्कोहोल सेवनामूळे लोकं अकाली मरण पावत आहेत, आयूष्यात काही करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. २० ते ३९ वयोगटातील एकूण मृत्यूपैकी १३.५ टक्के मृत्यू हे केवळ अल्कोहोल सेवनामुळे होत आहेत.

हे असं असतांनाही अजूनही अनेकजण आपल्या समजेवर ठाम आहेत की ‘हे माझ्या बाबतीत घडणार नाही! ’ हा समज लोकांमधे पक्का होण्यास लोकप्रियता मिळालेले सेलिब्रेटी कारणीभूत आहेत. दारु, तंबाखू , पान मसाले यांच्या जाहिराती करुन दारु पिऊन , पान मसाले चघळून जीवनात यशस्वी होता येतं हा गैरसमज या लोकप्रिय सेलिब्रेटींनीच पसरवला आहे. या गैरसमजांच्या बळावरच हे तयार करणारे उद्योग आपली बाजारपेठ काबीज करत आहेत. महिला सेलिब्रेटींना हाताशी धरुन आता उद्योगांनी महिलांनाही लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. दुर्देव असं की या सेलिब्रेटींना केवळ पैशाशी मतलब असतो. लोकांंच्या, फॅन्सच्या जीवाशी त्यांना काहीही घेणंदेणं नसतं. त्यामुळे अशा मतलबी सेलिब्रेटींना अजिबात दाद न देता अशा जाहिराती बघताना तर्कसंगत विचार करण्याची खूप गरज आहे.

एक गोष्ट लक्षात असू द्या की अमेरिकेतल्या एका सिगारेट कंपनीनं १९२९ मधे एडवर्ड बर्नेजला २५ ,००० डॉलर्स मोजले होते. का? ? तर त्याने अमेरिकेतील महिलांना सिगारेट पिण्याची सवय लावली. त्यानं काय केलं की त्याची महिला सेक्रेटरी आणि आधुनिक दिसणाऱ्या महिलांना प्रसार माध्यमात मुलाखती द्यायला लावल्या. या महिला म्हणू लागल्या की , आता आम्ही ही असमानता आणि पुरुषी वर्चस्ववाद अजिबात सहन करणार नाही, त्यामुळे आता आम्हीही धूम्रपान करण्याचा निश्चय केला आहे. एडवर्ड बर्नेजची रणनीती किती यशस्वी झाली याचं जग साक्षीदार आहे. त्यामुळे आता भारतीय महिलांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे की आधुनिकता आणि स्त्रीवाद याचा बाजारपेठेनं लादलेला अर्थ आणि प्रतीकं स्वीकारत अल्कोहोल आणि सिगारेट कंपन्यांना आपल्या जगण्यात प्रवेश देत आपलं आयुष्य उध्वस्त करायचं का?

आतापर्यंत हे घडत होतं की समवयस्कांच्या दबावामुळे ( पीअर प्रेशर) पुरुष मद्यपान करत होते आणि महिला मद्यपान करत नव्हत्या. २०१० मधील एक सर्वेक्षण सांगतं की या पीअर प्रेशरमूळे ४.५ टक्के पुरुष हे व्यसनाधिन झाले होते. आणि महिलांचं प्रमाण केवळ ०.६ टक्के इतकंच होतं. महिलांनी मद्यपान करणं योग्य नाही या सांस्कृतिक विचाराच्या प्रभावामुळे महिला मद्यपानापासून दूर होत्या पण हा प्रभाव आता वेगानं ओसरु लागला आहे. त्यामुळे शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे. या पीअर प्रेशर बद्दल बोलण्याची आणि त्याला योग्य दिशा देण्याची गरज निर्माण झाली आहे. हे घडलं तरंच ते खरं स्त्री सक्षमीकरण असेल.

हे खरंच आहे की ताण घालवण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी पुरुष मद्यपान, धूम्रपान करतात. त्यामुळे महिलाही याच विचारानं मद्यपानाकडे वळू लागल्या आहेत. म्हणूनच मी कळकळीनं एक आवाहन करतो की, पुरुषांनी तर्कसुसंगत विचार करावा की मद्यपान करुन , स्वत:ला विषाचं व्यसन लावून आयुष्याची मजा घेण्याचा हा मार्ग योग्य आहे का? ताण हाताळण़्याचा मद्यपान आणि धूम्रपानाशिवायचा दुसऱ्या अन्य पर्यायाचा विचार करण्यास आपण खरंच असमर्थ आहोत का? पुरुषांनी हे प्रश्न स्वत:ला नक्की विचारावेत. महिलांनीही स्वत:ला विचारा की व्यसनापासून दूर राहून आपण आपले आरोग्य उत्तम राखणार, आपल्या नवऱ्यासमोर , मुलांसमोर आदर्श उदाहरण ठेवणार की त्यांना सोबत घेऊन या व्यसनाच्या विहिरीत उडी घेणार? 

हो, तुम्ही सगळ्या महिला आता मुक्त आणि सक्षम आहात. निर्णय तुमच्या हातात आहे.

( लेखक मनोविकार तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Who is responsible for the addiction in women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.