Lokmat Sakhi >Mental Health > आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही?

आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही?

दिवसभरात आपण किती तक्रारी करतो? मोजून पहायच्या, मोजा दिवसभरात कितीदा कम्प्लेन करता.. पण त्याचा उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 06:40 PM2022-08-12T18:40:10+5:302022-08-12T19:06:18+5:30

दिवसभरात आपण किती तक्रारी करतो? मोजून पहायच्या, मोजा दिवसभरात कितीदा कम्प्लेन करता.. पण त्याचा उपयोग काय?

Why are we constantly complaining, constantly unhappy? what to do to become happy? | आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही?

आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही?

Highlights प्रत्येक गोष्टीत आपल्याला मिळालं त्यापेक्षा जास्त हवं असतं.

अश्विनी बर्वे

नेहमी सकारात्मक विचार करा, सगळं चांगलं होईल असं सतत सांगणारी, सल्ला देणारी माणसं सारखी भेटतात. आजूबाजूला एवढ्या विचित्र, मनाला अस्वस्थ करणाऱ्या,ताण येणाऱ्या गोष्टी घडत असताना सतत सकारात्मक विचार करणं सोपं नाही.
ते कसं जमावं? पण मग निदान आपलं तक्रार करणं तरी कमी होईल का?
आपल्या रोजच्या दिवसाचे नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते, की आपण सतत तक्रार करत असतो. जसं की, कोकिळा एवढ्या किंचाळतात ना झोपच नीट झाली नाही, छे, काय गरम होतं आहे, आजकाल अजिबात थंडी पडत नाही, भाज्या नीट मिळत नाहीत, सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टीबाबत आपली काही ना काही तक्रार असते. कशात काही अर्थ नाही असं आपल्याला वाटत राहतं. आपलं वाटणं खरं असेल/असतं, पण त्यामागे असतं आपलं असमाधान. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मिळालं त्यापेक्षा जास्त हवं असतं.

(Image : google)

यावर उपाय म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीने एक खेळ खेळून पाहिला. ‘तक्रार ओळख’ म्हणून. आम्ही दोघींनी तो दिवस एकत्र घालवला. मी म्हणाले की, काय हा आवाज? की ती पटकन म्हणणार, तक्रार. तिने म्हटलं की नीट जेवणच झालं नाही, तर मी लगेच म्हणणार “तक्रार. हळूहळू आमच्या अशा खूप तक्रारी दिवसभरात गोळा झाल्या. ज्या एरवी आमच्या आम्हांला कळल्या नसत्या. आम्ही मनातून किती असमाधानी होतो. आमच्याजवळ अनेक गोष्टी असूनही हे आमच्या लक्षातच आलं नसतं.
या तक्रार ओळखीच्या खेळामुळे आमचं असमाधान आम्हांला कळलं आणि आमचं आम्हांलाच हसू आलं. शिवाय आम्ही एकमेकींच्या तक्रारींकडे ती काही तक्रार नाही, ते एक वास्तव आहे हे सांगताना खूप हसत होतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे हसून बघण्याची कला आम्ही साधू शकत होतो. तुम्ही खेळून पाहा हा खेळ.

Web Title: Why are we constantly complaining, constantly unhappy? what to do to become happy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.