Lokmat Sakhi >Mental Health > शांतपणे वाट पाहण्याची आपली ताकद आपण कशामुळे गमावली? एवढे का हायपर झालो..

शांतपणे वाट पाहण्याची आपली ताकद आपण कशामुळे गमावली? एवढे का हायपर झालो..

वाट पाहण्याची तयारी नसेल तर आपण केलेली प्रत्येक कृती आपला ताण वाढवतच राहणार, अगदी यश मिळालं तरीही ते ताणच देणार.. (प्रभात पुष्प) prabhatpushpa

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 05:52 PM2022-08-20T17:52:49+5:302022-08-20T17:56:33+5:30

वाट पाहण्याची तयारी नसेल तर आपण केलेली प्रत्येक कृती आपला ताण वाढवतच राहणार, अगदी यश मिळालं तरीही ते ताणच देणार.. (प्रभात पुष्प) prabhatpushpa

why waiting is beautiful, blooming, what makes us hyper, life more stressful | शांतपणे वाट पाहण्याची आपली ताकद आपण कशामुळे गमावली? एवढे का हायपर झालो..

शांतपणे वाट पाहण्याची आपली ताकद आपण कशामुळे गमावली? एवढे का हायपर झालो..

Highlightsथांबा आणि शिकून घ्या या मंत्राने जर आपण काम केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. 

अश्विनी बर्वे

शेतकरी नांगरणी करतो आणि बीज पेरतो. नंतर त्याला थांबावं लागतं. तिथे त्याची पेरण्याची जबाबदारी संपते. आता जर त्याला वाट पहाण्याची कला माहित असेल तर तो शांततेने वाट बघेल. त्याऐवजी जर तो ‘आता मोड कधी येतील, कोंभ कधी फुटतील’? या विचाराने वाट पहात  राहील तर तो अस्वस्थ होईल आणि त्याच्यावर ताण येईल. त्याचे मन सतत म्हणत राहील, “असे का घडले नाही? अजून का घडले नाही?’ अखेरीस मोड आलेच तरी त्याने त्याची शांतता त्या यशासाठी खर्च केलेली असते. बिघाड होवून गेलेला असतो.
जर आपण  लिफ्टचे बटण दाबले तर आपल्याला ती येण्याची  वाट पहावी लागेल. आपण शांत राहू . पण याऐवजी जर आपण आपले डोळे सारखे  वरखाली केले, आणि पन्नास वेळा लिफ्टची बटण दाबत राहिलो, शिवाय बरोबरच्या व्यक्तीला आपली कृती कशी बरोबर आहे हे ही पटवत राहू आणि मागच्या वेळी असं केल्याने लिप्ट कशी पटकन आली हे ही जोडीला सांगत राहू. असं केल्यानं लिफ्ट आपल्यापर्यंत लवकर येईल का? तसेच आपण वेटरला ऑर्डर दिल्यांनतर आपल्याला काही वेळ थांबावं लागतं, पण तसं न करता जरा काही क्षण गेले की त्यांना वेटरचा संताप येतो.

(Image : Google)

हे असं कशानं होतं?

१. आपल्याला हवा तसा निर्णय आपण घेतो. आपल्याला जशी कृती करायची तशी आपण करतो आहोत. तरी थोडं थांबायची, वाट बघण्याची सवय लावून घेवूया. म्हणजे आपल्याला  शांततेची किल्ली सापडेल. २. पण शांततेने वाट न पहाता आपल्याला यश मिळालं तर ते यश तणावसुद्धा आपल्या जीवनात आणेल. तर मग तणावाचा मार्ग कशाला घ्यायचा की नाही? हे आपण ठरवायला हवं.
३. थांबा आणि शिकून घ्या या मंत्राने जर आपण काम केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. 
४. अर्थात हे सर्वच मला एका काकडीच्या बी ने शिकवलं. ती जमिनीत पेरल्यानंतर मी रोज तिची उगवण्याची वाट पहात राहिले. तिने लवकर उगवून,पटकन काकड्या द्याव्यात असं मला वाटायला लागलं. त्यासाठी मी तिला वाट्टेल तेवढं खत, इतर मूलद्रव्ये द्यायला तयार होते. पण ते बी आपल्या चालीने शांततेनं वर आलं. त्याने बिलकुल घाई केली नाही माझ्यासारखी...

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: why waiting is beautiful, blooming, what makes us hyper, life more stressful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.