मलाच टार्गेट करतात. मलाच हसतात. माझ्यामागे बोलतात. मला टोमणे मारतात. माझ्याविषयी गॉसिप करतात. मला कॉर्नर करतात. माझं क्रेडिट ढापतात. असे सगळे विचार ऑफिसात काम करताना प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येऊन गेलेलेच असतात. कुणी कितीही नाही म्हंटलं तरी आपल्याविषयी इतरांना काय वाटतं, आपले सहकारी आपले स्पर्धक आहेत असं मनात येतंच. ते येणंही अत्यंत साहजिक आहे मात्र हा ट्रॅप आहे, हे आणि इतकंच मनात येत असेल तर आपल्याकडे वर्कप्लेस कम्युनिकेशन स्किल नाही असं समजा. तुम्हाला जर कामाच्या जागी एकही जीवाभावाचा मित्र मैत्रिण नसेल तर समजा आपली गडबड आहे. आजकाल असेही म्हणतात की आपण काम करायला जातो तिथे कुणी आपले मित्र नाही. पण जिथे आपण रोज आठ तास घालवतो तिथे आपला एकही चांगला मित्र किंवा मैत्रिण नाही. तिथं आपला कुणावर किंवा कुणाचा आपल्यावर भरवसा नसेल तर आपली करिअर ग्रोथही वेगानं होत नाही. कारण सतत असुरक्षित मानसिकता घेऊन जगणारे कधीच आपल्या कामात प्रगती करु शकत नाही.
मग करायचं काय?
(Image :google)
लक्षात ठेवा वर्कप्लेस कम्युनिकेशनसाठी आवश्यक ५ सी
कम्युनिकेशन आपल्यासाठी फार घिसापिटा शब्द आहे. आपल्याला वाटतं ते तर मला येतं. पण ते येत नाही म्हणून आपली करिअरची गाडी वेग घेत नाही. प्रमोशन मिळालं तरी आपल्याविषयी कुणी बरं बोलत नाही की ते मिळूनही आपल्याला समाधान लाभत नाही. उलट आपली असुरक्षितता उघडी पडते. तसं होऊ नये म्हणून ५ सी लक्षात ठेवा.
१. क्लिअर
घोळ न घालता आपला म्हणणं नम्रपणे प्रेमानं मांडायला शिका. स्पष्ट बोला. आपले विचार जितके क्लिअर तितका आपला संवाद क्लिअर. आत एक बाहेर एक, खोटं नाटं याचं त्याचं केलं की हा सी नापास होतो. तसं करु नका.
२. कॉन्शस
आपल्या मनाला जे पटते ते करा. लोक काय म्हणतील, दिखावा, साहेबाची जी हूजूरी, येस सरचा पाढा नको. जे आपल्या बुद्धीला पटेल आणि आपल्या कामासाठी आवश्यक आहे ते करा.
३. करेक्ट
आपलं काम चोख करा. आपलं काम आपल्यासाठी बोलणं हे कितीही जुनाट वाटलं तरी तेच महत्त्वाचं आहे. आपलं काम चांगलं झालं तर आपल्याला जास्त बोलण्याची गरज पडत नाही. तिथंच गडबड असेल तर बाकी सगळं फोल.
४. काँक्रिट
जे काम कराल ते पक्कं करा, अत्यंत उत्तम दर्जाचं. व्यवसायात तुमचं स्टँडर्ड सेट करणारं. त्या कामानं तुमची ओळख सांगितली पाहिजे, ते करताना ऑफिसात जी नातं जोडाल ती ही पक्की जोडा. दिखावा, गोडबोलेपणा नको. जे कराल ते मनापासून पक्कं करा. तरच नाती आणि माणसं टिकतील, टिम तुमच्यावर विश्वास ठेवेल.
५. कर्टिअस
प्रेम आणि विश्वास याहून मोठं नेटवर्किंग काहीच नाही. कोण आपल्याविषयी काय बोलतं यापेक्षा तुम्ही इतरांविषयी काय बोलता, त्यांना किती मदत करता, त्यांना आपलं काम शिकवता का, त्यांचं काम त्यांना प्रेमानं करु देता का? दुसऱ्याच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवता का? इतरांचा अपमान करता की सन्मान. हे सगळं तुमच्या करिअर ग्रोथचा भाग आहे. हे जमलं तर तुमचं करिअर उत्तमच होणार.
शिकायचं कसं?
खरंतर आपलं आपण समजून उमजून शिकू शकतो. इथे फ्री शिकता येईल.
https://www.coursera.org/courses?query=communication%20skills