Join us  

एखाद्या दिवशी कामं पटापट उरकतच नाहीत- कामाचा मूडच नसतो? आळस झटकण्यासाठी ३ गोष्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 5:01 PM

3 Things To Beat Laziness: एखादा दिवस खूप आळसात जातो. त्यादिवशी अजिबात कामाचा मूड येत नाही.. असं कधी झालंच तर या काही गोष्टी करून पाहा...

ठळक मुद्देआपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी असा अनुभव नक्कीच आलेला असतो. अशावेळी उरलेला दिवस खराब होऊ नये आणि कामाचा मूड यावा, यासाठी या काही गोष्टी करून पाहा.

कधीकधी एखादा दिवस आळसातच उगवतो. त्यादिवशी घड्याळ तर तिच्या वेगाने धावत असते, पण आपण मात्र खूप मागे पडलेलो असतो. एरवी ठराविक वेळेपर्यंत आपली जी काही कामं झालेली असतात, ती त्यादिवशी अजिबातच होत नाहीत. त्यामुळे मग उरलेली कामंही करावी वाटत नाहीत. काम करायला कसा उत्साहच राहात नाही. त्यामुळे मग सगळा दिवस एकदम बोअरिंग, रटाळ होऊन जातो.आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी असा अनुभव नक्कीच आलेला असतो. अशावेळी उरलेला दिवस खराब होऊ नये आणि कामाचा मूड यावा, यासाठी या काही गोष्टी करून पाहा. पुन्हा एकदा झटपट कामं करण्याचा मूड येईल. (no mood for work? Do 3 things to beat laziness)

कामं रेंगाळत चालली असतील, कामाचा मूड नसेल तर....

 

१. घड्याळाकडे पाहाणं थांबवा

आपली कामं जेव्हा खूप रेंगाळतात तेव्हा आपण सतत घड्याळाकडे पाहताे आणि एरवी आतापर्यंत आपलं किती काम झालं असतं आणि आज किती झालं आहे, याची तुलना करतो.

फरशी पुसण्याच्या पाण्यात ४ पदार्थ टाका, मुंग्या- झुरळं गायब होतील, फरशा लख्ख चमकतील..

त्यामुळे मग कामाचा ताण जरा जास्तच वाढतो. त्यामुळे घड्याळाकडे पाहणं थांबवा पण कामाची स्पीड मात्र वाढविण्याचा प्रयत्न करा.

 

२. चहा- कॉफी घ्या

तुम्हाला चहा, कॉफी असं काही घेऊन तरतरी येत असेल तर तुमच्या आवडीचं कोणतंही पेय घ्या. हवं असल्यास काहीतरी थोडंसं तुमच्या आवडीचं चटकमटक खा. चॉकलेट्स खा.

डोक्यात पांढरे केस दिसू लागले? लगेचच 'हे' तेल लावा, वय झालं तरी केस राहतील काळेभोर

पण खूप जास्त खाऊ नका. त्यामुळे आळस आणखीनच वाढू शकतो. पण आवडीचे पदार्थ थोडेसेच खाल्ले तर त्यामुळे मात्र आपण फ्रेश होऊन जातो. 

 

३. कामाची विभागणी करा

शक्य असेल तर तुमच्या कामाची आवडती कामं आणि ना आवडती कामं अशी विभागणी करा. त्यात आवडती काम आधी करायला घ्या.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

आवडीचं काम करायला मिळालं तर आपला कामाचा उरक आपोआपच वाढतो. ती काम पटापटा हातावेगळी झाली की मग न आवडती कामं करायला घ्या.. 

टॅग्स :मानसिक आरोग्य