Lokmat Sakhi >Mental Health > कधी खूप आनंद होतो, उत्साही वाटतं? कधी डोळ्यात पाणी-प्रचंड दु:ख असं कशानं होतं?

कधी खूप आनंद होतो, उत्साही वाटतं? कधी डोळ्यात पाणी-प्रचंड दु:ख असं कशानं होतं?

World Bipolar Day 2023 : बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणं फार धोक्याचं ठरतं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 03:26 PM2023-03-30T15:26:16+5:302023-03-30T15:27:13+5:30

World Bipolar Day 2023 : बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करणं फार धोक्याचं ठरतं कारण..

World Bipolar Day 2023: Major Factors That Trigger Frequent Mood Swings | कधी खूप आनंद होतो, उत्साही वाटतं? कधी डोळ्यात पाणी-प्रचंड दु:ख असं कशानं होतं?

कधी खूप आनंद होतो, उत्साही वाटतं? कधी डोळ्यात पाणी-प्रचंड दु:ख असं कशानं होतं?

मानसिक आजाराबाबतीत अनेकजण जागरुक झाले आहेत. मानसिक आजार फक्त डिप्रेशन नव्हे तर त्याचे देखील अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. सर्वत्र ३० मार्च रोजी 'जागतिक बायपोलर दिन' म्हणून साजरा केला जातो. आंतराष्ट्रीय सोसायटी फॉर बायपोलर, आंतराष्ट्रीय बायपोलर फाउंडेशन आणि आशिया बायपोलर फाउंडेशनच्या वतीने जनजागृतीसाठी या दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

बायपोलर डिसऑर्डर, हा भावनांचा विकार आहे. प्रसंगानुरूप दु:खी किंवा आनंदी होणे स्वाभाविक असते. मात्र, बायपोलर डिसऑर्डरमध्ये रुग्ण क्षणात अतिउत्साही तर अचानक निराश बनतो. जगातले २.८ टक्के नागरिक याने ग्रस्त आहेत. 'लॅन्सेट' या वैद्यकीय नियतकालिक यांच्या मते, भारतात हे प्रमाण ६.७ टक्के असण्याची शक्यता आहे. (World Bipolar Day 2023)

बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?

यासंदर्भात, मानस्थलीच्या संस्थापक-संचालक आणि वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. ज्योती कपूर सांगतात, ''बायपोलर डिसऑर्डर पूर्वी मॅनिक डिप्रेशन म्हणून ओळखले जायचे. ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे, जी एखाद्या व्यक्तीच्या मूड, ऊर्जा आणि कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये जलद बदल दर्शवते. यात व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे कठीण जाते. यात जर दोन्ही पालकांमध्ये ही स्थिती असेल तर, आपल्या पाल्यांमध्ये ही स्थिती उद्भवण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो.''

नोकरीत दणक्यात यश मिळवायचं आहे? ३ मंत्र, म्हणाल त्या कामात येईल यश

बायपोलर डिसऑर्डर का साजरा केला जातो?

बायपोलर डिसऑर्डर अनेक लोकांच्या जीवनाचे खरे चित्र प्रस्तुत करते. या आजाराची दोन प्रमुख लक्षणे म्हणजे अतिउत्साह (मॅनिया) आणि नैराश्य (डिप्रेशन). एखादा रुग्ण अतिउत्साही झाला, तर आठवडाभरही अतिशय उत्साही राहू शकतो. नाहीतर पूर्ण आठवडा नैराश्यात जगतो.

बायपोलर डिसऑर्डरची लक्षणे

बायपोलर डिसऑर्डर दरम्यान, व्यक्तीला दुःख, नैराश्य, कमी उर्जा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, आनंदी राहणे, असे अनेक बदल मूडमध्ये घडतात. या काळात अनेकांच्या मनात आत्महत्येचाही विचार येतो. ज्यात ते स्वत:चे नुकसान करण्याचा प्रयत्नही करू शकतात.

सतत कमी लेखणारी, तुम्हाला काहीच जमत नाही म्हणणारी माणसे अवतीभोवती आहेत? हे गॅसलायटिंग तर नाही?

काही मुख्य लक्षणे

हायपर अ‍ॅक्टिव्ह होणे किंवा अधिक प्रमाणामध्ये शारीरिक ऊर्जा खर्च होणे.

विनाकारण चिडचिड करणे.

अतिआत्मविश्वास वाढत जाणे. सतत आनंदी राहणे.

खूप जास्त वेळ बोलणे किंवा काहीच न बोलणे.

सतत अस्वस्थ वाटणे.

निर्णय घेताना घाबरणे.

वजन वाढणे किंवा वेगाने कमी होणे.

भूक न लागणे, जेवणाच्या वेळा न पाळणे.

उपचार न केल्यास काय होईल?

रुबी हॉल क्लिनिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज बी बोराडे सांगतात, ''बायपोलर डिसऑर्डर औषधे, थेरपी आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने नियंत्रित केले जाऊ शकते. यावर उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतो. नॉर्मल जगणंही अवघड व्हायला लागतं.

Web Title: World Bipolar Day 2023: Major Factors That Trigger Frequent Mood Swings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.