आपली मुले छान उंच असावीत असं आपल्याला कायम वाटतं. मात्र त्यांची उंची ही आपल्या किंवा फारतर आपल्या आई वडीलांच्या उंचीवर ठरत असते. हे जरी खरे असले तरी आपला आहार, लाईफस्टाईल, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांची उंची चांगली वाढली तरच ती वाढते. आरोग्य उत्तम ठेवायचं तर चांगला आहार घेणे गरजेचे असते. आहारामुळे शरीरातील हाडं, पेशी आणि सर्व अवयवांचे पोषण होते. तर सतत जंक फूड खाल्ले तर उंचीची वाढ होण्यात अडथळे निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. मुलं अनेकदा बिस्कीटं, वेफर्स, ब्रेड यांसारख्या गोष्टींवर तुटून पडतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर चुकीचा परीणाम होतो (1 Easy Diet Remedy for Growth in Hight).
उंची ही आपल्या अनुवंशिकतेवर आणि एकूण पोषणावर अवलंबून असली तरी ब्रिटनने गेल्या काही वर्षात खानपानाच्या बाबतीत अमेरीकन ट्रेंडचा अवलंब केला. यामुळे लठ्ठपणाच्या समस्येमध्ये तर वाढ झालीच पण जास्त कॅलरीज आणि अपुरे पोषण यामुळे मुलांच्या उंचीवरही त्याचा परीणाम झाला. एकदा मुले ठराविक वयाची झाली की काही केल्या उंची वाढत नाही. उंच व्यक्तीची नकळतच चांगली छाप पडते, त्यामुळे उंच व्यक्ती सगळ्यांमध्ये उठून दिसतात. मुलांच्या हाडांची योग्य पद्धतीने वाढ व्हावी आणि त्यांची उंची योग्य त्या वयात चांगली वाढावी यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मिहीर खत्री यांनी १ सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय कोणता आणि त्यामुळे उंची वाढण्यास कशी मदत होते ते पाहूया...
उंची वाढण्यासाठी सोपा उपाय...
अळीवाची खीर हा उंची वाढण्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे. आपण बरेचदा गर्भवती महिलेला अळीवाचे लाडू देतो. हाडे मजबूत राहावीत, कॅल्शियमची कमतरता भरुन निघावी यासाठी अळीव अतिशय फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे उंची वाढण्यासाठी लहान मुलांना अळीवाची खीर, लाडू नियमितपणे दिल्यास त्यांची उंची चांगली वाढण्यास मदत होते. १ चमचा अळीव, १ कप दूध आणि २ कप पाणी घालून हे सगळे चांगले शिजवून घ्यायचे. आवीनुसार यामध्ये वेलची, खडीसाखर थोडा गूळ घातला तरी चालतो. ही खीर मुलांच्या एकूणच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. तसेच हाडं मजबूत होण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. मुलांना १६ वर्षांचे होईपर्यंत ही खीर दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो...