Join us  

लहानपणीच मुलांना 'हे' १० संस्कार द्या; आयुष्यभर आनंदी राहतील मुलं-भरपूर यशस्वी होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:39 PM

10 Life Skill To Teach Your Kids : मुलांना लहानपणापासून काही गोष्टींची संस्कार दिले तर मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात अडचण येणार नाही.

लहानपणापासून मुलांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं. (Parenting Tips) वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर त्यांच्या मनावरही चुकीचा परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगले काय वाईट काय यातील फरक कळावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. (Essential Life Skill To Teach Your Kids Now)

अशावेळी मुलांना लहानपणापासून काही गोष्टींची संस्कार दिले तर मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात अडचण येणार नाही. अशा कोणत्या १० गोष्टी आहेत, त्या मुलांना शिकवायलाच हव्यात ते पाहया, जेणेकरून तुमच्या मुलांनाही तुम्ही उत्तम संस्कार देऊ शकाल. (Life Skill To Teach Your Kids)

 

१) आई-वडीलांचा आदर करा

मुलांनी लहानपणापासूनच आपल्या आईवडीलांचा आदर करायला हवा.  कोणतंही काम करण्याआधी आई-वडीलांची सल्ला घेणं आवश्यक आहे. मुलांना लहानपणीच शूर विरांच्या गोष्टी सांगून प्रेरित करा.

गॅस स्टोव्हची फ्लेम स्लो झालीये ? ३ ट्रिक्स; गॅसची फ्लेम चटकन वाढेल-स्वयंपाक कमी वेळात बनेल

२) प्रामाणिकपणा

मुलांना आधीपासून खरं बोलण्याची सवय लावायला हवी आणि आईवडीलांनीही तसेच वागायला हवे. सत्य आणि प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर पुढे चालल्याने मुलांना कोणत्याही समस्या येणार नाहीत.  लहानपणी मुलं खोडकरपणा करत खोटं बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष न  करता त्यांना समजावून सांगा.

३) सहयोग

मुलांमध्ये सहयोग  आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असायला हवी.  ही सवय लहानपणापासूनच असल्यास मुलं मोठेपणीही आदर्श व्यक्ती बनतात. मुलांना हळू हळू त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि बाहेरच्या लोकांशीही चांगले वागतील.

४) कर्तव्यनिष्ठता

मुलं कर्तव्यनिष्ट असायला हवीत. आपले कुटुंब, देश, मित्र-मैत्रिणी,  शाळा यांच्याप्रती जे काही कर्तव्य  आहेत ती पार पाडायला शिकवा.

५) प्रेम भावना

प्रत्येक मुलामध्ये  असा नैसर्गिक गुण असायला हवा तो ती सर्वांशी प्रेमाने वागेल आणि आपसांत  प्रेमाची भावना असेल. सहानुभूती, करूणेची भावना असायला हवी. लहान, मोठे, घरात  काम करणारे लोक प्रत्येकासाठी मनात प्रेम भावना असायाला हवी. 

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

६) देशाबद्दल आदर 

मुलांना लहानपणापासून असे संस्कार द्या की ते देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडतील. समर्पणाची भावना  असायला हवी. देशभक्तीपर गीत ऐकवा,  मोटिव्हेशनल गोष्टी त्यांना सांगा.

७) सहनशक्ती

आजकालच्या मुलांमध्ये टॉलरेंस खूपच कमी असतो. म्हणूनच आई वडिल असण्याच्या नात्याने मुलांना पेंशस  ठेवण्याची सवय राहू द्यायला सांगा. मुलांना छोटया छोट्या गोष्टींबद्दल सकारात्मक विचार करायला शिकवा.

८) उज्जवल चरित्र

मुलांना आपल्या चरित्र्याप्रती जागरूक राहण्याचा सल्ला द्या. कारण एकदा नाव खराब झाले की पुन्हा ते ठीक करणं कठीण होतं. धोकेबाज मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला द्या. 

९) वडीलधाऱ्यांप्रती सकारात्मक विचार

घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवा. त्यांच्याबद्दल आत्मियता असल्यास मुलांना  घरातीलच नाही तर बाहेरील व्यक्तींशीही  चांगले वागतात.

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

१०) ईश्वर आस्था

देवावर विश्वास ठेवण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावा.  यामुळे त्यांना कोणतंही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. ईश्वर सर्व काही पाहत असून आपण नेहमी चांगली कर्म करायला हवीत असा सल्ला द्या. 

टॅग्स :पालकत्व