Lokmat Sakhi >Parenting > नव्या आईबाबांना कळतच नाही नवजात बाळाला नक्की काय होतंय, बाळांच्या १० गोष्टी- आईबाबांना हमखास घाबरवतात

नव्या आईबाबांना कळतच नाही नवजात बाळाला नक्की काय होतंय, बाळांच्या १० गोष्टी- आईबाबांना हमखास घाबरवतात

अनुभवातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवजात बाळाच्या (new born baby) अनोख्या गोष्टी (unknown facts about new born baby) आई बाबा झालेल्या स्त्री पुरुषांना माहीती असणं आवश्यक आहे. यामुळे आई बाबांना आपलं बाळ समजून घेण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 04:30 PM2022-06-22T16:30:48+5:302022-06-22T17:40:14+5:30

अनुभवातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवजात बाळाच्या (new born baby) अनोख्या गोष्टी (unknown facts about new born baby) आई बाबा झालेल्या स्त्री पुरुषांना माहीती असणं आवश्यक आहे. यामुळे आई बाबांना आपलं बाळ समजून घेण्यास मदत होईल.

10 strange things about new born baby. Parents must know about unknown facts about new born baby. | नव्या आईबाबांना कळतच नाही नवजात बाळाला नक्की काय होतंय, बाळांच्या १० गोष्टी- आईबाबांना हमखास घाबरवतात

नव्या आईबाबांना कळतच नाही नवजात बाळाला नक्की काय होतंय, बाळांच्या १० गोष्टी- आईबाबांना हमखास घाबरवतात

Highlightsनवजात बाळाच्या श्वासोश्वासाच्य क्रियेत अनियमितता असते.रडणं ही बाळांची भाषा असते. ते प्रत्येकवेळी भूकेमुळेच रडतं असं नाही. 

बाळ जन्माला आलं की घरात आनंदी आनंद असतो. नवीन बाळाबद्दल (new born baby) कुतुहल असतं, त्याला जवळ घेऊन लाड करण्याची इच्छा असते. पण नवीन बाळाबद्दल मनात बरीच भीतीही असते. अगदी आई बाबांनाही बाळाच्या अनेक गोष्टी न कळणाऱ्या  (strange facts about new born baby) असतात. बाळासाठी काय करणं योग्य अयोग्य हे लक्षात येत नाही. जसा वेळ पुढे सरकतो तसं बाळ, बाळाच्या सवयी, त्याला काय हवं नको, कसला त्रास होतो, काय आवडतं याचा अंदाज येवू लागतो. नवजात बाळाबद्दल काही गोष्टी सांगून कळत नाही. त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. पण अनेकदा अनुभव अगदीच नवखा, कधी ऐकलेला पाहिलेला नसल्यानं आई बाबा घाबरतात,  तर कधी बाळ असं का वागतंय म्हणून बुचकळ्यात पडतात. अनुभवातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवजात बाळाच्या अनोख्या गोष्टी  (unknown facts about new born baby) आई बाबा झालेल्या स्त्री पुरुषांना माहीती असणं आवश्यक आहे. यामुळे आई बाबांना आपलं बाळ समजून घेण्यास मदत होईल.

Image: Google

नवजात बाळाच्या न उमजणाऱ्या गोष्टी

1. नवजात बाळाच्या श्वासोश्वासाच्य क्रियेत अनियमितता असते. विशेषत: बाल जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा 5 ते 10 सेकंद श्वास थांबल्यासारखा होतो. ही बाब जेव्हा पालकांच्या लक्षात येते तेव्हा असं का होतं यामुळे ते चिंतीत होतात. पण तज्ज्ञ ही बाब सामान्य असल्याचं सांगतात. फक्त बाळाचं शरीर निळं तर पडलं नाही ना याकडे लक्षं असू द्यावं. 

2. नवजात बाळ आपली मान उजवीकडेच ठेवतं. अगदी कमी 10 ते 15 टक्के बाळं आपली मान डावीकडे ठेवतात. बाळांमध्ये ही सवय काही महिनेच राहाते.

3. नवजात बाळ पहिले काही आठवडे काळा, पांढरा आणि करडा रंगच बघू शकतं. स्वत:च्या चेहेऱ्यापासून 8 ते 12 इंच एवढ्या अंतरापर्यंतच बाळ फोकस करु शकतं.  त्यामुळे बाळाशी बोलताना अगदी जवळून बोलावं लागतं, तरच बाळ आपला चेहरा नीट बघू शकतं. काही आठवड्यानंतर  बाळ सर्व रंग बघू शकतं. 

4. नवजात बाळ स्वत:च्या आवाजाला, रडण्यालाच घाबरतात. याला मोरो रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. काही महिन्यानंतर बाळाची ही सवय सुटते. 

Image: Google

5. नवजात बाळ रडताना ते केवळ रडतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही. 

6. रडणं ही बाळांची भाषा असते. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचं ते रडण्याच्या भाषेतून सांगतं. त्यामुळे बाळ जेव्हा रडतं तेव्हा प्रत्येक वेळेस त्याला भूकच लागलेली असते असं नाही. 

7. काही बाळांना जन्मत:च तोंडात एक किंवा दोन दात असतात. बाळांच्या नखांचा आकारही छान शेप दिल्यासारखा असतो. 

Image: Google

8. मुलगी असलेल्या बाळाच्या योनीतून मासिक पाळीसारखा स्त्राव जातो. पण तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ही बाबही सामान्य असून याबाबत फक्त आपल्या डाॅक्टरांना कळवावं.

9. नवजात बाळ मुलगा असू देत किंवा मुलगी त्यांच्या स्तनातून दूध येणंही सामान्य बाब आहे. 

10. नवजात बाळ एक महिन्यापर्यंत हसत नाही. महिन्याभरानंतर ते हसायला लागतं. 

 


 

Web Title: 10 strange things about new born baby. Parents must know about unknown facts about new born baby.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.