Lokmat Sakhi >Parenting > अभ्यास करताय पण वाचलेलं लक्षात राहात नाही, मन एकाग्र होत नाही? ४ टिप्स, अभ्यासात मन रमेल

अभ्यास करताय पण वाचलेलं लक्षात राहात नाही, मन एकाग्र होत नाही? ४ टिप्स, अभ्यासात मन रमेल

4 Tips To Enhance Students Memory And Focus: अभ्यास करूनही वाचलेलं काही लक्षात राहात नसेल किंवा अभ्यासात अजिबातच मन लागत नसेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा (4 tips for improving concentration). एकाग्रता वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल.(10th, 12th examination preparation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 12:27 IST2025-02-15T12:26:44+5:302025-02-15T12:27:55+5:30

4 Tips To Enhance Students Memory And Focus: अभ्यास करूनही वाचलेलं काही लक्षात राहात नसेल किंवा अभ्यासात अजिबातच मन लागत नसेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा (4 tips for improving concentration). एकाग्रता वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल.(10th, 12th examination preparation)

10th, 12th examination preparation, 4 tips for improving concentration, 4 tips to enhance students memory and focus  | अभ्यास करताय पण वाचलेलं लक्षात राहात नाही, मन एकाग्र होत नाही? ४ टिप्स, अभ्यासात मन रमेल

अभ्यास करताय पण वाचलेलं लक्षात राहात नाही, मन एकाग्र होत नाही? ४ टिप्स, अभ्यासात मन रमेल

Highlightsसतत अभ्यास करून एक वेळ अशी येते की मुलं पुस्तक हातात धरून बसलेली तर असतात पण त्याचं आपण काय वाचतो आहोत हे अजिबात लक्षात येत नाही.

परीक्षेचे दिवस नुकतेच सुरू झालेले आहेत. दहावी- बारावीच्या परिक्षांना सुरुवात झाली असून लवकरच पहिली ते दहावी आणि पदवीच्या अभ्यासक्रमांची परीक्षाही सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या घरोघरी अभ्यासाचे वातावरण आहे. परीक्षा जवळ आल्यामुळे मुलं मन लावून अभ्यासही करतात. पण सतत अभ्यास करून एक वेळ अशी येते की मुलं पुस्तक हातात धरून बसलेली तर असतात पण त्याचं आपण काय वाचतो आहोत हे अजिबात लक्षात येत नाही. अभ्यसात मुळीच मन रमत नाही. एकाग्र होत नाही (10th, 12th examination preparation). अशी अडचण जर आलीच तर त्यासाठी पुढे सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहा (4 tips for improving concentration). एकाग्रता वाढून पुन्हा अभ्यासात मन रमेल.(4 tips to enhance students memory and focus )

 

अभ्यास करताना मन एकाग्र होत नसेल तर काय उपाय करावे?

१. जर प्रयत्न करूनही अभ्यासात मन लागत नसेल तर थोडा वेळ ब्रेक घ्या. अर्धा ते पाऊण तासाचा हा ब्रेक असावा. यामध्ये चक्कर मारून या, थोडासा व्यायाम करा किंवा मग तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐका..

घरभर फिरणाऱ्या पालींमुळे हैराण झालात? 'हा' हर्बल स्प्रे मारा, घरात कधीच पाली येणार नाहीत 

मित्रांशी गप्पा मारा किंवा मग एखाद्या बागेत जाऊन स्वच्छ, मोकळ्या हवेत बसा. असं काहीही केलं तर तुमचं मन पुन्हा रिफ्रेश होईल आणि अभ्यासात रमेल.

२. अभ्यासातली एकाग्रता वाढविण्यासाठी काही वेळ डोळे मिटून बसा आणि दिर्घ श्वसन करत श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. यामुळेही मेंदू रिफ्रेश होण्यास मदत होते.

 

३. कधी कधी नुसतंच वाचून अभ्यासात मन रमत नाही. अशावेळी तुमच्या अभ्यासासंदर्भातले काही व्हिडिओ पाहा. आकृत्या पाहा. किंवा काहीतरी लिहून काढा. अभ्यासाचं माध्यम बदलल्यामुळेही खूप फरक पडतो.

हृदयाला कायम हेल्दी ठेवणारे ५ पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि हृदय राहील मजबूत

४. एकाच जागी अभ्यास करूनही कधी कधी मन रमत नाही. अशावेळी तुमची अभ्यासाची जागा थोडी बदलून पाहा. वेगळ्या खोलीत जाऊन बसा, टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जा, अंगणामध्ये किंवा गच्चीवर जाऊन अभ्यास करून पाहा. थोडा बदल केला की मनावरची मरगळ कमी होते. 

 

Web Title: 10th, 12th examination preparation, 4 tips for improving concentration, 4 tips to enhance students memory and focus 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.