Lokmat Sakhi >Parenting > मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण..

मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण..

15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : मोबाइलचं व्यसन आणि त्यापायी होणारी टोकाची वर्तणूक मुलांचा जीव घेऊ लागली आहे, त्यावर उपाय काय-वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 04:43 PM2024-10-15T16:43:02+5:302024-10-15T16:46:06+5:30

15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : मोबाइलचं व्यसन आणि त्यापायी होणारी टोकाची वर्तणूक मुलांचा जीव घेऊ लागली आहे, त्यावर उपाय काय-वाचा

15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : Be careful- your child's life is also in danger because.. | मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण..

मोबाइल ठेव बाजूला म्हणून आई रागावली तर मुलीची आत्महत्या; सावधान-तुमच्याही मुलाच्या जीवाला धोका कारण..

मोबाइल ठेव हातातला खाली असं तुम्ही तुमच्या १५ वर्षीच्या मुलीला किंवा मुलाला सांगितलं तर ते काय करतात? चिडतात, रडतात. पण आत्महत्या करतात असं सांगितलं तर? मोबाइल ठेव बाजूला असं मुलीला सांगणाऱ्या एका आईवर नुकताच दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  मोबाइल पाहत बसली म्हणून आई ओरडली तर तिला आईचा राग आला आणि या फक्त  १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ठाण्यातली ही घटना अगदी कालपरवाचीच (15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction).

ही घटना अपवाद आहे का? तर नाही. पुण्यात नुकतीच अशी घटना घडली. नेहमीच अशा घटना कानावर येतात. घरोघर चिडकी, आदळआपट करणारी मुलं तर अनेकच. मोबाइलमुळे ज्ञानात भर पडते, अनेक चांगल्या गोष्टी समजतात हे जरी खरे असले तरी त्याचा अतिवापर आणि त्यामुळे लागणारे व्यसन हे शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता तर अगदी मूल जन्माला आल्यापासून त्याला मोबाइलचे वेड असते. 

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या काही वर्षात लहान मुलांचं मोबाइल व्यसन कसं सोडवायचं हा यक्षप्रश्न आता पालकांपुढे उभा राहिला आहे. अभ्यास किंवा इतर गोष्टींसाठी मोबाइलचा वापर करणे गरजेचे असले तरी सतत गेम खेळण्यासाठी किंवा युट्यूब नाहीतर सोशल मीडियावर काही ना काही करण्यासाठी मोबाइल वापरणे लहान वयातील मुलांसाठी नक्कीच चांगले नाही. मात्र ते व्यसन सोडवण्याचे मोठे आव्हान आता पालकांसमोर आहे. 

 मेंदू आणि शिक्षण अभ्यासक, समुपदेशक श्रुती पानसे सांगतात..

(Image : Google)
(Image : Google)

मुलं आणि मोबाईलचे व्यसन हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला विषय आहे. कोणी फोनच्या अती वापरावरून रोखले की सध्या मुलं खूप टोकाला जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत, ही त्या कुटुंबासाठी आणि सर्व समाजासाठी एक धोक्याची सूचना आहे. मुलांच्या महत्वाच्या, जडणघडणीच्या वर्षात मोबाईल फोनचा अतिरेक मुलांच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे. मात्र मुलांना मोबाईल फोनपासून लांब ठेवणं हे आवश्यकच आहे. ते करताना, पालकांनी मोबाईल फोन बघण्यासाठी टाईम टेबल करावं. मुलांनाच फोन मध्येच अलार्म सेट करण्यास सांगावे. मुलं मोबाईलवर असताना अधूनमधून वेगवेगळी कामं सांगत राहावं. येत्या काळात मुलांचे मोबाइलचे व्यसन कमी करायचे असेल तर अशा काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतील.

Web Title: 15 year old girl dies by suicide after being scolded by mother for mobile use in thane mobile addiction : Be careful- your child's life is also in danger because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.