Lokmat Sakhi >Parenting > मुलं सतत उलटून बोलतात, अपमान करतात? त्याची २ महत्त्वाची कारणं, मुलांना चांगलं वळण लागायचं तर..

मुलं सतत उलटून बोलतात, अपमान करतात? त्याची २ महत्त्वाची कारणं, मुलांना चांगलं वळण लागायचं तर..

2 Reasons why child disrespect and talk back to parents : मुलांनी चारचौघात आपल्याशी चुकीचे वागू नये म्हणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 09:25 AM2024-02-22T09:25:30+5:302024-02-22T16:25:02+5:30

2 Reasons why child disrespect and talk back to parents : मुलांनी चारचौघात आपल्याशी चुकीचे वागू नये म्हणून

2 Reasons why child disrespect and talk back to parents : Do children constantly talk back, insult? 2 important reasons behind this, if children behave like wise... | मुलं सतत उलटून बोलतात, अपमान करतात? त्याची २ महत्त्वाची कारणं, मुलांना चांगलं वळण लागायचं तर..

मुलं सतत उलटून बोलतात, अपमान करतात? त्याची २ महत्त्वाची कारणं, मुलांना चांगलं वळण लागायचं तर..

आपल्या मुलांना चांगली शिस्त असावी आणि त्यांनी सगळ्यांसमोर कायम शहाण्यासारखं वागावं अशी पालक म्हणून प्रत्येकाचीच इच्छा असते. पण अनेकदा मुलं आपल्याला उलटं बोलतात. बरेचदा ते आपला इतरांसमोर अपमानही करतात. अशावेळी पालक म्हणून आपल्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. आपण मुलांना कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर चांगले संस्कार केले तरी ते असे वागले की त्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरते आणि पालक म्हणून लोक आपल्यालाच नावं ठेवतात. वडिलांपेक्षा आईवर ही जबाबदारी जास्त असते आणि आईलाच पहिल्यांदा नावं ठेवली जातात. मुलं असं का करतात यामागे काही नेमकी कारणं असतात. तसंच त्यांनी अशाप्रकारे चारचौघात आपल्याशी चुकीचे वागू नये म्हणून आपण काय करायला हवे याविषयी समजून घ्यायला हवे (2 Reasons why child disrespect and talk back to parents). 

१. पोकळ धमक्या

अनेकदा मुलांनी चांगलं वागावं म्हणून आपण त्यांना पोकळ धमक्या देतो. तू नीट वागला नाहीस तर मी तुला हॉस्टेलला राहायला पाठवीन, असं करेन असं काही ना काही सांगून त्यांना घाबरवतो. पण आपण तसे कधीच करणार नाही याची मुलांना कल्पना असते. त्यामुळे आपल्या शब्दांना अर्थ नाही हे मुलांना लक्षात येते आणि त्यांचा आपल्यावरचा विश्वास कमी होण्यास सुरुवात होते. 

२. मुलांचा अपमान होईल असे वागणे

मुलांना लोकांसमोर ओरडणे किंवा मारणे योग्य नाही. त्यांचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्यासमोर तुम्ही त्यांच्याशी असं वागलात तर त्याचा त्यांच्या मनावर परीणाम होतो आणि मुलं आपण तसे वागतो हे पाहून तसंच वागायला जातात. समोरच्याचा अपमान होईल असं वागणं हे मुलं आपल्याकडे पाहूनच शिकतात. पण आपण चांगले वागून त्यांचे हे वागणे बदलणे शक्य असते. 

मग काय करायला हवे? 

रागाच्या भरात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका. यामुळे आधीच वातावरण तापलेले असेल तर त्यात आग ओतल्यासारखे होईल. जर मूल किंवा इतर कोणीही चांगले वागले तर त्याचे कौतुक करा. मुलांसमोर याचे आदर्श असे उदाहरण निर्माण होईल आणि नकळत ते चांगले वागण्यास सुरुवात करतील. सहनशक्ती ही सर्वात मोठी गोष्ट असून पालक म्हणून ती आधी आपल्यात असायला हवी तरच ती मुलांमध्ये येऊ शकते. 


 

Web Title: 2 Reasons why child disrespect and talk back to parents : Do children constantly talk back, insult? 2 important reasons behind this, if children behave like wise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.