मुलं बाहेरून जशा गोष्टी शिकतात, तसंच बऱ्याच गोष्टी घरातून, त्यांच्या पालकांकडूनही शिकतात (parenting tips). अभ्यासाचं, शाळेचं, शिक्षकांचं जसं टेन्शन मुलांना येतं, तसंच बऱ्याच मुलांना त्यांच्या पालकांच्या वागण्याचंही टेन्शन येतंच. किंवा पालकांच्या काही गोष्टींमुळे मुलांच्या मनात नकळत असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागते. मग त्यानंतर त्यांच्या वागण्या- बोलण्यातही बदल होतो आणि एरवी मनमुक्तपणे सगळीकडे बागडणारी मुलं एकदमच शांत, अबोल (3 Main reasons why children become shy suddenly) होऊन जातात. मुलांच्या वागण्यात असा बदल होण्यामागची काही प्रमुख कारणं बघा नेमकी कोणती आहेत...
मुलांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवायचं तर....
१. अभ्यासाचं टेन्शन देऊ नका
मुलांच्या अभ्यासाचं खूप जास्त टेन्शन पालक घेतात आणि मग तेच टेन्शन मुलांनाही देतात. प्रत्येक मुल स्कॉलर नसतं.
केस गळणं थांबविण्यासाठी रामदेव बाबा सांगतात २ खास उपाय, केस वाढतील भराभर- राहतील काळेभोर
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमता लक्षात घ्याव्या आणि त्यांना अभ्यासाचा लोड देणे कमी करावे. अभ्यासाचं टेन्शन घेऊन अनेक मुलं बुजरी, घाबरट होत आहेत.
२. नेहमीच मुलांना गप्प बसवू नका
मुलांच्या मनात हजार प्रश्न असतात. कोणतीही नवी गोष्ट पाहिली की त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होतं. सुरुवातीला बरीच मुलं पालकांना नवनव्या गोष्टी विचारतात. पालकही सुरुवातीला उत्साहाने उत्तरं देतात.
तुमचं स्किन केअर रुटीन बदला असं सांगणारे त्वचेतले ३ बदल, वेळीच लक्षणं ओळखली नाही तर त्वचेचे हाल
पण नंतर मुलांचे प्रश्न वाढतात, तसे पालक त्यांच्यावर चिडचिड करू लागतात. त्यांना उत्तरं न देता शांत बसवतात. या गोष्टीमुळे मुलांच्या मनातलं कुतूहल शमतं किंवा मग एखादा प्रश्न पडला तरी तो पालकांना किंवा अन्य कुणाला विचारण्याची मुलांची हिंमत होत नाही. त्यामुळे मुलांच्या प्रश्नांना चिडचिड न करता शांतपणे उत्तरं द्या. त्यांना प्रत्येक वेळी गप्प बसवू नका.
३. मुलांवर लगेच वैतागू नका
सुरुवातीला लहान मुलं पालकांना शाळेतल्या, मित्र- मैत्रिणींच्या सगळ्या गप्पा सांगतात. त्यावर कसं रिॲक्ट करावं, हे अनेक पालकांना कळत नाही.
मुलांच्या सांगण्यातून जर पालकांना मुलांची काही चूक झाली आहे, हे लक्षात आलं तर अनेक पालक पुढे मुलं काय सांगत आहेत, हे न ऐकताच त्यांना रागवायला किंवा सूचना द्यायला सुरुवात करतात. असं वारंवार होऊ लागलं की मग मुलंही पालकांना मोकळेपणाने गोष्टी शेअर करणं एकतर बंद करतात किंवा कमी करून टाकतात.