आपल्या मुलांची सर्वांगिण वाढ व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. वाढीचा विचार करत असताना मुलांची वाढ जितकी महत्त्वाची असते, तितकीच त्यांची बौद्धिक आणि भावनिक, मानसिक वाढही होणे गरजेचे असते. मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांना वेगवेगळे ब्रेन गेम्स आणतो. त्यांना काही ना काही बौद्धिक अॅक्टीव्हीटीज देतो. पण मेंदूचा चांगला विकास व्हावा यासाठी या इतर गोष्टींबरोबरच मुलांचा आहारही उत्तम असणे आवश्यक असते. मुलांच्या मेंदूला ७ पोषक घटकांची प्रामुख्याने आवश्यकता असते. ते कोणते आणि त्याचा कशाप्रकारे फायदा होतो याबाबत समजून घेऊया (3 foods to boost your child’s brain development )...
कोणत्या घटकांची आवश्यकता असते?
१. डीएचए (DHA)
२. एआरए (ARA)
३. व्हिटॅमिन बी
४. लोह
५. प्रथिने
६. आयोडीन
७. कोलाइन
आहारात कोणते पदार्थ असायला हवेत?
१. आक्रोड आणि अव्हॅकॅडो
आक्रोड हा सुकामेव्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असून लहान मुलांना आक्रोड आवर्जून द्यायला हवेत. यामध्ये डीएचए मोठ्या प्रमाणात असल्याने मेंदूसाठी तो फायदेशीर असतो.
२. दूध आणि चीज
दूध आणि चीज यांमध्ये लोह आणि डीएचए सोडून वरील सर्व घटक असतात. त्यामुळे आहारात दूध आणि चीज यांचा अवश्य समावेश करायला हवा. त्यामुळे हे दोन्ही सुपरफूड आहे असे म्हणायला हरकत नाही.
३. हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्यांमधून शरीराला व्हिटॅमिन बी आणि लोह चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे या दोन्ही घटकांसाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा आवर्जून समावेश करायला हवा.