बहुतांश पालकांची अशीच तक्रार असते की त्यांच्या मुलांचं अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही. काही केल्या मुलं एकाग्र चित्ताने अभ्यासच करत नाहीत. त्यांना रागावलं, ओरडलं, प्रेमाने समजावून सांगितलं तरी त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. याचा परिणाम मुलांच्या मार्कांवरही दिसून येतो. मुलं अभ्यासात मागे पडत जातात. तुमच्याही मुलांचं असंच काही होत असेल तर त्यांचं मन अभ्यासात रमावं, एकाग्रतेने, शांतपणे त्यांनी अभ्यास करावा, यासाठी या काही गोष्टी करून पाहा (how to improve concentration of your kids?). त्याचा मुलांना निश्चितच फायदा होईल.(3 important things to increase concentration of kids)
मुलांनी एकाग्रतेने अभ्यास करावा यासाठी उपाय
१. हळूहळू सवय लावा
ज्या मुलांना मुळीच एकाजागी बसून अभ्यास करण्याची सवय नाही, अशा मुलांना एकदम शिस्त लावायला जाऊ नका. त्यांना बळजबरीने दिड- दोन तास अभ्यासाला बसवू नका.
३ चुका केल्या तर केस गळणारच!! डोक्याला टक्कल पडू द्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हा
असं केलं तर ते अभ्यासापासून जास्तच दूर पळतील. त्यामुळे सुरुवातीला अर्धा तासच त्यांना बसायला सांगा. पण तो अर्धा तास फक्त आणि फक्त अभ्यासच हवा. हळूहळू सवय लागेल तसा हा वेळ वाढवत न्या.
२. मन एकाग्र का हाेत नाही याचं कारण शोधा
काही मुलांचं असं असतं की सोपे किंवा त्यांच्या आवडीचे विषय हातात घेतले की ते मन लावून अभ्यास करतात. इतर विषयांमध्ये मात्र ते मुळीच रमत नाहीत. तुमच्या मुलांचंही असंच होत आहे का हे एकदा तपासून पाहा.
शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..
तसं असेल तर अवघड विषयातलं काय त्यांना कळत नाहीये, एखादी संकल्पना समजत नाहीये का हे एकदा त्यांच्याशी बोला. विषयात गोडी निर्माण झाली तर आपोआपच मुलांचं मन एकाग्र होण्यास मदत होईल.
३. योग्य आहार
योग्य आहार घेणारी, तब्येतीची कोणतीही तक्रार नसणारी मुलं अभ्यासात रमतात. त्यामुळे मुलांना जेव्हा अभ्यासाला बसवाल तेव्हा त्यांचं पोट व्यवस्थित भरलेलं आहे ना याची काळजी घ्या.
कोथिंबीर पावडर रेसिपी: हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळते; म्हणून एकदाच पावडर करा- वर्षभर वापरा
मुलांनी दूध, फळं, भाज्या यासोबतच समतोल आहार घेतला पाहिजे. यामुळे त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.