Join us  

बाळाच्या खाण्या-पिण्याबाबत अजिबात करु नका ३ चुका, चांगली वा़ढ होण्यासाठी डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 10:50 AM

3 major mistakes to avoid with infants parenting tips : त्यांचे रुटीन सांभाळताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे असते.

लहान बाळांची आपण जन्माला आल्यापासून खूप लक्ष देऊन काळजी घेतो. बाळ जरा रडलं की त्याला काय हवं नको ते पाहणे, त्यांचं आजारपण, आहार, झोप, बौद्धिक आणि शारीरिक वाढ या सगळ्याकडे आपण बारकाईने लक्ष देतो. त्यामुळेच मुलांची चांगली वाढ होण्यास मदत होते. पण मुलांच्या आहाराबाबत किंवा रुटीनमधील काही गोष्टींबाबत पालकांकडून काही चुका होण्याची शक्यता असते. आपणही नव्यानेच पालक झालेलो असल्याने आपल्यालाही सगळ्या गोष्टी लगेच माहित होतात असे नाही. त्यामुळेच लहान मुलांना खायला घालताना त्यांचे रुटीन सांभाळताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे असते. बाळाला फिडींग करत असताना काय काळजी घ्यायची इथपासून ते बाळाने वरचे खाणे सुरू केल्यावर त्याच्या आहाराबाबत नेमकी काय काळजी घ्यायची इथपर्यंतच्या बऱ्याच गोष्टी असतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डींपल जांगडा बाळाला वाढवताा लक्षात ठेवायला हव्यात अशा ३ महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. त्या कोणत्या ते पाहूया (3 major mistakes to avoid with infants parenting tips)...

१. फळं जेवणात मिसळू नका

मुलांच्या पोटात फळ जायला हवे म्हणून काही वेळा महिला ओट मिल किंवा अन्य काही गोष्टींसोब त फळांचा गर एकत्र करतात. पण फळं मुख्य अन्नात मिसळून देणे योग्य नाही. फळं पचायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे फळं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून दालचिनी, लवंग आणि मिरपूड घालून शिजवा आणि मग ती द्या. त्यानंतर साधारण १ तासाने ओटस किंवा नाचणीचे सत्त्व असे मुख्य अन्न द्या.

(Image : Google)

२. जेवल्यावर लगेच झोपवू नका, न विसरता ढेकर काढा

लहान मूल घरात असल्यावर आपल्याला खूप जास्त प्रमाणात कामं असतात. अशावेळी मुलाला खायला घातल्यावर आपण घाई गडबडीत त्याला लगेच झोपवण्याची शक्यता असते. पण असे करणे बाळाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे मुलांना खायला घातल्यानंतर त्यांना खांद्यावर धरुन त्यांच्या पाठीवर हळूवार थापटा. त्यांना ढेकर येईल यासाठी प्रयत्न करा. ढेकर आल्यानंतर त्यांच्या पोटातील अतिरीक्त वायू बाहेर पडेल तेव्हा तुम्ही त्याना झोपण्यासाठी आडवे करु शकता. 

३. फिडींग करत असाल तर

बाळ फिडींग घेत असले तर आईने शक्यतो आंबलेले किंवा आंबट पदार्थ खाणे टाळावे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, यामुळे बाळाला पोटदुखी आणि पोटात पेटके येण्याची शक्यता असते. आंबट पदार्थांमध्ये असलेले सायट्रीक अॅसिडमुळे आईचे दूध मुलांच्या पोटात फुटल्यासारखे होते. ज्यामुळे मुलांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांनी या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायला हवी. 

याबरोबरच बाळांना आयुर्वेदीक प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे द्यायला हवीत. यामध्ये सारस्वतारीशतम, सुवर्णप्राशन यांचा समावेश असतो. यामुळे मेंदूचा विकास होण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास आणि ताकद व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्यआहार योजना