Join us  

अभ्यास, शिस्त यांबरोबरच चांगली व्यक्ती होण्यासाठी मुलांना शिकवायलाच हवीत ही ३ मूल्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2023 7:29 PM

3 things every parent should teach to their children to become good human being : माणूस म्हणून ते चांगले असतील तरच ते त्यांच्या क्षेत्रात, समाजात एक चांगली व्यक्ती होऊ शकतात.

आपल्या मुलांनी अभ्यासात, खेळात, कलेत आणि इतरही सगळ्या गोष्टीत हुशार असावं अशी पालक म्हणून आपली स्वाभाविक अपेक्षा असते. इतकंच नाही तर मुलांनी चारचौघात शिस्तीत वागावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपण मुलांना जन्माला आल्यापासून काही ना काही सूचना करत असतो आणि शिकवत असतो. मुलांना वाढवणं हे नुसतं वाढवणं नसून त्यांना घङवणं असतं हे पालक झाल्यावर आपल्याला समजतं. आपल्या वागण्या-बोलण्याचा आणि लहान सहान गोष्टींचा मुलांवर परीणाम होत असतो आणि घरात, शाळेत, समाजात पाहून मुलं असंख्य गोष्टी नकळत शिकत असतात (3 things every parent should teach to their children to become good human being). 

मोठे होत असताना त्यांनी हुशार, समंजस, शिस्तबद्ध व्हावं यासाठी आपण झटणं अगदीच योग्य आहे. पण त्याचबरोबर मुलांनी उत्तम माणूस होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण माणूस म्हणून ते चांगले असतील तरच ते त्यांच्या क्षेत्रात, समाजात एक चांगली व्यक्ती होऊ शकतात. अशा चांगल्या व्यक्तींची संख्या वाढली तर समाज सुधारण्यासाठी म्हणून नकळत आपण काहीतरी करत असतो. चांगला माणूस होण्यासाठी मुलांना लहानपणापासून मुलांना काही मूल्य शिकवायला हवीत. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी ३ महत्त्वाची मूल्य सांगतात, ती कोणती पाहूया...

१. देवाला न चुकता नमस्कार करणे 

तुम्ही धार्मिक असाल किंवा नाही पण देवापुढे किंवा कोणत्याही एका शक्तीपुढे वाकण्याची सवय मुलांना असायला हवी. यामध्ये खूप वेळाची पूजाअर्चा करण्याची गरज नाही. पण फक्त हात जोडून नमस्कार केला तरी मुलांना वाकण्याची आणि नम्रतेची सवय लागते. 

२. दुसऱ्यांचे कौतुक करण्याची सवय 

मुलांना कायम दुसऱ्यांमधील चांगलं पाहण्याची सवय लावायला हवी. तसंच पाहिलेलं चांगलं बोलण्याची सवय मुलांमध्ये रुजवायला हवी. जेव्हा आपण मुलांमध्ये समोरच्याचे कौतुक करण्याची सवय विकसित करतो तेव्हा आपण नकळत त्यांना लोकांमध्ये, गोष्टींमध्ये सकारात्मक गोष्ट पाहण्याची सवय शिकवत असतो. 

 

३. दुसऱ्यांना मदत करणे

आपल्या आजुबाजूच्या लोकांना मदत करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही एक चांगली व्यक्ती होत असता. या गोष्टी आपली मुलं करत नाहीत असं नाही, पण आपण मुद्दामहून मुलांना अवश्य शिकवायला हव्यात.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं