Lokmat Sakhi >Parenting > मुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतात ? ३ उपाय, मुलांचं मोबाइलचं व्यसन येईल आटोक्यात..

मुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतात ? ३ उपाय, मुलांचं मोबाइलचं व्यसन येईल आटोक्यात..

3 Things to do if child is addicted to screen : हातातल्या मोबाइलचे व्यसन कधी लागते हे पालकांना आणि मुलांनाही लक्षात येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 09:40 AM2024-01-31T09:40:27+5:302024-01-31T09:45:01+5:30

3 Things to do if child is addicted to screen : हातातल्या मोबाइलचे व्यसन कधी लागते हे पालकांना आणि मुलांनाही लक्षात येत नाही.

3 Things to do if child is addicted to screen : Are children constantly glued to mobile phones? 3 solutions, mobile addiction of children will come under control.. | मुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतात ? ३ उपाय, मुलांचं मोबाइलचं व्यसन येईल आटोक्यात..

मुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतात ? ३ उपाय, मुलांचं मोबाइलचं व्यसन येईल आटोक्यात..

मोबाइल ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गरज झाली आहे. मोबाइलशिवाय अनेकदा आपला १ मिनीटही जात नाही.ऑफीसचे काम, बँकेची किंवा इतर काही कामे, सोशल मीडियाचा वापर, मनोरंजन अशा बऱ्याच गोष्टींसाठी अगदी सर्रास मोबाइल वापरला जातो. आपल्या पिढीच्या हातात असणारा हा मोबाइल गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांच्याही हातात दिसतो. कधी गाणी पाहण्यासाठी तर कधी गेम्स खेळण्यासाठी नाहीतर आणखी काही ना काही कारणांसाठी मुलांच्या हातात मोबाइल असल्याचे चित्र आपण सगळेच पाहतो. एकदा स्क्रीनची सवय लागली की त्यापासून दूर राहणे अतिशय अवघड असते. बरेच पालकही मूल सतत मोबाइलवर म्हणून चिंतेत असतात (3 Things to do if child is addicted to screen). 

मुलांनी सतत मोबाइल पाहू नये म्हणून पालक आणि मुलांमध्ये होणारे वादही आपण घरोघरी पाहतो.अनेकदा मोबाइलचा वापर न होता गैरवापर व्हायला लागतो आणि तिथेच खरा प्रश्न सुरु होतो. हातातल्या मोबाइलचे व्यसन कधी लागते हे पालकांना आणि मुलांनाही लक्षात येत नाही. पण आपल्या मुलांना असे व्यसन लागू नये आणि मोबाइल न मिळाल्यास ती अस्वस्थ होऊ नयेत यासाठी नेमकं काय करायला हवं याबाबत वेळीच विचार करायला हवा. अन्यथा हातातून वेळ निघून जाईल आणि मग पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काहीच उरणार नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

१. स्क्रीन फ्री सुट्टी घालवा

स्क्रीन फ्री सुट्टी घालवा. या काळात मोठे आणि लहान कोणीच मोबाइलचा वापर करणार नाही. हे सुरुवातीला काही प्रमाणात अवघड होऊ शकते. पण ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी असून मेंदू स्क्रीनपासून दूर राहण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. 

२. मुलांसोबत असताना मनोरंजन म्हणून स्क्रीन वापरु नका

तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांसोबत असता तेव्हा मनोरंजनासाठी मोबाइल वापरणे शक्यतो टाळा. तुम्हाला महत्त्वाचा फोन आला असेल किंवा काही महत्त्वाचे काम असेल तर फोन वापरणे ठिक आहे. पण अन्यथा मुलं सोबत असताना फोन वापरणे शक्यतो टाळलेले केव्हाही जास्त चांगले. कारण मुलांसाठी आपण रोल मॉडेल असतो, त्यामुळे ते जे पाहतात तेच ते करतात. 

३. मुलांना कठोर नियम घालून द्या

मुलांच्या स्क्रीन वापराबद्दल कठोर नियम घालणे महत्त्वाचे आहे, ते नियम मुलांना घाला. स्क्रीन पाहण्याचा ठराविक कालावधी, वेळ, ठराविक गोष्टी यांसारख्या गोष्टी आधीपासून मुलांसोबत ठरवून घ्या आणि मुलं ते फॉलो करतील याकडे लक्ष द्या. यामुळे मुलांनाही स्क्रीनबाबतच्या योग्य त्या सवयी लागतील.  


 

Web Title: 3 Things to do if child is addicted to screen : Are children constantly glued to mobile phones? 3 solutions, mobile addiction of children will come under control..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.