Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा हट्ट- दिवाळीत फटाके हवेतच! मुलांसाठी फटाके आणताना आईबाबांनी विसरु नयेत ३ गोष्टी

मुलांचा हट्ट- दिवाळीत फटाके हवेतच! मुलांसाठी फटाके आणताना आईबाबांनी विसरु नयेत ३ गोष्टी

3 Things to Keep in mind while buying Firecrackers for Childrens in Diwali : फटाके खरेदी करताना मुलांनी कितीही हट्ट केला तरी पालकांनी काही गोष्टींचे भान राखणे अतिशय आवश्यक आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 03:48 PM2023-11-01T15:48:46+5:302023-11-02T12:16:03+5:30

3 Things to Keep in mind while buying Firecrackers for Childrens in Diwali : फटाके खरेदी करताना मुलांनी कितीही हट्ट केला तरी पालकांनी काही गोष्टींचे भान राखणे अतिशय आवश्यक आहे

3 Things to Keep in mind while buying Firecrackers for Childrens in Diwali : Children's insistence - Firecrackers in the air during Diwali! Parents should not forget 3 things while bringing crackers for children | मुलांचा हट्ट- दिवाळीत फटाके हवेतच! मुलांसाठी फटाके आणताना आईबाबांनी विसरु नयेत ३ गोष्टी

मुलांचा हट्ट- दिवाळीत फटाके हवेतच! मुलांसाठी फटाके आणताना आईबाबांनी विसरु नयेत ३ गोष्टी

दिवाळी म्हटली की आकाशकंदील, पणत्या, दिव्यांच्या माळा हे सगळे ओघानेच आले. पहाटेचे अभ्यंगस्नान, उटण्याचा सुवास आणि नवीन कपडे घालून तयार झाल्यावर केला जाणारा फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. फटाक्यांमुळे धूर होतो त्यामुळे ते उडवू नयेत असे गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून सांगण्यात येते. मात्र तरीही लहान मुलांना आणि अनेकदा मोठ्यांनाही या फटाक्यांची विशेष क्रेझ असल्याने काही प्रमाणात का होईना घरोघरी फटाके आणलेही जातात आणि आनंदाने उडवलेही जातात. लहान मुलांसाठी दिवाळीत फटाक्यांची खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. हल्ली बाजारात विविध प्रकारचे फॅशनेबल फटाके उपलब्ध असतात. मुले अनेकदा एकमेकांचे पाहून किंवा साहस म्हणून फटाके उडवताना काही प्रयोग करतात. पण असे करणे मुलांच्या जीवावर बेतणारे ठरु शकते. त्यामुळे फटाके खरेदी करताना मुलांनी कितीही हट्ट केला तरी पालकांनी काही गोष्टींचे भान राखणे अतिशय आवश्यक आहे (3 Things to Keep in mind while buying Firecrackers for Childrens in Diwali). 

१. आवाजाचा अंदाज घ्या

मुलं लहान असतील तर त्यांना बॉम्ब, लक्ष्मी, फटाक्याच्या मोठ्या माळा असे प्रकार घेऊन देणे शक्यतो टाळा. कारण लहान मुलांना अनेकदा फटाके पेटवताना अंदाज येत नाही आणि हे फटाके त्यांच्या कानाच्या किंवा शरीराच्या खूप जवळ फुटण्याची शक्यता असते. इतरांचे पाहून मुलं अशा फटाक्यांसाठी हट्ट करणे स्वाभाविक असते पण आपल्या नकळत मुलं एकटीच फटाके उडवण्यासाठी गेली आणि काही अपघात झाला तरी ते महागात पडण्याची शक्यता असते. 

(Image : Google )
(Image : Google )

२. चायनिज फटाक्यांपासून सावध राहा

भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके तयार केले आहेत, ज्यामध्ये कार्बन मोनोऑक्साईड हा विषारी वायू जास्त प्रमाणात वापरण्यात आला आहे. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या विकासासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. ज्यात पारा मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. त्यामुळे फटाके खरेदी करताना अशाप्रकारच्या गोष्टींची खातरजमा करायला हवी. 

३. भुईनोळे, भुईचक्राचा पर्याय 

लहान मुलांना आपण हातात धरण्याची फुलभाजी देतो. त्यातून येणारे स्पार्कल्स मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणतात. त्याचप्रमाणे आवाजाचे किंवा धूर होणाऱ्या फटाक्यांपेक्षा भुईनोळे म्हणजेच शोभेचे झाड किंवा जमिनीवर गोलाकार फिरणारे भुईचक्र आणल्यास मुलांना फटाक्यांचा आनंदही मिळतो आणि ध्वनी किंवा वायूचे जास्त प्रमाणात प्रदूषणही होत नाही. 

आगळ्यावेगळ्या पर्यायांचा करा विचार...

१. इलेक्ट्रॉनिक फटाके

या दिवाळीत तुम्ही इलेक्ट्रिक फटाके पेटवून पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल उचलू शकता. इलेक्ट्रॉनिक फटाके ध्वनी स्विचसह येतात. म्हणजेच या बॉक्समध्ये तुम्हाला क्रॅकर आवाज असलेले फटाके मिळतात. इलेक्ट्रॉनिक फटाक्यांमध्ये, आपल्याला फटाक्यांचा आवाज, पर्यावरण संरक्षण, एलईडी लाल दिवा आणि रिमोटसह येतो. म्हणजे एका बटणाने तुम्ही फटाक्याचा आवाज अनुभवू शकता. फटाके आणि एलईडी लाइट्सचा आवाज चालवण्यासाठी तुम्हाला रिमोटचा वापर करावा लागेल.

(Image : Google )
(Image : Google )

२. पर्यावरण पूरक फटाके

पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या श्वेता भट्ट यांच्या संस्थेने हुबेहुब बाजारात मिळणाऱ्या फटाक्यांसारखे फटाके तयार केले आहेत. फरक ऐवढाच आहे की, याचा ना आवाज होतो ना यामधून धूर निघतो. यातून वेगवेगळी बियाणे बाहेर येतात आणि वनस्पतींची उगवण होते. हे फटाके पाण्यात भिजवून जमिनीवर ठेवले जातात जेणेकरून जमिनीवर पडल्यावर त्यातून रोप येते. त्यानंतर या रोपांना पाणी दिल्यास त्यातून झाडे किंवा भाज्या वाढू शकतात. लवंगी फटाक्यांमध्ये टोमॅटो, गवार, मिरची आणि लक्ष्मी बॉम्बमध्ये आपटे आणि भेंडीचे बियाणे असतात. याशिवाय इतर विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये मुळा, ज्वारी, पालक, लाल हरभरा, फ्लॅक्स, काकडी, कांदा आणि वांग्याच्या प्रकारांचा समावेश आहे.

Web Title: 3 Things to Keep in mind while buying Firecrackers for Childrens in Diwali : Children's insistence - Firecrackers in the air during Diwali! Parents should not forget 3 things while bringing crackers for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.