मुलांच्या जडण-घडणीमध्ये पालकांचा मोठा हात असतो. पालकांना बघूनच मुलं मोठे होतात. शिवाय त्यांनी दिलेल्या शिकवणीमधूनच मुलं घडत असतात. पण अनेकदा मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, किंवा पालकांच्या वागणुकीत घडलेल्या काही चुकांमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ज्यामुळे मुलं कोणतीही गोष्ट करण्यास घाबरतात. शिवाय याचा थेट परिणाम अभ्यासात देखील दिसून येतो.
कॉन्फिडन्स कमी झाला की, मुलांना उत्तरं जरी येत असली तरी, आत्मविश्वास कमी असल्यामुळे, मुलं अभ्यासात देखील मागे पडतात. पालक म्हणून मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी मुलांसोबत कसे वागावे?(3 Tips for Raising Confident Kids).
मुलांचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिप्स
किड्स हेल्थ या वेबसाईटनुसार, 'जेव्हा मुलांना पॉझिटिव्ह अटेंशन मिळते, शिवाय प्रेम आणि काळजीने त्यांना कुरवाळले जाते, तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते. शिवाय त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते. मुलांना नेहमी ओरडू नका, त्यांची चूक समजावून सांगा, त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.'
मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग
मुलांना वेळ द्या
मुलांना पालाकांच्या सहवासाची गरज असते. बरेचसे पालक कामात व्यग्र असतात. ज्यामुळे त्यांना मुलांकडे फारसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मुलांना जसा वेळ मिळेल, तसा वेळ द्या. त्यांना नवीन गोष्टी शिकवा. यामुळे तुमच्यातील बॉण्डिंग देखील वाढेल.
फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी खास ४ ट्रिक्स, मनातून भीती जाईल-मुलेही बोलू लागतील पटकन
वारंवार तक्रार करू नका
काही पालकांना सवय असते, ते वारंवार मुलांची चूक काढतात. नवीन गोष्ट मुलं शिकत असतील तर, त्यांना टोकतात. पण वारंवार मुलांची चूक काढून दाखवणे चुकीचे आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांची चूक वारंवार दाखवू नका. जर मुलं चुकत असतील, तर त्यांना प्रेमाने समजवा. योग्य मार्ग दाखवून मार्गदर्शन द्या.
इतरांशी तुलना करू नका
आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका. प्रत्येक जण युनिक असतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळे कौशल्य असतात. मुलांची आवड नेहमी जपा. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका. असे केल्याने आपल्या मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. ज्यामुळे कौशल्य असूनही मुलं आपल्या क्षेत्रात मागे पडतात.