Join us  

मुलं जेवायला किरकिर करतात, व्यवस्थित खातच नाहीत? ३ टिप्स- मुलं सगळे पदार्थ आवडीने खातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2024 5:17 PM

Parenting Tips: मुलं जेवायला खूपच किरकिर करतात, अशी तुमचीही तक्रार असेल तर हे काही उपाय करून पाहा.. (3 tips to improve eating habits of your kids)

ठळक मुद्देतुमचीही मुलं सगळे पदार्थ व्यवस्थित खात नसतील, जेवायला सतत किरकिर करत असतील तर हे काही उपाय करून पाहा

लहान मुलं जेवायला खूप किरकिर करतात, ताटात वाढलेले सगळे पदार्थ अजिबात संपवत नाहीत. ठराविक पदार्थच आवडीने खातात, इतर काही पदार्थ ताटात वाढले की ते टाकून देतात, अशी तक्रार बहुतांश आईंची असते. मुलांना खाण्या- पिण्याच्या चांगल्या सवयी लावण्यात आपणच कमी पडलो की काय असा विचार मग सतत त्यांच्या डोक्यात येऊ लागतो. तुमचंही तसंच झालं असेल आणि तुमचीही मुलं सगळे पदार्थ व्यवस्थित खात नसतील, जेवायला सतत किरकिर करत असतील तर हे काही उपाय करून पाहा (3 tips to improve eating habits of your kids). मुलं लवकरच ताटातले सगळे पदार्थ संपवू लागतील. (how to make kids to eat properly)

 

१. महत्त्व समजावून सांगा

मुलांना जर लहानपणापासूनच चांगले आरोग्यदायी पदार्थ का खावेत, हे समजावून सांगितलं तर त्याचा त्यांच्यावर चांगला परिणाम होत जातो.

आलिया भटने नववीत असताना पहिल्यांदा नेसली साडी आणि झाली 'अशी' फजिती.... व्हिडिओ व्हायरल

म्हणूनच काही उदाहरणं दाखवून मुलांना व्यवस्थित का जेवलं पाहिजे, हे समजावून सांगा. हवं तर मोबाईलवर काही व्हिडिओ दाखवा, आजुबाजुच्या मुलांची, लोकांची उदाहरणं द्या आणि त्यातून सगळ्या पदार्थांचे, घरच्या सात्विक अन्नाचे महत्त्व समजावून सांगा.

 

२. फळं- सुकामेवा हाताशी ठेवा

मुलांना अगदी सहज दिसेल आणि त्यांना त्यांच्या हाताने सहज घेता येईल अशा पद्धतीने फळं, सुकामेवा किंवा इतर काही आरोग्यदायी पदार्थ ठेवा. सुरुवातीला मुलं त्यांच्या हाताने ते घेणार नाहीत.

झोपेत शॉपिंग करून चक्क ३ लाख रुपये उडविणाऱ्या महिलेची व्हायरल गोष्ट, ती असं करते कारण.. 

त्यामुळे त्यांना सवय होईपर्यंत दिवसातून ठराविक वेळेला तुम्हीही मुलांसोबत ते पदार्थ घ्या आणि त्यांच्यासोबत बसून खा. यामुळे आपोआपच त्यांना फळं, सुकामेवा खाण्याची सवय लागेल.

 

३. चवीमध्ये बदल करा

आपल्या घरात काही पदार्थ विशिष्ट चवीमध्येच तयार होतात. तीच चव मुलांना नेमकी आवडत नाही. आपल्या घरी एखादा पदार्थ अजिबात ताटात न घेणारी मुलं दुसरीकडे गेल्यावर मात्र तोच पदार्थ आवडीने खातात.

लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील

अशावेळी तो पदार्थ नेमका कसा तयार केला आहे. आपल्या घरच्या आणि त्या घरच्या चवीमध्ये नेमका काय फरक आहे, मुलांना कसे पदार्थ आवडत आहेत, याकडे थोडं बारकाईने लक्ष द्या आणि त्यांच्या आवडीनिवडी जपत स्वयंपाक करा. हे करताना तुम्ही त्यांच्यासाठी खास रेसिपीने एखादा पदार्थ करत आहात, हे त्यांना दाखवून द्या. यातून त्यांना तुमची त्यांनी चांगलं खावं यासाठी सुरू असलेली धडपड कळेल आणि ते प्रेमाने तो पदार्थ खातील.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंअन्न