आईने आपल्या लेकीला काय शिकवावं किंवा काय शिकवू नये या गोष्टी प्रत्येक पिढीगणिक बदलत जात आहेत. काही मुलभूत गोष्टी सोडल्या तर आपल्या आजीला, आईला आणि त्यानंतर आपल्याला मिळालेल्या शिकवणीमध्ये काळानुसार काही बदल होत गेलेच. म्हणूनच आता सध्याच्या काळानुसार ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी प्रत्येक आईने तिच्या मुलीला शिकवायलाच पाहिजेत (3 very important things to teach your daughter). आपल्या लेकीचं आयुष्य सुखकर करणाऱ्या या गोष्टी कोणत्या ते पाहा...(every girl or women must know these 3 things for their safe life)
प्रत्येक आईने आपल्या लेकीला शिकवायलाच पाहिजेत अशा ३ गोष्टी
काळानुसार प्रत्येक आईने तिच्या मुलीला कोणत्या ३ गोष्टी शिकवायला पाहिजेत याविषयीचा व्हिडिओ vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कशाला महागडी आमचूर पावडर विकत घेता? फक्त १० रुपयांत वर्षभरासाठी करून ठेवा- घ्या रेसिपी
१. आर्थिक स्वावलंबन
आर्थिकदृष्ट्या हल्ली प्रत्येक मुलगी स्वावलंबी पाहिजेच. सध्याच्या जगात स्वाभिमानाने आयुष्य जगायचं असेल तर पैसा कमवता यायलाच हवा. पण इथपर्यंतच मर्यादित राहून चालणार नाही. कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला तरच त्याचं चीज होतं आणि आपलं भविष्य सुरक्षित होतं. त्यामुळे पैसा कमावणे आणि तो योग्य पद्धतीने गुंतवणे किंवा त्याची बचत करणे या दोन्ही गोष्टी आर्थिक स्वावलंबन या प्रकारात येतात.
२. गाडी चालवणे
कधी कोणावर कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपले वाहन आपल्याला चालवता येणे खूप गरजेचे आहे.
मुलांचं वजन वाढतच नाही- खूपच हडकुळे दिसतात? ५ पदार्थ रोज खाऊ घाला- तब्येत सुधारेल
गाडी चालवता आली तर बऱ्याच गोष्टी साध्या- सोप्या होतात. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी जे कोणते वाहन शक्य आहे ते तुमच्या मुलीला सराईतपणे चालवायला नक्की शिका.
३. 'नाही' म्हणणे
मनात नसणाऱ्या गोष्टींना 'नाही' म्हणायला शिकवणे खूप गरजेचे आहे. कारण ही एकच गोष्ट शिकवली न गेल्याने आपल्या सभोवतीच्या कित्येक स्त्रियांना घुसमटत जगावे लागते आहे.
बघा सुई- दोरा न वापरता अवघ्या १० सेकंदात कसा शिवायचा फाटका ड्रेस- १ भन्नाट ट्रिक पाहा
मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागत आहेत आणि प्रत्येक वेळी स्वत:चे मन मारत जगावे लागते आहे. त्यामुळे तुमच्या लेकीला ही गोष्ट आवर्जून शिकवाच.. जेणेकरून तिला कोणी गृहित धरून तिचा गैरफायदा घेणार नाही.