Lokmat Sakhi >Parenting > अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील

अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील

3 ways parents can help children build effective study habits : मुलं अभ्यासच करत नसतील तर, वेळीच ३ गोष्टी करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 08:15 PM2024-08-13T20:15:53+5:302024-08-13T20:17:23+5:30

3 ways parents can help children build effective study habits : मुलं अभ्यासच करत नसतील तर, वेळीच ३ गोष्टी करून पाहा..

3 ways parents can help children build effective study habits | अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील

अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील

फार कमी मुलं असतात जी न सांगता अभ्यासाला बसतात (Parenting Tips). अन्यथा मुलांच्या मागे अभ्यास कर म्हणून तगादा लावावा लागतो. तरीही मुलं अभ्यासाला बसत नाहीत (Study Tips). अभ्यासाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेक मुलं घरातून पळ काढतात. उज्वळ भविष्यासाठी अभ्यास करणं गरजेचं. मुलांनी अभ्यास करून मोठ नाव कमवावं असं प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं.

मुलांनी वेळेवर अभ्यासाला बसावं, मन लावून अभ्यास पूर्ण करावं. अशी अपेक्षा पालकांची असते. काही मुलं इतर मुलांना पाहून किंवा शिक्षकांच्या भीतीने शाळेत अभ्यास करतात. परंतु घरी गृहपाठ करण्यास टाळाटाळ करतात. जर मुलं ओरडून किंवा समजावून देखील अभ्यास करत नसतील तर ३ गोष्टी करून पाहा. यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागेल(3 ways parents can help children build effective study habits).

मुलांकडून अभ्यास कसं करवून घ्यावे?

आवडीच्या गोष्टी देण्याचे वचन द्या

मुल जर घरात अभ्यास करीत नसेल तर, त्याच्या आवडीच्या गोष्टींचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्या. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाला एखादी बाहुली किंवा खेळणी आवडत असेल, तर त्यांना वचन द्या, अभ्यास पूर्ण केल्यास आवडीची गोष्ट देण्यात येईल. यामुळे मुलं  आवडीने अभ्यासाला बसतील.

छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद्

चॉकलेट

मुलांना चॉकलेट खायला प्रचंड आवडते. त्यांच्याकडून अभ्यास करवून घेण्यासाठी आपण चॉकलेट देऊ असं वाचन द्या. पण दररोज चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात. आपण चॉकलेटऐवजी चॉकलेट कोटेट ड्रायफ्रुट्स, बिस्किट्स, कँडी देऊ शकता. यामुळे मुल आवडीने अभ्यास करतील. 

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

व्हिडिओ गेम्स किंवा आवडीचा शो

मुलांना व्हिडिओ गेम्स किंवा शो पाहायला आवडत असेल तर, त्यांना गृहपाठ केल्यानंतर व्हिडिओ गेम्स खेळायला देईन असे वचन द्या. व्हिडिओ गेम्स किंवा शो पाहण्याची एक ठराविक वेळ निश्चित करा. यामुळे स्क्रीन टायमिंगही वाढणार नाही.

Web Title: 3 ways parents can help children build effective study habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.