Join us  

मुलांचं टीव्ही- मोबाईलचं वेड कमी करण्यासाठी काय करावं कळेना? बघा ३ उपाय- वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 5:06 PM

How to Keep Children Away From Screen: मुलांचा स्क्रिन टाईम खूपच वाढलाय, त्यांना त्यापासून दूर कसं करावं, हा प्रश्न आजकालच्या बहुतांश पालकांना पडला आहे. बघा तज्ज्ञांनी त्यावर नेमके कोणते उपाय (Experts gives 3 solutions) सुचवले आहेत...

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय एकदा बघा. हे उपाय तुमच्या पाल्याचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील.

टीव्ही- मोबाईलच्या स्किनवर दिसणारा उजेड, त्यावर दिसणारी दृश्ये पाहून किंवा त्यातून येणारा आवाज ऐकून अगदी ६- ७ महिन्यांचं लेकरूही त्याच्याकडे आकर्षित होतं. त्यालाही स्क्रिन पाहावी वाटते. यानंतर मुलं जशी जशी मोठी होतात, तसं- तसं त्याचं स्क्रिनचं आकर्षण आणखी वाढू लागतं. त्यात घरातल्या मोठ्या मंडळींच्या हातातही सतत मोबाईल, लॅपटॉप दिसतो. घरात टीव्ही दिसतो. त्यामुळे मुलं नकळत त्याकडे ओढली जातात. मग हळूहळू तर स्क्रिन दिसली नाही, तर मुलांना जेवणही जात नाही. (3 Ways to control your child's screen time)

अनेकदा पालकही मुलांनी त्रास देऊ नये, गुंतून रहावं, यासाठी स्वत:हून त्यांच्या हातात मोबाईल देतात किंवा मग टीव्ही लावून देतात. मग नंतर मुलांना सतत स्क्रिन बघण्याची सवय झाली की ती पालकांसाठी डोकेदुखी ठरते.

४८ हजारांच्या ऑर्गेंझा साडीवर गज्जी सिल्कचं आकर्षक ब्लाऊज, बघा समंथा प्रभुचा स्टायलिश लूक... 

कारण अभ्यास, खेळ, समवयस्क मुलांशी गप्पा मारणे या सगळ्या गोष्टी सोडून मुलं केवळ स्क्रिन बघत बसतात. मग मुलांना स्क्रिनपासून कसं दूर करावं, हा प्रश्न पालकांना छळतो. बहुसंख्य पालकांना सध्या अशाच पद्धतीचा त्रास होतो आहे. म्हणूनच मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय एकदा बघा. हे उपाय तुमच्या पाल्याचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतील. हे उपाय इन्स्टाग्रामच्या parentingwithbrainify या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

 

मुलांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी उपाय१. मुलं आजुबाजुला असताना स्क्रिन नकोपालकांनी सगळ्यात पहिल्यांदा हा उपाय करून बघावा. मुलं जेव्हा तुमच्या आसपास असतात, तेव्हा त्यांना कुठेही स्क्रिन दिसू देऊ नका. तुम्ही स्वत: स्क्रिनपासून दूर रहा. 

 

२. स्पष्ट नकार द्यारडल्यावर कोणतीही गोष्ट मिळते, हे मुलांना पक्कं माहिती असतं. त्यामुळे पालकांनी ठाम असणं गरजेचं आहे.

पार्लरमध्ये न जाता घरच्याघरी जेल नेलपेण्ट कसे काढायचे? फक्त ५ सोप्या स्टेप्स; झटपट उपाय

मुलं कितीही चिडले, रडले, ओरडले तरी त्यांना स्क्रिन दाखवायची नाही, या विचारावर ठाम रहा.

 

३. लक्ष वेगळीकडे गुंतवामुलांना करमत नाही, म्हणून ते स्क्रिन बघतात. त्यामुळे मुले रमून जातील, त्यांची करमणूक होईल अशी खेळणी त्यांना द्या. तुम्ही त्यांच्याशी खेळा. त्यांना तुमच्यासोबत घेऊन तुमच्या कामात मदत करायला लावा. 

 

टॅग्स :पालकत्वमोबाइललहान मुलं