Join us  

गप्प बस तुला काय कळतं, म्हणत मुलांना सतत रागवता? आईबाबांमुळे मुलं बिघडतात- टाळा ४ चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 5:45 PM

4 biggest parenting mistakes that destroy kids' mental health : मुलांचा कॉन्फिडन्स कमी होण्याला पालकचं ठरतात कारणीभूत; 'या' ४ गोष्टींमुळे मुलं करतात चिडचिड

पालक असण्याचा अर्थ असा होत नाही की, प्रत्येक लहान - सहान गोष्टीत पाल्यांना टोकलं पाहिजे (Parenting tips). बरेच पालक आपल्या मुलांना कोणतीही गोष्ट करताना टोकतात, ओरडतात किंवा सरळ नकार देतात (Mental health tips). पण याचा मुलांवर काय परिणाम होतो? याचा विचार केला आहे का?

मुलांच्या हृदयावर, मनावर, मानसिक ताण किंवा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो; कदाचित आपण अंदाज करू शकत नाही. यामुळे मुलाची मानसिक वाढ मंदावतेच पण शारीरिक विकासावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांना फटकारण्यापूर्वी, टोकण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?(4 biggest parenting mistakes that destroy kids' mental health).

लहान - सहान गोष्टीत मुलांना टोकल्यावर काय होते?

आत्मविश्वास कमकुवत होतो

काही पालक मुलांना त्यांचे निर्णय घेताना टोकतात. बोलताना अडवतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे मुलांना स्वतःहून छोटे - मोठे निर्णय घेऊद्या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. शिवाय शारीरिक आणि मानसिक विकासही होईल.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

निर्णय घेण्यास नसेल सक्षम

मुलांना वारंवार टोकत असाल तर, यामुळे मुलं निर्णय घेण्यास सक्षम होणार नाहीत. ते पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतील. किंवा काही मुलांची प्रचंड चिडचिड देखील होऊ शकते. त्या लहान - सहान गोष्टीत तुमच्यासोबत वाद घालू शकतात. यामुळे पालक आणि मुलाच्या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते.

क्रिएटिव्हीटी संपेल

मुलांना जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत टोकाल, त्याला कंट्रोल कराल तर, त्याच्यातील क्रिएटिव्हीटी संपेल. मुल आउट ऑफ बॉक्स कधीच विचार करणार नाही. यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग अॅबिलिटीवरही परिणाम होऊ शकतो.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

भीतीचं घर मनात निर्माण होईल

मुलांना टोक्ल्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होईल. ज्यामुळे त्यांना निर्णय घेताना अडचण येऊ शकते. शिवाय त्यांना कोणताही निर्णय घेताना अडचण येऊ शकते. त्यामुळे मुलांसोबत वागताना बोलताना शब्दांकडे लक्ष द्या.

टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्य